आंतरराष्ट्रीय

April 6, 2025 8:41 PM

views 13

अमेरिकेची १० % कर वसूलीला सुरुवात

अमेरिकेनं कालपासून काही देशांकडून १० टक्के इतका कर वसूल करायला सुरुवात केली. ही कर आकारणी काल मध्यरात्रीपासून अमेरिकेतली बंदरं, विमानतळ, सीमा शुल्क गोदामांवर करण्यात येत आहे. या शुल्काची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अधिकृत आदेश काढून केली होती. या निर्णयामुळे अमेरिकचे...

April 6, 2025 1:42 PM

views 39

Myanmar Earthquake : मृतांचा आकडा ३ हजारांवर

म्यानमारमधे झालेल्या भूकंपातला मृतांचा आकडा ३ हजारांवर पोहोचला आहे. तर २००हून अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत. भूकंपाच्या केंद्राजवळ मंडाले इथं संयुक्त राष्ट्रांचे मदत प्रमुख टॉम फ्लेचर यांनी मानवतावादी आणि सामुदायिक संस्थांच्या मदत कार्यांचे कौतुक केलं. भारत आणि इतर देशांमधली पथकं त्या ठिकाणी मदत करत आ...

April 6, 2025 12:57 PM

views 20

इस्रायनं गाझा पट्टीत केलेल्या गोळीबारात १५ आपत्कालीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

इस्रायली  सैनिकांनी गेल्या आठवड्यात राफाजवळ दक्षिण गाझा पट्टीत केलेल्या गोळीबारात १५ आपत्कालीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली इस्रायलच्या लष्करानं दिली आहे. या ताफ्यात पॅलेस्टिनी रेड क्रेसेंट रुग्णवाहिका, संयुक्त राष्ट्रांचं  वाहन आणि अग्निशमन दलाचा समावेश होता. वाहनांचा हा ताफा दिवे न लावता अं...

April 6, 2025 9:35 AM

views 34

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके आज श्रीलंकेतल्या अनुराधापुरा इथं महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय मदतीने विकसित केलेला हा 'महो-ओमानथाई' रेल्वे मार्ग श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागाला राजधानी कोलंबोशी जोडेल,ज्यामुळं प्रादेशिक संपर्क वाढून ...

April 5, 2025 8:11 PM

views 37

प्रधानमंत्र्यांनी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली. यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी २०१५ सालच्या दौऱ्यादरम्यान या स्मारकाला भेट दिली होती. भारतीय शांती सैन्य १९८७ ते १९९० या कालावधीत श्रीलंकेत तैनात होतं. यादरम्यान या दलाचे एक हजार १६९ सैनिक शहीद झाले ...

April 5, 2025 2:17 PM

views 33

डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं – डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन

अमेरिकेच्या वाढत्या दबावाला बळी न पडता आपल्या परस्पर हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं आहे, असं मत डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिका ग्रीनलंड मध्ये दाखवत असलेल्या वाढत्या धोरणात्मक स्वारस्याला अमेरिकेचे उपाध्यक्ष ज...

April 4, 2025 8:27 PM

views 34

अमेरिकी वस्तुंच्या आयातीवर ३४ % अतिरिक्त शुल्क लादल्याची चीनची घोषणा

चीननं आज अमेरिकी वस्तुंच्या आयातीवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादल्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी सुरु केलेलं व्यापारयुद्ध चिघळण्याची आणि मंदी येण्याची भीती वाढली आहे. या दोन आर्थिक महासत्तांमधली तेढ चीननं आणखी काही वस्तुंच्या निर्यातीवर निर्बंध जाहीर केल्यानं, तसंच ...

April 4, 2025 1:34 PM

views 18

यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य – संवैधानिक न्यायालयानं

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य असल्याचं देशाच्या संवैधानिक न्यायालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर प्रसारित निर्णयात न्यायालयाच्या ८ पैकी ६ न्यायाधिशांनी यून यांना पदावरून हटवण्याच्या बाजूनं कौल दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ६० दिवसांच्या आत रा...

April 4, 2025 10:25 AM

views 27

अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारी देशांमधून होणाऱ्या आयातीवर भरमसाठ कर लागू केल्यामुळे अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण होऊन ते दोन वर्षातील नीचांकी पातळीवर आले.अमेरिकी रोखे बाजारांनी दुपारपर्यंत २ पूर्णांक सात लाख कोटी डॉलर्स बाजार भांडवल गमावल्याचं वॉल स्ट्रीटच्या बातमी...

April 3, 2025 8:24 PM

views 30

अफगाणिस्तानी नागरिकांविरोधात पाकिस्तानची कठोर पावलं

अफगाणिस्तानी नागरिकांनी पाकिस्तान सोडून जाण्याची मुदत संपल्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानचं ओळखपत्र असणाऱ्या हजारो नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना छावण्यांमधे हवलण्यात आलं आहे. अंमलबजावणी संस्थांनी अफगाणी नागरिकांना परत पाठवायची प्र...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.