आंतरराष्ट्रीय

October 2, 2025 7:11 PM October 2, 2025 7:11 PM

views 36

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंसक आंदोलनात आणखी ९ जणांचा मृत्यू

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हिंसक आंदोलनं सुरू असून त्यामधे आज आणखी ९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २१ झाली असून त्यात तीन पोलिसांचा समावेश आहे. या बंदला हिंसक वळण लागल्यानं उद्भवलेल्या हिंसाचारात १७२ पोलीस कर्मचारी आणि ५० नागरिक जखमी झाले आहेत. संयुक्त अवामी कृती सम...

October 2, 2025 1:39 PM October 2, 2025 1:39 PM

views 55

अर्थसंकल्पावर सहमती होऊ न शकल्यानं अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प

अर्थसंकल्पावर सरकार आणि विरोधक यांच्या सहमती होऊ न शकल्यानं अमेरिकेत अजूनही सरकारी कामकाज ठप्प आहे. अनेक अत्यावश्यक गोष्टींपासून यामुळं सुटका होईल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. यामुळं हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. मात्र अत्या...

October 2, 2025 1:19 PM October 2, 2025 1:19 PM

views 16

व्हिएतनाममधे बुआलोई वादळामुळे, पूर आणि भूस्खलनामुळे ३४ जणांचा मृत्यू

व्हिएतनाममधे बुआलोई वादळामुळे आणि त्यानंतर आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण बेपत्ता आहेत, तसंच १४० जण जखमी झाले आहेत. या आपत्तीमुळे ३५६ दशळक्ष डॉलरचं आर्थिक नुकसान झालं आहे. वादळामुळे पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास ८ हजार दोनशे वीजेचे खांब कोसळ...

September 30, 2025 7:41 PM September 30, 2025 7:41 PM

views 19

व्हिएतनाममधल्या ‘बुआलोई’ चक्रीवादळात २६ जणांचा मृत्यू, तर २२ बेपत्ता

व्हिएतनाममधल्या ‘बुआलोई’ चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ वर पोहोचली असून, २२ जण अद्याप बेपत्ता आहेत. वादळाबरोबर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर आला असून, विमान आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.   गेल्या २४ तासांमध्ये  व्हिएतनामच्या अनेक भागात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पा...

September 30, 2025 7:33 PM September 30, 2025 7:33 PM

views 13

पाकिस्तानात झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात ८ जण ठार, तर १९ जण जखमी

पाकिस्तानमध्ये, क्वेटा फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी एफसी मुख्यालयाबाहेर आज झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात ८ जण ठार, तर १९ जण जखमी झाले. बलुचिस्तानमध्ये दीर्घ काळापासून ‘बलुच लिबरेशन आर्मी’ सारख्या गटांचा हिंसाचार सुरु आहे. ३ सप्टेंबर रोजी क्वेट्टा इथं एका राजकीय रॅलीमध्ये  झालेल्या आत्मघातकी बॉम्बस...

September 30, 2025 10:32 AM September 30, 2025 10:32 AM

views 41

कॅनडाकडून ‘बिश्नोई समूह’ दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध

कॅनडाने बिश्नोई समूहाला फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध केले आहे. या कारवाईमुळे, कॅनडाच्या कायदा अंमलबजावणी संचालनालयामार्फत या गटाची मालमत्ता, वाहने, संपत्ती जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे समूहाला होणारा वित्तपुरवठा, प्रवास आणि नवी भरती यांसंदर्भातल्या दहशतवादी गुन्ह्यांवर कारवा...

September 30, 2025 9:37 AM September 30, 2025 9:37 AM

views 45

देशात तयार झालेल्या चित्रपटांवरही १०० % आयातकर, अमेरिकेची घोषणा

अन्य उत्पादनांनतर आता इतर देशांत तयार झालेल्या चित्रपटांवरही शंभर टक्के आयातकर लावण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केला. गेल्या मे महिन्यात ट्रम्प यांनी चित्रपटांवर आयातशुल्क लावण्याचे अस्पष्ट संकेत दिले होते. अमेरिकेबाहेरच्या सहनिर्मितीला आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महसू...

September 29, 2025 1:36 PM September 29, 2025 1:36 PM

views 15

लेबननमधल्या हिजबोला संघटनेच्या तळांवर इस्रायलचा हवाई हल्ला

इस्रायलने लेबननमधल्या हिजबोला संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला.  कफर रेमेन आणि अल जर्मक या भागात मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली. इस्रायलने हिजबोलाच्या शस्रास्त्र तळांवर हल्ला केल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांमधे युद्धबंदी करार झाला होता, तरीही ही  चकमक...

September 29, 2025 1:29 PM September 29, 2025 1:29 PM

views 16

सेनेगलमध्ये रिफ्ट व्हॅली फिव्हरममुळे ७ जणांचा मृत्यू

रिफ्ट व्हॅली फिव्हरममुळे सेनेगलमधे सात जणांचा मृत्यू झाल्याचं सेनेगलचे आरोग्य मंत्री इब्राहीम साय यांनी सांगितलं आहे. आरव्हीएफ विषाणूमुळे जनावरांकडून माणसाला होणारा हा आजार आहे, असं आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता विभागाच्या साथरोग नियंत्रण कक्षाचे प्रमुख बोली डिओप यांनी सांगितलं. त्यामुळे पशुधन विभाग...

September 29, 2025 1:32 PM September 29, 2025 1:32 PM

views 33

व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळामुळे विमानतळ बंद

व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळामुळं त्याचा धोका असलेल्या भागातील विमानतळ बंद करण्यात आली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या वादळामुळं फिलीपिन्समध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक भागात पूराचा तडाखा बसला आहे. हे वादळ एकाच वेळी अनेक नैसर्गिक आपत्तींना कारणीभूत ठरू शकतं असा ...