आंतरराष्ट्रीय

March 27, 2025 1:28 PM March 27, 2025 1:28 PM

views 3

इस्रायली सैन्याने गाझापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले

इस्रायली सैन्याने गाझापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले असून १८ मार्चपासून ते आजपर्यंत ४३०हून अधिक ठिकाणांवर हल्ले झाल्याचं हमासच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. या हल्ल्यांमुळे दोन महिन्यांच्या युद्धबंदी कराराचं उल्लंघन झाल्याचंही हमासने म्हटलं आहे.   या हल्ल्यांमध्ये सुमारे ८३० जणांचा म...

March 26, 2025 3:10 PM March 26, 2025 3:10 PM

views 8

दक्षिण कोरियात वणव्यामुळे १८ जणांचा मृत्यू, १९ जखमी

दक्षिण कोरियाच्या आग्नेय भागात लागलेल्या वणव्यामुळे किमान १८ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत. सुमारे २३ हजारांहून अधिक जणांना बाहेर काढण्यात आलं असून शेकडो इमारतींचं नुकसान झालं आहे. अनेक वारसास्थळांचंही या वणव्यामुळे नुकसान झालं असून त्यात तेराशे वर्षं जुन्या बौद्ध मंदिराचाही समावेश आहे....

March 26, 2025 9:23 AM March 26, 2025 9:23 AM

views 6

अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल अनिवार्य करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या बदलांनुसार मतदार-नोंदणीसाठी नागरिकत्वाचा कागदोपत्री पुरावा आवश्यक असून निवडणुकीच्या दिवसापर्यंत सर्व मतपत्रिका मिळण्याची खात्री करणं आवश्यक आहे.

March 25, 2025 3:30 PM March 25, 2025 3:30 PM

views 6

ग्रीनलँडचे प्रधानमंत्री म्यूट बी. एगेडे यांची अमेरिकेच्या नियोजित दौऱ्यावर टीका

ग्रीनलँडचे प्रधानमंत्री म्यूट बी. एगेडे यांनी अमेरिकेच्या नियोजित दौऱ्यावर टीका केली आहे. अमेरिका हा दौरा ग्रीनलँडवर जबरदस्तीने दबाव टाकण्यासाठी करत असल्याचं एगेडे यांनी म्हटलं आहे.  ट्रम्प प्रशासनाच्या ग्रीनलँडच्या नियोजित दौऱ्याचे नेतृत्व उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या पत्नी उषा व्हान्स, व्हाईट हा...

March 25, 2025 3:27 PM March 25, 2025 3:27 PM

views 5

United Nations Security Council: जम्मू-काश्मीर कायमच भारताचा अविभाज्य भाग

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना भारताचे संयुक्त राष्ट्रांमधले राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानने काश्मीरचा वारंवार उल्लेख केल्याबद्दल टीका केली. जम्मू आणि काश्मीर हा कायमच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे असं सांगत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुधारणांवरच्या चर्चेत पाकिस्...

March 24, 2025 2:47 PM March 24, 2025 2:47 PM

views 6

कॅनडामध्ये येत्या २८ एप्रिलला निवडणुका होणार

कॅनडामध्ये येत्या २८ एप्रिल रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी रविवारी गर्व्हनर जनरल मेरी सायमन यांची भेट घेऊन संसद विसर्जित करण्याची विनंती केली होती. ती सायमन यांनी मान्य केली  आहे. त्यामुळं या आगामी निवडणुकांमध्ये कार्नी यांचा सामना कंझर्व्...

March 23, 2025 8:24 PM March 23, 2025 8:24 PM

views 12

अफगाणिस्तान गृहमंत्र्यांसह तालिबान संघटनेच्या ३ नेत्यांवर अमेरिकेनं लावलेलं बक्षीस मागे

अफगाणिस्तानचे गृहमंत्री सिराजउद्दीन हक्कानी यांच्यासह तालिबान संघटनेच्या ३ नेत्यांवर अमेरिकेनं लावलेलं बक्षीस मागे घेतलं आहे.  सिराजउद्दीन हक्कानी हे अफगाणिस्तानातलं यापूर्वीचं सरकार उलथून टाकणाऱ्या हक्कानी  नेटवर्कचे प्रमुख आहेत. घातक शस्त्रास्त्र निर्मिती आणि हल्ले यासाठी  हे नेटवर्क ओळखलं जातं. त...

March 23, 2025 8:17 PM March 23, 2025 8:17 PM

views 21

इस्रायल-हमास युद्धात ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायल-हमास युद्धात ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले असल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. या संघर्षात सुमारे १ लाख १३ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. आज ही ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली. गेल्या आठवड्यात इस्रायलने अचानक हवाई हल्ले करत युद्धबंदी संपवल्यापासून ६७३ लोकांचा मृत्यू झ...

March 23, 2025 8:13 PM March 23, 2025 8:13 PM

views 13

दक्षिण कोरियात जंगलात लागलेल्या आगीमुळे अंतर्गत मंत्रालय भागात आपत्ती घोषित

दक्षिण कोरियात  जंगलात लागलेल्या आगीमुळे अंतर्गत मंत्रालयानं या भागात  आपत्ती घोषित केली आहे. ही आग देशाच्या आग्नेय भागातल्या जंगलांना लागली आहे. या आगीत कमीत कमी ४ जणांचा मृत्यू झाला असून प्रचंड नुकसान झालं आहे. उत्तर आणि दक्षिण ग्योंगसांग प्रांतात तसंच  आग्नेयेला उल्सान शहराला आग  लागली आहे.  &nbs...

March 23, 2025 11:20 AM March 23, 2025 11:20 AM

views 14

इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते सलाह अल-बर्दावील ठार

गाझामध्ये, खान युनिस इथे इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते सलाह अल-बर्दावील ठार झाले. हमास आणि पॅलेस्टिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, दक्षिण गाझा पट्टीतील बर्दावील इथे हा हल्ला झाला, यामध्ये त्यांच्या पत्नीसह त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान, काल सकाळपासून विविध ठिकाणी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.