आंतरराष्ट्रीय

June 23, 2025 1:08 PM June 23, 2025 1:08 PM

views 3

शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचं भावनिक आवाहन

इराणवर अमेरिकेनं काल केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या न्यू यॉर्कमधील मुख्यालयात सुरक्षा परिषदेचं आपत्कालीन विशेष सत्र काल पार पडलं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या भागात शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात IAEA च्या...

June 23, 2025 10:30 AM June 23, 2025 10:30 AM

views 4

इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची मॉस्को इथं पोहचले

इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सईद अब्बास अराघची आज चर्चेसाठी रशियातील मॉस्को इथं पोहोचले आहेत. अमेरिकेने केलेल्या लष्करी आक्रमणानंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करण्याची शक्यता आहे.

June 22, 2025 8:00 PM June 22, 2025 8:00 PM

views 28

अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया…

इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यूनायटेड किंग्डमचे प्रधानमंत्री केयर स्टार्मर यांनी प्रादेशित स्थैर्याचं महत्त्व अधोरेखित करताना अमेरिकेच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे.   इराणचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एक गंभ...

June 22, 2025 7:52 PM June 22, 2025 7:52 PM

views 19

इराणच्या अण्वस्त्र तळांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हवाई प्रवासात व्यत्यय

अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातल्या हवाई प्रवासात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहेत. सुरक्षा, विलंब, उड्डाणाच्या वेळापत्रकात होणारे बदल आणि त्यामुळे वाढता खर्च या कारणांमुळे विमान कंपन्या आता या प्रदेशाचं हवाई क्षेत्र टाळत आहेत. इराण, इराक, सीरिया आणि इस्रायल य...

June 22, 2025 1:47 PM June 22, 2025 1:47 PM

views 16

इस्रायलने केलं अमेरिकेच्या कारवाईचं स्वागत, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता

इराणच्या अण्वस्त्र तळांवर हल्ला करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. नेतन्याहू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्रम्प यांचं कौतुक केलं.    दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटे...

June 22, 2025 7:37 PM June 22, 2025 7:37 PM

views 16

अमेरिकेच्या हल्ल्यांचा इराणकडून तीव्र निषेध

अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यांचा इराणनं तीव्र निषेध केला आहे. अमेरिकी सैन्यानं केलेला हल्ला आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांची सनद आणि अण्वस्त्र प्रसार विरोधी कायद्याचं उल्लंघन करणारा आहे, असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सईद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. या हल्ल्य...

June 22, 2025 1:34 PM June 22, 2025 1:34 PM

views 15

इस्रायली लष्कराचं पश्चिम इराणमधल्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली लष्करानं पश्चिम इराणमधल्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इस्रायली सीमेनजीक इराणच्या हल्ल्यासाठी सज्ज असलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपकांवर तसंच इराणच्या सशस्त्र दलातल्या सैनिकांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलांनी आपल्या समाज माध्यम...

June 22, 2025 1:25 PM June 22, 2025 1:25 PM

views 8

इराणच्या ३ अणुप्रकल्पांवर अमेरिकेचा हल्ला

इराण-इस्रायल संघर्षात आता अमेरिकेनं जाहीररीत्या उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला केला असून, हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेची सर्व विमानं इराणी हवाई हद्दीबाहेर आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमध्यमावरील संदेशातून जाहीर केलं आहे. इतर कोणताही पर्याय शिल...

June 21, 2025 2:51 PM June 21, 2025 2:51 PM

views 14

मॉस्कोच्या कृती आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलं जाईल- व्लादिमिर पुतीन

भारत आणि रशिया दरम्यानच्या दीर्घकालीन सहकार्याबाबत मॉस्कोच्या कृती आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलं जाईल असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटलं आहे. ते काल सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचाच्या पूर्ण सत्राला संबोधित करत होते.    ‘सामायिक मूल्य:बहुध्रुवीय जगातला विकासा...

June 21, 2025 2:42 PM June 21, 2025 2:42 PM

views 7

इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका- राफेल ग्रोसी

इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका असल्याचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी म्हटलं आहे. इराणमधल्या अणुप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तिथल्या आण्विक सुरक्षेत घट झाली आहे, मात्र गळती होणाऱ्या क्ष-किरणांनी अजूनही धोकादायक पा...