आंतरराष्ट्रीय

October 15, 2025 8:27 PM

views 30

पाकिस्ताननं केलेली शस्रसंधीची विनंती अफगाणिस्तानकडून मान्य

पाकिस्तानच्या विनंतीवरून अफगाणिस्ताननं शस्त्रसंधी करायला संमती दिली आहे. तालिबानचे प्रवक्ते झबिनुल्ला मुजाहिद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.    पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या स्पिन बोलडक भागात हल्ला केला. त्यात १२ अफगाणी नागरिक ठार, तर १०० पेक्षा जास्त जखमी झाले. प्रत्युत्तराद...

October 15, 2025 8:08 PM

views 40

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागातल्या अशांततेबद्दल संयुक्त राष्ट्रांची चिंता

संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागातल्या अशांततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी हिंसाचारावर नियंत्रण आणावं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड बेनेट यांनी केलं आहे. अफगाणिस्तानच्या कंदाहार प्रांतातल्या स्पिन ब...

October 14, 2025 2:59 PM

views 26

मादागास्करचे राष्ट्राध्यक्षांनी सोडला देश

मादागास्कर मध्ये सुरु असलेल्या देशव्यापी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना देश सोडून निघून गेले आहेत. राजोएलिना काल स्थानिक दूरचित्रवाहिनीवर भाषण देणार होते, मात्र निदर्शनकर्त्यांच्या एका गटानं  माध्यमांवर ताबा मिळवण्याची धमकी दिल्यावर ते रद्द करण्यात आलं.   राजधानी अँ...

October 14, 2025 2:42 PM

views 75

दक्षिण सुदानमध्ये आलेल्या पुरामुळे १९ जण मृत्युमुखी

दक्षिण सुदानमध्ये आलेल्या पुरामुळे जवळजवळ ८ लाख ९० हजार नागरिकांना पुराचा फटका बसला असून, आतापर्यंत १९ जण मृत्युमुखी पडले आहेत. मुसळधार पाऊस आणि नाईल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे देशभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.   जोंगलेई आणि युनिटी या राज्यांमधल्या नागरिकांना पुराचा सर्वात जास्त फटका ...

October 13, 2025 8:20 PM

views 32

Gaza Ceasefire : पहिल्या टप्प्यात २० ओलिसांना इस्रायलकडे सुपूर्द

गाझा आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धबंदी करारानुसार पहिल्या टप्प्यात २० ओलिसांना हमासने इस्रायलकडे सुपूर्द केलं. या बदल्यात इस्रायल वीस हजार पॅलिस्टिनी नागरिकांना सोडणार आहे.   इस्रायली ओलिसांच्या सुटकेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. ओलिसांच्या कुटुंबीयांचं धैर्य, शांतता प्रस...

October 13, 2025 6:42 PM

views 67

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

युद्धबंधीसाठी महत्त्वाची भूमिका निभावल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरनं जाहीर झाला आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग ट्रम्प याना हा पुरस्कार प्रदान करतील. या आधी हा सन्मान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओब...

October 13, 2025 2:55 PM

views 45

ऑस्ट्राहिंद २०२५ या युद्धसरावासाठी भारतीय सैन्यपथक ऑस्ट्रेलियात दाखल

ऑस्ट्रेलियाच्या सैन्यासोबत होणाऱ्या ऑस्ट्राहिंद २०२५ या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्याच्या १२० जवानांचं पथक ऑस्ट्रेलियात दाखल झालं आहे. हा सराव संरक्षण सहकार्य आणि परस्पर विश्वासाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने होत असल्याचं कॅनबेरा इथल्या भारतीय उच्चायुक्तालयानं आपल्या निवेदनात म्हटलं...

October 13, 2025 10:23 AM

views 127

गाझा शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज इजिप्तमध्ये शिखर परिषद

गाझा युद्ध संपवण्याच्या पार्श्वभूमीवर, शांतता कराराला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आज इजिप्तच्या शर्म एल-शेख इथं होत आहे. यावेळी गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्यावर, तसंच पश्चिम आशियातली  सुरक्षितता आणि स्थैर्य या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष...

October 12, 2025 8:01 PM

views 42

तालिबान सरकारनं स्वीकारली पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ५८ जवान ठार झाले. अफगाणिस्तानातल्या पक्तिका प्रांतातल्या एका बाजारपेठेवर पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं अफगाणिस्ताननं म्हटलं आहे. अफगाणिस्त...

October 12, 2025 2:24 PM

views 49

मादागास्करमध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी राजधानी अँतानानारिव्होमध्ये निदर्शनं सुरू

मादागास्करमध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी लष्कराच्या काही गटांनी राजधानी अँतानानारिव्होमध्ये निदर्शनं सुरू केली आहेत. वीज आणि पाण्याच्या टंचाईमुळे संतप्त होऊन, मादागास्कर मधल्या तरुणाईनं सरकार विरोधी आंदोलन छेडलं असून, काल त्याचा उद्रेक झाला, आणि हजारो निदर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.