आंतरराष्ट्रीय

February 17, 2025 8:33 PM February 17, 2025 8:33 PM

views 15

इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात हमासच्या मोहिम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार

इस्रायलच्या लष्करानं आज दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासचा लष्कराच्या मोहिम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार झाल्याचा दावा केला आहे. शाहीनने लेबनॉनच्या हद्दीतून दहशतवादी हल्ल्यांची योजना आखल्याचा आरोप इस्रायलनं केला आहे. 

February 15, 2025 8:24 PM February 15, 2025 8:24 PM

views 5

हमासकडून आज गाझा मधून तीन इस्रायली नागरिकांची सुटका

हमास आणि इस्रायल यांच्यातल्या शस्त्रसंधी कराराअंतर्गत हमासनं आज गाझा मधून तीन इस्रायली नागरिकांची सुटका केली. हमासनं ७ ऑक्टोबर २०२४ ला केलेल्या हल्ल्यात किब्बुत्झ इथून या तिघांना ताब्यात घेतलं होतं. शस्त्रसंधी नंतरची ही कैद्यांची सहावी  देवाणघेवाण आहे.    हमासनं सुटका केलेल्या इस्रायली नागरिकां...

February 15, 2025 6:46 PM February 15, 2025 6:46 PM

views 5

अमेरिकी लष्करानं ट्रान्सजेंडर व्यक्तींची सैन्यातली भरती बंद केल्याची घोषणा

अमेरिकी लष्करानं पारलिंगी अर्थात ट्रान्सजेंडर व्यक्तींची सैन्यातली भरती बंद केली असल्याची घोषणा केली आहे. यापुढे लिंग बदलाच्या प्रक्रियेसाठी दिली जाणारी मदतही बंद करणार असल्याचंही अमेरिकेच्या लष्करानं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. लिंगभाव ओळखीसंदर्भात अनिश्चिततेनं ग्रस्त अर्थात जेंडर डिस...

February 15, 2025 3:02 PM February 15, 2025 3:02 PM

views 12

हमासच्या कैदेतून मुक्त होणाऱ्या ३ ओलिसांची नावे जाहीर

इस्रायलनं आज गाझा पट्टीतल्या हमास या पॅलेस्टिनी सशस्त्र गटाच्या    कैदेतून मुक्त होणाऱ्या तीन ओलिसांची नावं जाहीर केली. इस्राईल आणि पॅलेस्टिन यांच्यात गेल्या महिन्यात झालेल्या युध्दविरामनानंतर दोन्ही देशांमध्ये ओलीसांची देवाणघेवाण करण्याची ही सहावी वेळ आहे.   पॅलेस्टिन सुटका करणार असलेल्या तीन ...

February 15, 2025 11:22 AM February 15, 2025 11:22 AM

views 11

पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 11 कामगार ठार

पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतातल्या हरनाई इथं रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटात 11 कामगार ठार झाले आहेत, तर सात जण जखमी झाले आहेत. कोळसा खाण कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहन जात असताना हा स्फोट झाला.   प्रगत स्फोटक यंत्राचा वापर करून ही रस्त्यावर स्फोटके पेरण्यात आल्याचा संशय हरनाईच्या पोलिस उपाय...

February 14, 2025 8:13 PM February 14, 2025 8:13 PM

views 16

चेर्नोबिल अणुप्रकल्पाचं संरक्षक कवच भेदल्याचा आरोप रशियानं फेटाळला

चेर्नोबिल अणुप्रकल्पाचं संरक्षक कवच भेदल्याचा आरोप रशियाने फेटाळला आहे. रशियाचे युक्रेनमधले प्रतिनिधी दिमित्री पेस्कॉव्ह यांनी आज क्यीव्हमधे पत्रकारपरिषदेत सांगितलं की अणुप्रकल्पांवर किंवा संबंधित पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा विषयच कधी उद्भवला नसून रशियाच्या सैन्याने असं काहीही केलेलं नाही. युद्...

February 14, 2025 7:33 PM February 14, 2025 7:33 PM

views 5

लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञानातली भागिदारी बळकट करण्यावर भारत-अमेरिका यांच्यात सहमती

 यांच्यात लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी कॉपॅक्ट या नव्या उपक्रमावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात याविषयी अधिक माहिती दिली आहे.    संरक्...

February 14, 2025 8:13 PM February 14, 2025 8:13 PM

views 8

पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू, ७ जखमी

पाकिस्तानमधे बलुचिस्तान इथे हरनाई भागात झालेल्या बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. कोळशाच्या खाणीतल्या कामगारांना घेऊन जाणारा ट्रक हरनाईच्या शाहराग भागात आला होता, इथे रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला.

February 14, 2025 10:27 AM February 14, 2025 10:27 AM

views 14

पाकिस्तान जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक – ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्था

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात पाकिस्तान जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक असल्याचं सांगितलं आहे. न्यायव्यवस्था आणि समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ही समस्या पसरली असल्याचं देखील अहवालात म्हणलं आहे.   महागाई वाढत असल्यामुळे लोकांना आरोग्यासह अनेक मूलभूत सेव...

February 14, 2025 10:23 AM February 14, 2025 10:23 AM

views 4

अमेरिका भेटीत प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्झ यांची घेतली भेट

अमेरिका भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन डीसी मध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्झ यांचीही भेट घेतली. संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा या मुद्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि अवकाश तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात परस्पर सहकार्या...