आंतरराष्ट्रीय

March 8, 2025 8:54 PM March 8, 2025 8:54 PM

views 6

Ecuador: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन टोळ्यात झालेल्या गोळीबारात २२ जणांचा मृत्यू

इक्वेडोरच्या गुयाकील शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन टोळ्यात झालेल्या गोळीबारात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. लॉस टिगुरन्स टोळीतल्या सदस्यांमधे वाद झाल्यामुळे हा गोळीबार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

March 8, 2025 8:52 PM March 8, 2025 8:52 PM

views 9

युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या हल्ल्यांमध्ये १४ जण ठार

युक्रेनमधील डोनेस्क आणि खारकीवसह अनेक भागांत रात्रभर सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यांमध्ये १४ जण ठार ठाले. युक्रेनच्या  अधिकाऱ्यांनी सांगितलं की रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं, अनेक रॉकेट आणि ड्रोनच्या सहाय्यानं डोब्रोपिलिआवर हल्ला केला. यात आठ मजली इमारती आणि ३० वाहनांचं नुकसान झालं.    दुसरी...

March 8, 2025 8:50 PM March 8, 2025 8:50 PM

views 26

जपान टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण

जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज अयोध्येतल्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते झालं. भारतात हा पुतळा बनवण्यात आला आहे. आम्ही पुणेकर, इगोदावा इंडिया कल्चरल सेंटर आणि ऑल जपान असोसिएशन यांनी हा पुतळा उभारला आहे.

March 8, 2025 8:40 PM March 8, 2025 8:40 PM

views 8

सिरियातल्या लष्कर आणि बंडखोर यांच्या संघर्षात मृतांची संख्या पाचशेवर

सिरियातल्या किनारी भागात लष्कर आणि बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या लढाईत मरण पावलेल्यांची संख्या पाचशेवर पोहोचली आहे. यात १२० बंडखोर तसंच ९३ लष्करी जवान मरण पावल्याचं  ब्रिटनमधल्या सिरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स या संस्थेनं म्हटलं आहे. बशर अल असद यांच्या सशस्त्र समर्थकांनी सरकारविरोधात बंडखोरी क...

March 8, 2025 2:58 PM March 8, 2025 2:58 PM

views 15

रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

युक्रेनसोबत शांतता करार होत नाही तोपर्यंत रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्यात येईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशिया युक्रेनवर दडपशाही करत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.    ट्रम्प हे मागच्या काही दिवसात रशियाची बाजू घेत होते. त्यामुळे त...

March 7, 2025 2:49 PM March 7, 2025 2:49 PM

views 22

जपानमधील ५० वर्षांहून अधिक काळातील सर्वात भीषण वणवा

जपानच्या ओफुनाटो शहराजवळच्या जंगलात गेल्या ५० वर्षांतल्या सर्वात मोठा वणवा लागला आहे. काल आलेल्या पावसामुळे हा वणवा पसरण्याचा धोका कमी झाला असून त्यामुळे इथल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून लागलेला हा वणवा २ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पसरला आहे. 

March 7, 2025 1:47 PM March 7, 2025 1:47 PM

views 9

अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाची कारवाई

अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांवर ट्रम्प प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या कुटुंबांना राहण्यासाठी टेक्सासच्या डिली इथं दक्षिण टेक्सास फॅमिली रेसिडेंशिअल सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सेंटर सुरू करणाऱ्या एका ठेकेदारानं सांगितलं की, अमेरिकेच्या स्थल...

March 7, 2025 1:46 PM March 7, 2025 1:46 PM

views 14

मुंबई अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका फेटाळली

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा याची भारतातल्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळली आहे. भारतात आपलं प्रत्यार्पण केल्यास आपल्यावर अत्याचार केले जातील त्यामुळे हे प्रत्यार्पण रोखावे अशी मागणी त्याने केली होती. प्रधानमंत्री नरें...

March 7, 2025 1:50 PM March 7, 2025 1:50 PM

views 14

कॅनडा, मेक्सिकोच्या आयातीवर कर लागू करण्याचा निर्णय अमेरिकेनं पुढे ढकलला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर बहुतेक वस्तूंवरचा २५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय एक महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. त्यांनी काल ही घोषणा केली. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कॅनडा आणि मेक्सिकोशी केलेल्या व्यापार कराराचं पालन करणाऱ्या व...

March 5, 2025 9:54 AM March 5, 2025 9:54 AM

views 10

पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात १२ ठार, ३० हून अधिक जखमी

पाकिस्तानमधील वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात काल झालेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १२ जण ठार आणि ३० जण जखमी झाले. मृतांमध्ये चार बालकांचा समावेश आहे. बन्नू कॅन्टोनमेंट परिसरात स्फोटकांनी भरलेली दोन वाहन कॅन्टोनमेंटच्या सीमा भिंतीवर धडकवण्यात येऊन हा हल्ला घडवण्यात आला. जैश – अल – फुरसान या दहशतवादी ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.