आंतरराष्ट्रीय

October 12, 2025 12:52 PM October 12, 2025 12:52 PM

views 30

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद १७ ऑक्टोबरपर्यत भारत, सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर

कॅनडाच्या हिंद प्रशांत धोरणाचा भाग म्हणून कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आजपासून १७ ऑक्टोबरपर्यत भारत, सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर येत आहेत. भारत दौऱ्यामध्ये त्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. तसंच कॅनडा आणि भारत दोन्ही देशांमध्ये ...

October 12, 2025 10:25 AM October 12, 2025 10:25 AM

views 55

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी आज आग्रा येथील ताजमहालला भेट देणार

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी आज आग्रा येथील ताजमहालला भेट देणार आहेत. ते आठवडाभराच्या राजनैतिक दौऱ्यावर भारतभेटीसाठी आलेले आहेत. दिल्लीमध्ये वाणिज्य संघटनेने आयोजित केलेल्या उद्योग आणि व्यवसाय प्रतिनिधींच्या बैठकीतही ते सहभागी होतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या...

October 12, 2025 9:57 AM October 12, 2025 9:57 AM

views 44

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिए गोर यांची दिल्लीत भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिए गोर यांची भेट घेतली. गोर यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम होईल असा विश्वास प्रधानमत्र्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि गो...

October 10, 2025 1:35 PM October 10, 2025 1:35 PM

views 30

पाकिस्तान – अफगाणिस्तानमध्ये तणाव

काबुलमध्ये काल झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधला तणाव वाढला आहे. या स्फोटांमुळे पूर्व काबुलमध्ये सरकारी कार्यालयं तसंच निवासी भागात घबराट पसरली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांच्या सभेनंतर काही तासांत ही घटना घडली. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही.

October 10, 2025 9:47 AM October 10, 2025 9:47 AM

views 100

गाझा शांतता कराराला मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री मोदींकडून अमेरिका-इस्रायलचं कौतुक

गाझा शांतता कराराला मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांचं अभिनंदन केलं आहे. ओलिसांची सुटका, इस्रायली सैन्याची माघार घेण्याचा आणि गाझाला मानवतावादी मदत साहित्याचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाल्...

October 9, 2025 8:42 PM October 9, 2025 8:42 PM

views 20

भारतातून मोठी गुंतवणूक मिळेल अशी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांना आशा

भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज राजभवनात ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळस्तरावर चर्चा झाल्यानंतर ते संयुक्तपणे पत्...

October 9, 2025 7:38 PM October 9, 2025 7:38 PM

views 52

नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर

साहित्यनिर्मितीसाठीचा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर झाला आहे. आधुनिकोत्तर मानल्या जाणाऱ्या विषय कल्पनांवर लिहीणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.  २०१५मधे त्यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कादंबरी, कथा, लघुकथा,  निबंध,  अशा विविध साहित्यप्रकारा...

October 9, 2025 1:37 PM October 9, 2025 1:37 PM

views 78

इस्राइल आणि हमास दरम्यान शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाल्याची अमेरिकेची घोषणा

इस्राइल आणि हमास यांच्यात संघर्षविरामाबाबत तसंच ओलिसांची सुटका करण्यासाठीही सहमती झाली असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने आखलेल्या शांतता योजने अंतर्गत इस्रायल आणि हमासमध्ये ही सहमती झाली आहे.    इजिप्तमधे शर्म अल-शेख इथं झालेल्या वाटाघ...

October 8, 2025 8:15 PM October 8, 2025 8:15 PM

views 20

म्यानमारमधे आंदोलकांवर लष्कराने केलेल्या बॉम्बहल्ल्यात २४ जणांचा मृत्यू

म्यानमारमधे सरकारविरोधी आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांवर लष्कराने पॅराग्लायडरने टाकलेल्या बॉम्बमुळे झालेल्या  स्फोटात २४ जणांचा मृत्यू झाला तर ४७ जण जखमी झाले आहेत. तसंच ६ ऑक्टोबर रोजी सागाईंग प्रांतात बौद्ध उत्सवासाठी जमलेल्या शंभर जणांच्या जमावावर लष्कराने हल्ला केला.

October 8, 2025 8:11 PM October 8, 2025 8:11 PM

views 31

कॅलिफोर्नियात दिवाळीची शासकीय सुट्टी जाहीर

कॅलिफोर्निया राज्याने दिवाळीच्या सणाला अधिकृत मान्यता दिली असून भरपगारी शासकीय सुट्टी देखील मंजूर केली आहे. याअगोदर अमेरिकेतल्या पेनसिल्वानिया आणि कनेटिकट या राज्यांनी दिवाळीची अधिकृत शासकीय सुट्टी जारी केली आहे.