आंतरराष्ट्रीय

April 13, 2025 7:51 PM April 13, 2025 7:51 PM

views 10

रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधल्या ३२ नागरिकांचा मृत्यू, ८४ जण गंभीर

युक्रेनच्या ईशान्य भागातील सुमी शहरात आज रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन मुलांसह ३२ लोक ठार झाले तर, ८४ जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींमध्ये दहा लहान मुलांचाही समावेश असल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.  पाम संडेच्या निमित्तानं नागरिक मोठ्या सं...

April 13, 2025 7:44 PM April 13, 2025 7:44 PM

views 4

गाझामधल्या शेवटच्या कार्यरत रुग्णालयावर इस्त्रायलचा हवाई हल्ला

गाझामधलं शेवटचं पूर्णपणे कार्यरत रुग्णालय अल अहली बॅप्टिस्ट रुग्णालयाचा काही भाग इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे.  या रुग्णालयात हमासचे कमांड आणि कंट्रोल केंद्र असल्यामुळे या रुग्णालयावर हल्ला केल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलं आहे. गाझाच्या नागरी आपत्कालीन सेवेनुसार, या ह...

April 13, 2025 8:14 PM April 13, 2025 8:14 PM

views 4

म्यानमारला ५.५ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

म्यानमारला सकाळी ५ पूर्णांक ५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचं केंद्र मंडाले इथल्या वुंडविन शहरापासून ईशान्येला असल्याचं म्यानमारच्या हवामान शास्त्र आणि जलशास्त्र विभागाने सांगितलं आहे. म्यानमारला शुक्रवारी सकाळीही भूकंपाचा धक्का बसला होता. गेल्या महिन्यात २८ तारखेला झालेल्या भूकंपानंतर ...

April 13, 2025 2:27 PM April 13, 2025 2:27 PM

views 11

स्मार्टफोन, संगणक यांना सवलत देण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेने नव्याने जाहीर केलेल्या करांमधून स्मार्टफोन आणि संगणक यांना सवलत देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या जकात आणि सीमा सुरक्षा विभागाने दिलेल्या सुचनांनुसार, अमेरिकेत आयात होणाऱ्या या दोन्ही वस्तूंसाठी बहुतेक देशांसह चीनला देखील अतिरिक्त करातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा सेमी...

April 12, 2025 8:22 PM April 12, 2025 8:22 PM

views 41

सुदानच्या दारफूर इथं RSF नं केलेल्या हल्ल्यात किमान ३२ नागरिक ठार

सुदानच्या दारफूर इथं RSF नं काल केलेल्या हल्ल्यात किमान ३२ नागरिक ठार झाल्याचा दावा सुदानच्या लष्करानं केला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि दहा मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात १७ नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. आरएसएफनं आत्मघाती ड्रोन हल्ला केला तसंच अनेक ठिकाणी गोळीबारही केल्य...

April 12, 2025 8:03 PM April 12, 2025 8:03 PM

views 21

चीन बीजिंगमध्ये वादळामुळे ८३८ उड्डाणे रद्द, रेल्वे सेवाही विस्कळीत

चीनमध्ये बीजिंग आणि उत्तर भागात आलेल्या वादळामुळे शेकडो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर काही हाय-स्पीड रेल्वे मार्गावरच्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. बीजिंगच्या दोन्ही प्रमुख विमानतळांवर ८३८ उड्डाण रद्द करण्यात आली. बीजिंगमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्याची ही दशकातली पहिलीच वेळ आहे. ताशी १५० किलो...

April 12, 2025 2:46 PM April 12, 2025 2:46 PM

views 17

नायटेड किंग्डम मध्ये आजपासून युरोपमधल्या देशांमधून मांस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर बंदी

युरोपमधल्या प्राण्यांमध्ये फूट अँड माऊथ आजार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर युनायटेड किंग्डमनं आजपासून युरोपमधल्या देशांमधून मांस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर बंदी घातली आहे. युकेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आपल्यासोबच वैयक्तिक वापरासाठी मेंढी, बकरी, गाय, डुकराचे मांस आणि दुग्धजन्य पदार्थ आ...

April 12, 2025 9:11 PM April 12, 2025 9:11 PM

views 6

राज्यातल्या २ जलविद्युत प्रकल्पांना केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची मंजुरी

केंद्रीय विद्युत प्राधिकरणानं साडेसात गिगावॅट क्षमतेच्या सहा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांना आज मंजुरी दिली आहे. यात रायगड जिल्ह्यात भिवपुरी इथं एक हजार मेगावॅट तर नाशिक जिल्ह्यात इगतपुरी जवळ असलेल्या भावली इथं दीड हजार मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे. इतर प्रकल्प ओदिशा, कर्नाट...

April 12, 2025 1:35 PM April 12, 2025 1:35 PM

views 7

३० दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांनी अमेरिकन सरकारकडे नोंदणी करणं अनिवार्य

अमेरिकेत ३० दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या सर्व परदेशी नागरिकांनी संघीय सरकारकडे नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं अमेरिकी सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचे पालन न केल्यास त्यांना कठोर दंड, तुरुंगवास, तसंच हद्दपारीला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे.   नवीन नियमानुसार सर्व व्हिसा धारक आणि व...

April 12, 2025 1:07 PM April 12, 2025 1:07 PM

views 17

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सेंट पीटर्सबर्ग इथं भेट घेतली. यावेळी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. रशियाचे विशेष दूत किरील दिमित्रीव्ह यांनी ही चर्चा फलदायी झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये श...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.