आंतरराष्ट्रीय

April 11, 2025 2:50 PM April 11, 2025 2:50 PM

views 688

ईराणनच्या आण्विक धोरणाबाबत अमेरिका त्यांच्याशी थेट चर्चा करणार

ईराणनं जाहीर केलेल्या आण्विक धोरणाबाबत अमेरिका  त्यांच्याशी थेट चर्चा करणार असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आज सांगितलं. ही चर्चा उद्या ओमान इथं होणार असून त्यासाठी दोन्ही देशांची शिष्टमंडळं उद्या दुपारी मस्कतमध्ये दाखल होतील.

April 11, 2025 2:44 PM April 11, 2025 2:44 PM

views 17

युरोपीय संघाची आयात शुल्काला स्थगिती

अमेरिकेने जाहीर केलेल्या आयात शुल्काला ९० दिवसांकरता स्थगिती दिल्यानंतर युरोपीय संघानंही प्रत्युत्तरात जाहीर केलेली आयात शुल्कवाढ थांबवली आहे. युरोपीयन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देल लेयेन यांनी काल समाजमाध्यमावर हा निर्णय जाहीर केला.   अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी युरोपीय देशांमधून...

April 11, 2025 2:37 PM April 11, 2025 2:37 PM

views 6

अमेरिकेने टॅरिफ लागू करायला स्थगिती दिल्यानंतर भारतीय शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम

  अमेरिकेने टॅरिफ लागू करायला ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर झालेल्या घडामोडींचे सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झाले. बाजार सुरू झाल्यापासून ते दुपारपर्यंत ही वाढ कायम राहिली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पंधराशेहून अधिक अंकांनी वाढून ७५ हजार ३००च्या आसपास व्यवहार करतो आहे...

April 11, 2025 10:03 AM April 11, 2025 10:03 AM

views 8

दहशतवादाच्या जागतिक संकटाशी लढण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करत राहतील- टॅमी ब्रूस

दहशतवादाच्या जागतिक संकटाशी लढण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करत राहतील. असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी केंद्र सरकारनं नरेंदर मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे. ह...

April 10, 2025 2:40 PM April 10, 2025 2:40 PM

views 5

डोमिनिकन रिपब्लिकमध्येक्लबचं छत कोसळून १८४ जणांचा मृत्यू

डोमिनिक रिपब्लिक या देशाच्या राजधानीत, सॅन्टो डोमिंगो इथे एका नाईट क्लबचं छत कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांचा आकडा १८४ झाला आहे. आपत्कालीन पथकांमार्फत बचावकार्य सुरु आहे आतापर्यंत १४५ जणांना वाचवण्यात आलं आहे. २० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून किमान आठ जणांची प्रकृती गंभीर आहे....

April 10, 2025 10:43 AM April 10, 2025 10:43 AM

views 6

चीन वगळता सर्व देशांसाठीच्या प्रत्युत्तर करावर ९० दिवसांचा विराम देण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांसाठीच्या प्रत्युत्तर करावर ९० दिवसांचा विराम देण्याची घोषणा केली आहे. एका समाज माध्यमावरील संदेशात, ९० दिवसांची ही सवलत प्रत्युत्तर करावर आणि १० टक्के करांवर लागू होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आमच्या कर योजनेचा भाग म्हणून या कराला ९० दिव...

April 9, 2025 8:17 PM April 9, 2025 8:17 PM

views 3

डोमिनिक रिपब्लिकमध्ये नाईट क्लबचं छत कोसळून ११३ जणांचा मृत्यू

डोमिनिक रिपब्लिक या देशाच्या राजधानीत ,सॅन्टो डोमिंगो इथे एका नाईट क्लबचं छत कोसळून झालेल्या अपघातात सुमारे ११३ लोक ठार झाले तर १५० हुन अधिक जण जखमी झाले. लोकप्रिय गायक रुबी पेरेझ याच्या गाण्याची मैफल रंगात आली असताना हा प्रकार घडला. मृतांमध्ये रूबीचा देखील समावेश आहे. माजी खेळाडू आणि तिथल्या परगण्य...

April 9, 2025 8:46 PM April 9, 2025 8:46 PM

views 9

अमेरिकेवरुन आयात होणाऱ्या वस्तूंवर ८४ % शुल्क लादण्याचा चीनचा निर्णय

अमेरिकेवरुन आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरीक्त ८४ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय चीननं घेतला आहे. उद्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होईल, असं चीनच्या अर्थमंत्रालयानं जाहीर केलं आहे.    अमेरिकेनं चीनी उत्पादनांवर १०४ टक्के आयात शुल्क लादल्यानंतर चीननं हा निर्णय घेतला आहे. अमेरिकन जागतिक व्यापार व...

April 9, 2025 1:57 PM April 9, 2025 1:57 PM

views 4

बिम्सटेक देशांच्या कृषिमंत्र्यांची आज नेपाळमध्ये काठमांडू इथं बैठक

बिम्सटेक देशांच्या कृषिमंत्र्यांची आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं बैठक होत आहे. देशांमधील कृषिक्षेत्र फायदेशीर बनवणं आणि त्यासाठी परस्पर आदानप्रदान वाढवणं हा त्यामागचा हेतू असून याविषयी तज्ज्ञांच्या सहाय्यानं यामध्ये चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्य...

April 9, 2025 1:54 PM April 9, 2025 1:54 PM

views 17

म्यानमारच्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ३ हजार ६४५ वर

म्यानमारला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता ३ हजार ६४५ वर पोचली आहे. एकंदर ५ हजार १७ लोक जखमी झाले असून, १४८ नागरीक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं काल संध्याकाळी दिली आहे. २८ मार्चला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत ९८ भूकंपाचे धक्के बसल्याचं म्यानमाच्या हवामानशा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.