आंतरराष्ट्रीय

June 11, 2025 3:28 PM June 11, 2025 3:28 PM

views 14

लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्निया प्रांतांमध्ये कालपासून जमावबंदी लागू

अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्निया प्रांतांमध्ये कालपासून मर्यादित स्वरुपाची जमावबंदी लागू केली आहे. रात्री आठ ते सकाळी सहा या वेळात कर्फ्यू लागू असेल आणि तेथे कामासाठी येणाऱ्यांना तो लागू नसेल, असं गवर्नर कॅरेन बास यांनी स्पष्ट केलं. लॉस एंजेलिसमध्ये लुटालुटीच्या तसंच हिंसाचाराच्या घटनांना आ...

June 11, 2025 3:25 PM June 11, 2025 3:25 PM

views 27

व्यापारातला तणाव कमी करण्यासाठीच्या प्राथमिक आराखड्यावर अमेरिका आणि चीन यांच्यात सहमती

व्यापारातला तणाव कमी करण्यासाठीच्या प्राथमिक आराखड्यावर अमेरिका आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. अमेरिका आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लंडनमध्ये २ दिवस झालेल्या चर्चेनंतर ही सहमती झाली आहे. आता या व्यापार कराराचा आराखडा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांन...

June 11, 2025 12:43 PM June 11, 2025 12:43 PM

views 9

कर्करोगाच्या नमुन्यांचं सुरक्षितपणे विश्लेषण करणासाठी एआयची निर्मिती

जगभरातल्या विविध प्रकारच्या कर्करोगाच्या नमुन्यांचं सुरक्षितपणे विश्लेषण करणारं एक एआय तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानामुळे कर्करोग्याची गोपनीयता सुरक्षित राखत उपचारपद्धतींवरही भर देता येणार आहे. या संपूर्ण संशोधनात सहा देशांमधल्या ३० संशोधन गटांनी गोळा केलेल्या कर्करोगाच्या...

June 7, 2025 1:27 PM June 7, 2025 1:27 PM

views 45

रशियानं युक्रेनच्या खारकिव्ह शहरावर केलेल्या हल्ल्यात 3 ठार, २१ जण जखमी

युक्रेनच्या खारकिव्ह शहरावर रशियानं केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान ३ जण ठार, तर २१ इतर जखमी झाले आहेत. गेल्या काही आठवड्यांतला रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. यात १८ इमारती आणि १३ घरांचं नुकसान झालं आहे.

June 6, 2025 8:34 PM June 6, 2025 8:34 PM

views 12

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या, हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यापासून परदेशी विद्यार्थ्यांना थांबवण्याच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या, हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यापासून परदेशी विद्यार्थ्यांना थांबवण्याच्या आदेशाला अमेरिकेतल्या बोस्टन इथल्या न्यायालयानं आज तात्पुरती स्थगिती दिली. ट्रम्प यांचा हा निर्णय बेकायदा असल्याचं सांगून या निर्णयाविरोधात हार्वर्ड विद्यापीठानं न्यायालयात धाव घेतली...

June 6, 2025 8:31 PM June 6, 2025 8:31 PM

views 5

जकार्ता इथं सुरु इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या जोडीचा पराभव

जकार्ता इथं सुरु इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या जोडीचा पराभव झाला आहे. यामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

June 6, 2025 8:27 PM June 6, 2025 8:27 PM

views 50

यूक्रेनचे १७४ ड्रोन रशियानं केले नष्ट

रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने यूक्रेनचे १७४ ड्रोन अडवून ते नष्ट केले आहेत. मॉस्को, क्रिमिया यासह अनेक ठिकाणांच्या दिशेने हे ड्रोन येत असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. तसंच, काळ्या समुद्रावरून येणारी यूक्रेनची क्षेपणास्त्रंही रशियाने नष्ट केली आहेत. या दुर्घटनांमध्ये तीन जण जखमी...

June 6, 2025 8:25 PM June 6, 2025 8:25 PM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महिना अखेरीला कॅनडामध्ये होणाऱ्या जी-सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस कॅनडामध्ये होणाऱ्या जी- सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जी- सेव्हन शिखर परिषदेसाठी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी आमंत्रित केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच कार्नी यांना निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल...

June 6, 2025 8:16 PM June 6, 2025 8:16 PM

views 6

तहव्वुर हुसैन राणाच्या न्यायालयीन कोठडीत ९ जुलैपर्यंत वाढ

दिल्ली न्यायालयानं २६/११ मुंबई हल्ल्यातला आरोपी तहव्वुर हुसैन राणा याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत पुढील महिन्याच्या ९ तारखेपर्यंत वाढवली आहे. राणाच्या वकिलाने त्याच्या आरोग्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केल्यावर पटियाला हाऊस कोर्टानं तिहार जेल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

June 5, 2025 1:35 PM June 5, 2025 1:35 PM

views 12

अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेअंतर्गत व्हिसावरील तात्पुरत्या सहा महिन्यांचा निलंबनाची आणि आवश्यकता वाटल्यास निलंबनाचा कालावधी वाढवण्याची तरतूद आहे. या अधिसूचनेअंतर्गत ट्रम्प प्...