आंतरराष्ट्रीय

May 24, 2025 1:42 PM May 24, 2025 1:42 PM

views 12

दहशतवादाविरुद्ध लढाईला जर्मनीच्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून कृतज्ञता व्यक्त

भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला आणि स्वतःचं संरक्षण  करण्याच्या अधिकाराला जर्मनीनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बर्लिन इथल्या ‘जर्मन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ या विषयावरील परिसंवादाला संबोधित करताना ते बोलत होते. जर्मनीनं अगदी सुरुवातीला...

May 23, 2025 9:00 PM May 23, 2025 9:00 PM

views 9

भारत-जर्मनी धोरणात्मक संबंध वाढवण्यावर दोन्ही देशांनी घेतली शपथ

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस.जयशंकर यांनी आज बर्लिन इथं जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली.  दहशतवादाविरोधात भारत देत असलेल्या लढ्यात जर्मनीनं दिलेल्या साथीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे त्यांचे आभार मानले. भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी आणि विस्तारित करण्...

May 23, 2025 7:24 PM May 23, 2025 7:24 PM

views 9

अमेरिका-इराण अण्वस्त्र विषयक चर्चेची पाचवी फेरी सुरू

अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असलेल्या अण्वस्त्र विषयक चर्चेची पाचवी फेरी आज इटलीतल्या रोममध्ये सुरु झाली आहे.  यापूर्वी लादलेले आर्थिक निर्बंध शिथिल करण्याच्या मोबदल्यात इराणच्या अण्वस्त्र विषयक उपक्रमाला आळा घालण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे. मात्र यापूर्वी झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीदरम्यान इराणन...

May 23, 2025 11:33 AM May 23, 2025 11:33 AM

views 6

अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चेची पाचवी फेरी आज रोम इथं

अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चेची पाचवी फेरी आज रोम इथं आयोजित करण्यात आली आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमद बिन हमूद अल्बुसैदी यांनी ही घोषणा केली. एप्रिलपासून आतापर्यंत झालेल्या चर्चेच्या चार फेऱ्यांपैकी तीन मस्कतमध्ये तर एक रोममध्ये पार पडल्या.   इराणचा अणुकार्यक्र...

May 23, 2025 9:30 AM May 23, 2025 9:30 AM

views 4

हावर्ड विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर ट्रम्प प्रशासनाकडून बंदी

अमेरिकेतल्या हावर्ड विद्यापीठाला परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीची परवानगी ट्रम्प प्रशासनाने काल रद्द केली. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने दिलेल्या निवेदनामध्ये, हावर्ड आता परदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी करु शकत नसल्याचे आणि विद्यमान परदेशी विद्यार्थ्यांना यांना स्थानांतर करावे लागेल किंवा...

May 22, 2025 2:49 PM May 22, 2025 2:49 PM

views 24

पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याचं निलंबन

पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याला निलंबित केलं असून त्यांना २४ तासाच्या आत पाकिस्तान सोडायलाही सांगण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांची वर्तणूक पदाला साजेशी नसल्याचं कारण देत हे आदेश देण्यात आल्याचं पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे. या आधी भारतानंही पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला ...

May 22, 2025 2:51 PM May 22, 2025 2:51 PM

views 14

अमेरिका – इराणमधली चर्चेची पाचवी फेरी उद्या होणार

अमेरिका आणि इराण मधली चर्चेची पाचवी फेरी उद्या होणार आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमाद बिन हमुद अल्बुसैदी यांनी ही घोषणा केली. इराणच्या अणू कार्यक्रमावर अमेरिकेनं लागू केलेले निर्बंध हटवण्याबाबत चर्चेच्या या फेऱ्या सुरु आहेत. अमेरिकेकडून होत असलेल्या अवाजवी मागण्यांमुळे या चर्चेत सहभा...

May 22, 2025 10:10 AM May 22, 2025 10:10 AM

views 4

इस्राइलच्या हल्ल्यात गाझा भागातल्या 82 नागरिकांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय स्तरावरुन वारंवार टीका होत असून देखील इस्राइलच्या लष्करानं गाझा पट्टीत हल्ले करणं अद्याप सुरूच ठेवलं आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं आणि स्थानिक रुग्णालयांनी दिलेल्या आकडेवारीनुसार अनेक महिलांसह किमान 82 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात हिजबुल संघटनेच्या प्रमुख रदवान दलाचा कमा...

May 21, 2025 10:09 AM May 21, 2025 10:09 AM

views 16

भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी शिष्टमंडळ रवाना होण्यास सुरुवात

ऑपरेशन सिंदूरवरील भारताच्या राजनैतिक संपर्कासाठी स्थापन केलेल्या सातपैकी पहिले सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज चार देशांना रवाना होत आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ युएई, लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि सिएरा लिओनला रवाना होईल. गुरुवारी खासदार संजय झा यांच्या ...

May 20, 2025 1:23 PM May 20, 2025 1:23 PM

views 19

अफगाणी नागरिकांना भारताची मदत

पाकिस्ताननं त्यांच्या देशातल्या अफगाणी नागरिकांना परत पाठवायला सुुरुवात केली असून भारतानं या कुटुंबांना मानवीय दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे. पाकिस्ताननं पाच हजार अफगाणी कुटुंबांना परत पाठवलं होतं. भारतानं या कुटुंबांना ११ प्रकारची अन्न पाकिटं पुरवली आहेत. काबुलच्या स्थलांतरीत निदेशालयातर्फे या मदतीच...