आंतरराष्ट्रीय

August 27, 2025 8:22 PM August 27, 2025 8:22 PM

views 7

आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघानं पटकावलं सुवर्णपदक

कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत, महिलांमधे ५० मीटर थ्री पोझिशन सांघिक प्रकारात सिफ्त कौर सर्मा, आशी चौक्सी, आणि अंजुम मौदगिल यांनी सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टलमधे भारतीय नेमबाज अनीश भनवाला याचं सुवर्णपदक अवघ्या एका गुणानं हुकलं, आणि त्याला रौप्यपदकाव...

August 27, 2025 8:16 PM August 27, 2025 8:16 PM

views 15

निर्यात वाढवण्यासाठी ४० देशांमध्ये भारतीय वस्तूंचा प्रचार-प्रसार करायचा भारताचा निर्णय

भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर भारतानं ४० इतर देशांमध्ये भारतीय वस्तूंविषयी जनजागृती करायचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, कॅनडा, तुर्किये, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा यात समावेश आहे. या देशांमध्ये व्यापार मेळावे, ...

August 27, 2025 7:57 PM August 27, 2025 7:57 PM

views 4

अफगाणिस्तानात बस अपघात,२५ ठार, २७ जखमी

अफगाणिस्तानात काबूलजवळच्या अरघंडी इथं आज सकाळी एक बस उलटून झालेल्या अपघातात २५ जण ठार तर २७ जण जखमी झाले.   कंधार ते काबूल महामार्गावरची घटना चालकाच्या बेपर्वाईमुळे झाल्याचं अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतिन कानी यांनी म्हटलं आहे.

August 27, 2025 7:55 PM August 27, 2025 7:55 PM

views 4

रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला

रशियानं युक्रेनच्या सहा भागांमधल्या ऊर्जा आणि गॅस क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात पोल्टावा भागातल्या गॅस वाहतूक आस्थापनेचं मोठं नुकसान झाल्याचं, तर सुमी भागात एका महत्त्वाच्या उपकेंद्रातल्या यंत्रसामग्रीलाही फटका बसल्याचं वृत्त आहे.   या हल्ल्यांमु...

August 27, 2025 7:53 PM August 27, 2025 7:53 PM

views 12

आशियाई नेमबाजी स्पर्धेत अनीश भनवालाला रौप्यपदक

कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज अनीश भनवाला याचं सुवर्णपदक अवघ्या एका गुणानं हुकलं आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या सू लियाबोफान यानं ३६ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर दक्षिण कोरियाच्या स्पर्धकानं कांस्यपदक मिळवलं.   स्पर्धेच्या वरिष्ठ गटाच्...

August 27, 2025 6:33 PM August 27, 2025 6:33 PM

views 2

गाझा हल्ल्यात पत्रकारांच्या मृत्यूवर भारताची निषेधार्ह प्रतिक्रिया

इस्रायलाने गाजामधील खान युनुस इथ केलेल्या हल्ल्यात पत्रकारांचे झालेले मृत्यू धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया भारताने दिली आहे. संघर्षात नागरिकांचे मृत्यू होणे निंदनीय असल्याची भूमिका भारत नेहमीच घेत आला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.   हल्यात पत्रकारांचे मृत...

August 27, 2025 5:34 PM August 27, 2025 5:34 PM

views 2

संरक्षण मंत्रालय आणि क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार

संरक्षण मंत्रालयानं आज दिल्लीत क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडियाबरोबर एक सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराचा उद्देश ६३ लाखांहून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी निवृत्ती वेतन , आरोग्यसेवा, पुनर्वसन आणि गुणवत्ता सेवा बळकट करणं हा आहे. या सामंजस्य करारांतर्गत माजी सैनिक कल्याण विभागाला डिजिटल म...

August 27, 2025 5:31 PM August 27, 2025 5:31 PM

views 9

प्रधानमंत्री उद्यापासून जपान आणि चीन दौरा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जपान आणि चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. ते जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्याबरोबर १५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल माध्यमांना दिली.   चीनमध्ये, प्रधानमंत्री ३१ ऑगस्ट आणि १ सप्टे...

August 24, 2025 3:14 PM August 24, 2025 3:14 PM

views 14

इस्रायलने गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात ५१ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात ५१ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच दक्षिण गाझामधे असदा परिसरात निर्वासितांच्या छावण्यावर केलेल्या हल्ल्यात सहा बालकांसह सोळा पॅलिस्टिनींनी प्राण गमावले आहेत.   गेल्या चोवीस तासात कुपोषणामुळे आठ पॅलेस्टिनी नागरिक मरण पावले असून फक्त कुपोषणामुळे ...

August 24, 2025 3:13 PM August 24, 2025 3:13 PM

views 4

युक्रेननं गेल्या आठवड्यात केलेल्या हल्ल्यांमध्ये २२ जण ठार

गेल्या २४ तासांत युक्रेनचे चार हवाई बॉम्ब आणि १६० ड्रोन्स पाडल्याची माहिती रशियानं दिली आहे. युक्रेननं गेल्या एका आठवड्यात केलेल्या बॉम्ब आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये २२ जण ठार झाल्याची आणि १०५ इतर जखमी झाल्याचंही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदनाद्वारे सांगितलं आहे.