आंतरराष्ट्रीय

March 22, 2025 8:23 PM March 22, 2025 8:23 PM

views 8

रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला

लेबाननमधून इस्त्रायलवर रॉकेटचा मारा झाल्यानंतर इस्त्रायलनं दक्षिण लेबाननच्या नियंत्रण कक्षावर रॉकेटनं प्रतिहल्ला चढवल्याची माहिती इस्त्रायलनं दिली आहे. नोव्हेंबरमधे युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीचा हा पहिलाच हल्ला आहे.  इस्त्रायलच्या संरक्षण दलांना ही कारवाई करायला भाग पाडलं गेल्याचं इस्त्राय...

March 22, 2025 8:10 PM March 22, 2025 8:10 PM

views 19

नायजरमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू, तर १३ जण जखमी

नायजर मध्ये काल दुपारी एका मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ४४ जण मृत्युमुखी पडले तर १३ जण जखमी झाले. हल्ल्याचं ठिकाण हे नायजर, बुर्किना फासो आणि माली या  तीन देशांच्या सीमावर्ती भागात असून, पश्चिम आफ्रिकेतलं अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटांचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. इस्लामिक स्टेटशी संबंधित ...

March 22, 2025 7:09 PM March 22, 2025 7:09 PM

views 3

इस्तांबूलच्या महापौरांच्या अटकेविरोधात निदर्शनं, ३०० हून अधिकजण ताब्यात

इस्तांबूलचे महापौर एकरेम इमामोगलू यांना अटक केल्याच्या निषेधार्थ तुर्कस्थानच्या विविध शहरांत निदर्शनं करणाऱ्या सुमारे ३०० निदर्शकांना तुर्की पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भ्रष्टाचार आणि दहशतवादाशी संबंध असल्याच्या कथित आरोपावरून इमामोगलू यांना अटक केल्यानंतर गेल्या बुधवारपासून तुर्कस्थानच्या अनेक शहर...

March 22, 2025 3:02 PM March 22, 2025 3:02 PM

views 7

‘नेतुम्बो नंदी नदैतवाह’ यांनी देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून घेतली शपथ

नामिबियामध्ये ‘नेतुम्बो नंदी नदैतवाह’  यांनी देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ७२ वर्षाच्या नंदी यांनी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत ५८ टक्के मतांनी विजय मिळवला. फेब्रुवारी २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष हेंगे गिनगोब यांच्या निधनानंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून क...

March 22, 2025 2:58 PM March 22, 2025 2:58 PM

views 5

… या ४ देशातल्या नागरिकांचं कायदेशीर संरक्षण अमेरिका काढून घेणार

क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला या देशांच्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लाखो नागरिकांना मिळत असलेलं कायदेशीर संरक्षण येत्या महिन्याभरात काढून घेत त्यांच्या हद्दपारीचा मार्ग अंतिम टप्प्यात असल्याचं अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागानं म्हटलं आहे.   हे निर्देश ऑक्टोबर २०२२ पासून अमेरिकेत र...

March 22, 2025 2:49 PM March 22, 2025 2:49 PM

views 10

जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं निधन

     जगप्रसिद्ध  मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं काल रात्री निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. बॉक्सिंग रिंगमधले ‘बिग जॉर्ज’ म्हणून ओळखले जाणारे, फोरमन, यांची कारकीर्द बॉक्सिंग इतिहासातली सर्वात अतुलनीय आणि दिर्घ काळाची ठरली.   १९६८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकून त्यांनी जागतिक पटलावर पह...

March 22, 2025 10:49 AM March 22, 2025 10:49 AM

views 4

इस्रायलच्या सैन्याला गाझाचे अधिक भूभाग ताब्यात घेण्याचे आदेश

इस्रायल आणि गाझामधील युद्धविराम संपल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत चालला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काटझ् यांनी सैन्याला गाझाची अधिक भूभाग ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.   पॅलेस्टिनी भूभागातून ताब्यात घेतलेल्या उर्वरीत ओलिसांना मुक्त करत नाही तोपर्यंत तो भूभाग अंशतः ताब्यात घेण्...

March 22, 2025 9:52 AM March 22, 2025 9:52 AM

views 5

लंडनच्या हिथ्रो विमानतळावरची उड्डाण सेवा पूर्ववत

लंडनमधील सर्वात मोठ्या हिथ्रो विमानतळाचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून आता विमानसेवा पूर्ववत सुरू झाली असल्याचं या विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.   विमानतळाची वीज काल खंडीत झाल्यानंतर हवाईवाहातूक दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आली. विमानसेवा विस्कळीत झाली. वीजपुरवठा करणाऱ्या उपस्थ...

March 21, 2025 1:35 PM March 21, 2025 1:35 PM

views 7

लंडनमध्ये भीषण आग, हीथ्रो विमानतळ बंद

लंडनमध्ये एका विद्युत उपकेंद्राला आग लागली असून त्यातून दीडशे जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पश्चिम लंडन भागातल्या या उपकेंद्राला काल रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि ७० कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग लागण्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, त्यामुळे लंडनच्या ...

March 21, 2025 1:41 PM March 21, 2025 1:41 PM

views 21

हमासचे इस्त्राइलवर रॉकेट हल्ले

इस्रायलनं गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाया सुरू केल्यानंतर हमासने प्रथमच प्रत्युत्तरादाखल तेल अविववर रॉकेट हल्ले केले आहेत. त्यापैकी एक रॉकेट निकामी करण्यात आलं असून इतर दोन रॉकेट निर्जन क्षेत्रात पडल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं सांगितलं.   दरम्यान, गाझामध्ये हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं स...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.