आंतरराष्ट्रीय

October 5, 2025 1:29 PM October 5, 2025 1:29 PM

views 73

गाझा- शांतता प्रस्तावावर इस्रायल, हमास आणि अमेरिका यांची बैठक

गाझामधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आज कैरो इथं इस्रायल, हमास आणि अमेरिकेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत इस्रायलने कैद केलेले पॅलेस्टिनी नागरिक आणि हमासने ओलीस ठेवलेले इस्रायली नागरिक यांच्या देवाणघेवाणीबाबतही चर्चा होईल, असं इजिप्तच्य...

October 4, 2025 8:15 PM October 4, 2025 8:15 PM

views 35

गाझामध्ये गेल्या १२ तासात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये  किमान २० जणांचा मृत्यू

गाझामध्ये गेल्या १२ तासात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये  किमान २० जण मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन केलं असलं तरी इस्राएलचे हल्ले सुरु आहेत. मात्र युध्दविरामाच्या आवाहनाला इस्राएलनं सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. ट्रम्प यांच्...

October 4, 2025 8:01 PM October 4, 2025 8:01 PM

views 38

युक्रेनमधे एका प्रवासी रेल्वेवर रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुमारे 30 जण जखमी

युक्रेनच्या उत्तरेकडे सुमी प्रदेशातल्या शोस्तका इथं एका प्रवासी रेल्वेवर रशियाने ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 30 लोक जखमी झाले असल्याचं प्रादेशिक गव्हर्नर ओलेह ह्रीहोरोव्ह यांनी आज सांगितलं. ते म्हणाले की हा हल्ला शोस्तकाहून राजधानी कीएवकडे जाणाऱ्या ट्रेनवर झाला. डॉक्टर आणि बचावकर्ते घटनास्थळी...

October 4, 2025 7:57 PM October 4, 2025 7:57 PM

views 16

दक्षिण सुदानमध्ये पुरामुळे १९ जणांचा मृत्यू

दक्षिण सुदानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे २६ तालुक्यांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे साडेसहा लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयने दिली आहे.   मुसळधार पावसामुळे सुमारे पावणेदोन लाख लोक विस्थापित झाले आहेत, पुराम...

October 4, 2025 3:05 PM October 4, 2025 3:05 PM

views 21

साने ताकाइची यांची जपानच्या सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदी निवड

जपानच्या सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पक्षानं साने ताकाइची यांची पक्षाच्या नेतेपदी निवड केली. त्यांची येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत जपानच्या प्रधानमंत्रीपदी निवड होणार आहे. जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री होण्याचा मान त्यांना मिळणार आहे.   जपानच्या माजी आर्थिक सुरक्षा मंत्री ताकाइची यांनी कृषी मंत्...

October 4, 2025 1:11 PM October 4, 2025 1:11 PM

views 15

ओलिस ठेवलेल्यांची सुटका होण्याचे संकेत म्हणजे मानवतावादी प्रयत्नांचे फलित- प्रधानमंत्री

अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित होण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे.   ओलिस ठेवलेल्यांची सुटका होण्याचे संकेत म्हणजे सध्याच्या मानवतावादी आणि मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांचे फलित असल्याचं त्यांन...

October 4, 2025 10:55 AM October 4, 2025 10:55 AM

views 34

उर्वरित सर्व इस्रायली बंधकांना सोडण्यास हमासची सहमती

हमासनं उर्वरित सर्व इस्रायली बंधकांना सोडण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु अमेरिकेच्या शांतता योजनेत नमूद केलेल्या अनेक प्रमुख मुद्द्यांवर पुढील वाटाघाटी करण्याची आपली इच्छा असल्याचं देखील म्हटलं आहे. एका निवेदनात, हमासनं म्हंटलं आहे की बंधकांच्या देवाण-घेवाणीसाठी योग्य अटी पूर्ण झाल्या तर अध्यक्ष ट्र...

October 3, 2025 3:33 PM October 3, 2025 3:33 PM

views 44

जगविख्यात प्रायमेट्स आणि मानववंश वैज्ञानिक जेन गुडॉल यांचं निधन

जगविख्यात प्रायमेट्स आणि मानववंश वैज्ञानिक जेन गुडॉल यांचं काल अमेरिकेत निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. निसर्ग जतनासाठी आयुष्याची साठ वर्षं अथकपणे कार्य करणाऱ्या जेन गुडॉल यांनी, चिंपांझी आणि त्याप्रकारच्या प्राण्यांच्या अभ्यासात क्रांती घडवली. त्यांच्या कार्यामुळे प्राण्यांच्या अधिकारावर नव्य...

October 3, 2025 1:33 PM October 3, 2025 1:33 PM

views 20

लदाखच्या लेह जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर

लदाखच्या लेह जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. काही दिवसांपूर्वी हिंसक आंदोलनानंतर तिथं तणाव निर्माण झाला होता. आता प्रशासनानं सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात संचारबंदी शिथिल केली आहे. मात्र मोबाईल डेटा सेवा अद्याप बंद आहे. शाळा सुरू झाल्या असून बस आणि टॅक्सी वाहतूकही सुरू झाली आहे.   दरम्...

October 3, 2025 12:59 PM October 3, 2025 12:59 PM

views 34

व्हिएतनाममध्ये बुआलॉय चक्रीवादळामुळे ५१ जणांचा मृ्त्यू

व्हिएतनाममध्ये बुआलॉय चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५१वर गेली आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे १४ जण बेपत्ता असल्याची आणि १६४ जण जखमी झाल्याची माहिती व्हिएतनामच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं दिली आहे. बुआलॉय चक्रीवादळ गेल्या सोमवारी उत्तर मध्य व्हिएतनामला धडकलं. या चक्रीवादळामुळे साडे ४...