आंतरराष्ट्रीय

March 19, 2025 7:27 PM

views 33

सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची ‘ग्रह वापसी’

गेले नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आज पहाटे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर परतले. त्यांचं स्पेसएक्स कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीनं मेक्सिकोच्या आखातात टालाहासीच्या किनाऱ्याजवळ उतरलं. यासोबतच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचे नासाचे निक हे...

March 19, 2025 10:56 AM

views 30

नवी दिल्लीत भारत – नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये बैठक

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री डॉ. आरझू राणा देऊबा यांच्यात नवी दिल्ली इथे बैठक झाली. यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला, विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सहकार्यावर आणि लोकांमधील संबंध आणि राजनैतिक देवाणघेवाण वाढवण्यावर चर्चा केली.   भार...

March 19, 2025 10:42 AM

views 49

युक्रेनमधील उर्जा पायाभूत सुविधा क्षेत्रात युध्दविराम करण्याबाबत सहमती

युक्रेनमधील उर्जा पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील 30 दिवस युध्दविराम करण्याबाबत सहमती झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यादरम्यान 90 मिनिटं दुरस्थ माध्यमातून काल चर्चा झाली. त्यांनतर ही माहिती देण्यात आली. दरम्यान उर्जा क्षेत्रातील युध्दब...

March 18, 2025 8:43 PM

views 24

इस्राईलनं गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या ४०० वर

इस्राईलच्या हवाई दलानं काल रात्री गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांची संख्या ४०० झाली आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते या हल्ल्यात ५०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्राईल आणि हमास यांच्यातल्या संघर्ष विरामासंदर्भातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा हल्ला झाला. ...

March 18, 2025 8:21 PM

views 40

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीच्या दिशेने

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेनं यायला निघाले आहेत. एकूण चार अंतराळवीरांना घेऊन येणारं ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. ताशी सुमारे २७ हजार किलोमीटर वेगानं ते पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करेल.   पृथ्वीपासून १८ हजार फूट उंचीवर आल...

March 18, 2025 10:28 AM

views 37

युक्रेन संघर्ष संपवण्यासंदर्भात अमेरिका – रशियामध्ये चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात युक्रेन संघर्ष संपवण्याबाबत आज चर्चा होणार आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या चर्चेविषयी तयारी सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संध्याकाळी याबाबत घोषणा केली. युक्रेनमधील युद्ध संपवण्याच...

March 17, 2025 8:23 PM

views 29

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विविध क्षेत्रांंमधल्या सहकार्याबाबत ५ करार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज संरक्षण, शिक्षण, क्रीडा, फलोत्पादन आणि वनसंवर्धन या क्षेत्रांंमधे पाच करार झाले. दोन्ही देशांच्या एईओ अर्थात  अधिकृत आर्थिक परिचालक कार्यक्रमांना मान्यता देणारा करारही यावेळी झाला.     मुक्त व्यापार कराराबद्दलच्या वाटाघाटींनाही सुरुवात झाल्याचं दोन्ही देशांनी जाही...

March 17, 2025 8:13 PM

views 26

NASA: सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर उद्या रात्री पृथ्वीवर परतणार

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नऊ महिन्यांहून अधिक काळ अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर उद्या रात्री पृथ्वीवर परतणार आहेत, अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिली आहे. त्यांना स्पेसएक्स क्रू ड्रॅगन यानातून परत आणण्यात येणार आहे. त्यांच्यासह नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अं...

March 17, 2025 7:48 PM

views 25

शैक्षणिक देवाणघेवाण हा भारत आणि न्यूझीलंड देशांतल्या संबंधातला प्रमुख आयाम-राष्ट्रपती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लोकशाही, कायद्याचे राज्य आणि लोकांचे परस्परांशी असलेलं मजबूत नातं यामधे खोलवर रुजलेल्या सामायिक मूल्यांवर आधारित दृढ आणि मित्रत्वाचे संबंध असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं राष्ट्र...

March 17, 2025 9:56 AM

views 28

बलुचिस्तानात झालेल्या हल्ल्यात ९० पाकिस्तानी ठार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा दावा

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात काल झालेल्या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केला आहे. नोशकी भागात महामार्ग क्रमांक 40वरुन फ्रंटिअर काँस्टबुलरी गटाचे सुरक्षा कर्मचारी बसनं प्रवास करत असताना हा हल्ला झाला. बलुचिस्तान मुक्ती सेनेनं या हल्ल्याची जबाबदारी घे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.