आंतरराष्ट्रीय

March 2, 2025 6:03 PM March 2, 2025 6:03 PM

views 17

Firefly Aerospace USA: ब्लू घोस्ट अंतराळयान यशस्वीरीत्या चंद्रावर उतरलं

फायरफ्लाय एअरोस्पेस या अमेरिकन कंपनीचं ब्लू घोस्ट नावाचं अंतराळयान आज यशस्वीरीत्या चंद्रावर उतरलं. या मानवरहित यानात १० उपकरणं बसवलेली आहेत. चंद्रावर उतरणारी फायरफ्लाय ही दुसरी खासगी कंपनी ठरली आहे.

March 1, 2025 8:24 PM March 1, 2025 8:24 PM

views 4

वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागावी – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबीयो

चर्चेदरम्यान झालेल्या वादावादीसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांची माफी मागायला हवी, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबीयो यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांना रशियाला वाटाघाटी करायला राजी करायचं असून रशिया - युक्रेन संघर्ष थांबवायच...

March 1, 2025 11:12 AM March 1, 2025 11:12 AM

views 13

अमेरिका- यूक्रेन दरम्यानची दुर्मिळ खनिजांवरील कराराची चर्चा निष्फळ

अमरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप आणि यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्या दरम्यान दुर्मिळ खनिजांवरील कराराची चर्चा निष्फळ ठरली. चर्चेनंतर ट्रंप यांनी बातमीदारांना सांगितलं की झेलेंस्की हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा द्वेष करतात त्यामुळं झेलेंस्की यांच्यासोबत सहमती होणं कठीण आहे. तर झ...

March 1, 2025 11:28 AM March 1, 2025 11:28 AM

views 4

भारत आणि युरोपिअन आयोगादरम्यान विविध क्षेत्रातील भागीदारीबाबत चर्चा

भारत आणि युरोपिअन आयोगादरम्यान व्यापार, हरित ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्रातील भागीदारी संदर्भात काल नवी दिल्लीत चर्चा झाली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, स्वच्छ आण...

February 28, 2025 2:59 PM February 28, 2025 2:59 PM

views 23

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडावर लादले अतिरीक्त कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर १० टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली आहे. तसंच काल रात्री, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी येत्या मंगळवार पासून कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के कर लावणार असल्याचं स्पष्ट केलं. या महिन्यात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर याआधीच १० ट...

February 27, 2025 9:19 AM February 27, 2025 9:19 AM

views 15

युक्रेन-अमेरिकेदरम्यान खनिज भागीदारी करार आणि संरक्षणाची हमी यासाठी चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की उद्या व्हाईट हाऊसला भेट देतील आणि त्यांच्या देशातल्या दुर्मिळ खनिजांचा हक्क अमेरिकेला देणाऱ्या करारावर स्वाक्षरी करतील, असं जाहीर केलं आहे. युक्रेन युद्धावरही यावेळी एक करार करण्यात येईल. मंत्रिमंडळाच्या पहि...

February 26, 2025 1:23 PM February 26, 2025 1:23 PM

views 11

युक्रेन-अमेरिकेची दुर्मिळ खनिजांच्या उत्खननासह व्यापक आर्थिक कराराबाबत सहमती

युक्रेन आणि अमेरिका यांनी दुर्मिळ खनिजांच्या उत्खननासह व्यापक आर्थिक कराराबाबत सहमती दर्शवली आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानं युक्रेनला तातडीने अमेरिकेची लष्करी मदत मिळणार असल्याची आशा असल्य़ाचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनानं अद्याप या करारावर कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. म...

February 26, 2025 12:58 PM February 26, 2025 12:58 PM

views 5

तांब्यावर जकात कर लावण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्देश

तांब्यावर जकात कर लावण्याचे निर्देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारला दिले आहेत. तांब्यावरील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हे पाऊल महत्वाचं आहे, असं व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

February 25, 2025 1:48 PM February 25, 2025 1:48 PM

views 9

रशियाचा निषेध करणाऱ्या युक्रेनच्या ठरावाला अमेरिकेचा विरोध, भारत-चीन तटस्थ

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत युक्रेनने मांडलेल्या रशियाचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत आणि चीन हे दोन्ही देश अलिप्त राहिले आहेत. तर ठरावाच्या विरोधात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी मतदान केलं आहे. ठरावाच्या बाजूनं ९३, विरोधात १८ आणि ६५ देश गैरहजर राहिल्यानं हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.  दरम्या...

February 24, 2025 1:51 PM February 24, 2025 1:51 PM

views 3

जर्मनी निवडणुकीत विरोधी पक्षांची विजयी आघाडी

जर्मनीमध्ये ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन आणि ख्रिश्चन सोशल युनियन या विरोधी पक्षांनी सर्वसाधारण निवडणुकीत विजयी आघाडी घेतली आहे. या पक्षांचे नेते फ्रेडरिक मर्झ हे पुढचे चॅन्सलर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेप्रमाणेच जर्मनीचे नागरिकही व्यवहारशून्य प्रशासनाला कंटाळले आहेत, अशी प्रतिक्रिया अमेरि...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.