आंतरराष्ट्रीय

July 20, 2025 7:58 PM July 20, 2025 7:58 PM

views 10

सौदी अरेबियाचे राजपुत्र अल वालिद यांचं निधन

सौदी अरेबियाचे राजपुत्र अल वालिद यांचं आज निधन झालं. ते ३६ वर्षांचे होते. निद्रिस्त राजपुत्र म्हणून ते ओळखले जात होते. २००५ साली लंडनमधे एका मोटार अपघातात गंभीररीत्या जखमी होऊन गेली २१ वर्षं कोमात होते. रियाधच्या इमाम तुर्की बिन अब्दुल्ला मशिदीच्या आवारत त्यांचा दफनविधी होणार आहे.

July 19, 2025 7:50 PM July 19, 2025 7:50 PM

views 9

दक्षिण चीनमध्ये हाय अलर्ट जारी, वादळ विफामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे

दक्षिण चीन समुद्रात  विफा टायफून वादळ  धडकलं असून  हैनान आणि ग्वांडोंग प्रांतात शक्तिशाली वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळाचा अक्ष हैनानमधल्या वेनचांग शहरापासून सुमारे ९३० किलोमीटर्स अंतरावर आहे. ताशी २० किलोमीटर वेगाने ते वायव्येकडे सरकत असून उद्या दिवसभरात हैनान आणि ग्वांडोंग प्र...

July 19, 2025 7:16 PM July 19, 2025 7:16 PM

views 8

पाकिस्तान पंजाब प्रांतात वादळी पावसामुळे १२३ जणांचा मृत्यू, ४६२ हून अधिकजण जखमी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वादळी पावसामुळे १२३ पेक्षा जास्तजणांचा मृत्यू झाला तर ४६२ हून जास्त लोक जखमी झाले. गेल्या दोन दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे १० जणांचा बळी गेला. आपत्तीग्रस्त भागात सरकारचा कोणाही प्रतिनिधी पोहोचलेला नाही, तसंच आपत्तीग्रस्तांना कोणतीही मदत मिळालेली नाही. निवारा शि...

July 19, 2025 3:32 PM July 19, 2025 3:32 PM

views 13

पहलगाम हल्ल्याचा चीनकडून निषेध

चीनने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूनं सर्व देशांनी दहशतवाद विरोधातली एकजूट  बळकट करण्याचं आवाहन केलं आहे.    लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनेचा गट रेझिस्टन्स फ्रंट पहलगाम हल्ल्यामागे होता,  या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याच्या...

July 19, 2025 3:15 PM July 19, 2025 3:15 PM

views 14

ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नलवर दाखल केला मानहानीचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नल आणि त्याच्या मालकांविरोधात  १० अब्ज डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. वृत्तपत्राच्या मालकांमध्ये रुपर्ट मर्डोक आणि डोव्ह जोन्स यांच्या सह इतर काही व्यक्तींचा समावेश आहे.    वॉल स्ट्रीट जर्नलनं २००३ साली जेफ्री एपस्टाईन यांना व...

July 19, 2025 1:16 PM July 19, 2025 1:16 PM

views 3

इस्राएल आणि सीरियामध्ये युद्धबंदीची घोषणा

इस्राएल आणि सीरियामध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याचं तुर्की मधले अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरॅक यांनी आज सांगितलं. इस्राएलनं सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर युद्धबंदी घोषित झाली. दरम्यान आपले हल्ले ड्रुझ या अरब धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचं रक्षण करण्यासाठी होते असा दावा इस्राएलनं केला आहे.   सीरि...

July 19, 2025 11:28 AM July 19, 2025 11:28 AM

views 5

लॉस एंजेलिसच्या शेरीफ विभागातील स्फोटात तीन जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या पूर्व लॉस एंजेलिसमधील एका प्रशिक्षण केंद्रात काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागातील तीन अनुभवी अधिकारी ठार झाले. स्फोटाचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, 1857 मध्ये या विभागाची स्थापना झाल्यापासून ही मोठी दुर्घटना असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.  

July 18, 2025 8:16 PM July 18, 2025 8:16 PM

views 19

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे ६३ जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत किमान ६३ जणांचा मृत्यू झाला असून पाकिस्तान सरकारने ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. रावळपिंडी शहरात जोरदार पाऊस झाल्याने नुल्ला लेह मधे अचानक पूर उद्भवला आहे. गेल्या २ दिवसात वीज अंगावर कोसळून किंवा पावसामुळे बांधकाम कोसळून ४४ जण दगावले....

July 18, 2025 2:16 PM July 18, 2025 2:16 PM

views 17

पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार टीआरएफ गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याचं भारताकडून स्वागत

पहलगाम  दहशतवादी हल्ल्याला जबाबदार  द रेझिटन्स फ्रंट अर्थात टीआर एफ या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं टीआरएफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यां...

July 18, 2025 1:07 PM July 18, 2025 1:07 PM

views 10

पहलगाम हल्ल्या मागे असलेला टीआरएफ गट अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित

पहलगाम इथं 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे असलेल्या द रेझिटन्स फ्रंट अर्थात टीआर एफ या गटाला अमेरिकेच्या सरकारनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं टीआरएफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.