आंतरराष्ट्रीय

October 18, 2025 8:00 PM

views 60

चीनचे ख्यातनाम भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते चेन निंग यांग यांचं निधन

चीनचे ख्यातनाम भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते चेन निंग यांग यांचं आज बीजिंग इथं वार्धक्यानं निधन झालं. ते १०३ वर्षांचे होते. १९५४ मध्ये, त्यांनी अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट मिल्स यांच्यासोबत समीकरणांचा एक संच तयार केला होता. त्यांनी मांडलेली समीकरणं कालांतरानं भौतिकशास्त्राच्या क्षे...

October 18, 2025 7:52 PM

views 43

दिवाळीचा सण जगभरातल्या भारतीय दूतावासांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा

दिवाळीचा सण जगभरातल्या भारतीय दूतावासांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारे, तसंच एकता आणि सौहार्दाचा वैश्विक संदेश देणारे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले. जपानमध्ये शिमाने विद्यापीठात विद्यार्थी, प्राध्यापक आणि भारतीय समुदायाच्या प्रतिनिधी...

October 18, 2025 3:12 PM

views 33

फरार हिरे व्यापारी मेहुुल चोकसी याची अटक योग्य असल्याचा बेल्जियमच्या न्यायालयाचा निर्वाळा

फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला भारताच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोकसीला केलेली अटक योग्य असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या एका न्यायालयानं काल दिला. त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक...

October 18, 2025 1:04 PM

views 25

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस इथं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनला लांब पल्ल्याच्या टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याबाबत संकोच व्यक्त केला आहे. युक्रेन आणि रशिया मधल्या संघर्षामुळे वाढत असलेल्या जागतिक दबावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊस इथं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यां...

October 18, 2025 12:54 PM

views 19

मोझाम्बिक इथं लॉन्च बोट उलटल्याने तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू

मोझाम्बिक इथं लॉन्च बोट उलटल्याने तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत. बोट समुद्रकिनाजवळ आल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचं भारताच्या मोझम्बिकमधल्या उच्चायुक्तालयानं सांगितलं. या बोटीत १४ कामगार प्रवास करत होते.   

October 18, 2025 12:50 PM

views 18

गाझापट्टीत मदत साहित्य घेऊन जाणारं संयुक्त अरब अमिरातीचं जहाज रवाना

गाझापट्टीत मदत साहित्य घेऊन जाणारं संयुक्त अरब अमिरातीचं जहाज आज रवाना झालं. यात ७ हजार दोनशे टन मदत साहित्य तसंच जीवनावश्यक वस्तू आहेत. त्याचप्रमाणे यात ६८० टन खाद्यपदार्थ, १६० टन निवाऱ्यासाठी उपयोगी पडणारं साहित्य, ३६० टन औषधं आणि पाणी याचाही समावेश आहे.  

October 18, 2025 10:40 AM

views 24

अफगाणिस्तानच्या पक्तिका भागात पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात दोन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या पक्तिका भागात पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात काल दोन लहान मुलांसह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देशांनी दोन दिवसांचा युद्धबंदी करार केला असतानाही हा हल्ला झाला असं टोलो या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. अर्गन आणि बारमल जिल्ह्यातल्या रहिवासी भागातहे हवाई हल्ले करण्यात आले.

October 17, 2025 3:14 PM

views 46

H1B विजासंदर्भात ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सकडून न्यायालयात आव्हान

अमेरिकेत उच्च कुशल परदेशी कामगारांसाठी नवीन H-1B व्हिसावर एक लाख डॉलर्स शुल्क आकारण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्सने न्यायालयात आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे H-1Bवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना त्यांच्या कामगार खर्चात लक्षणीय वाढ करणं किंवा कौशल्य...

October 17, 2025 12:43 PM

views 36

आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात श्रीलंकेचं कौतुक

आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात श्रीलंकेनं केलेल्या कामगिरीचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं कौतुक केलं आहे. मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केल्यानंतर आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्गावर श्रीलंकेची सुरू असलेली वाटचाल ठाम असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात श्रीलंकेचा आर्थिक वृद्धी दर ५ टक्के ह...

October 16, 2025 1:28 PM

views 69

अमेरिकेनं लादलेलं आयात शुल्क ही भारतासाठी चितेंची बाब नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मत

अमेरिकेनं लादलेलं ५० टक्के आयात शुल्क ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब नसल्याचं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी-जागतिक बँकच्या वॉशिंग्टनमधल्या बैठकीत ते बोलत होते.   स्थानिक पातळीवर असलेल्या मागणीमुळं अमेरिकेनं लादलेल्या वाढीव आयात शुल्काचा ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.