आंतरराष्ट्रीय

November 2, 2025 8:24 PM November 2, 2025 8:24 PM

views 21

रशियाची नवी आण्विक पाणबुडी ‘खाबारोव्स्क’ त्यांच्या नौदलात दाखल

रशियानं त्यांची नवी आण्विक पाणबुडी 'खाबारोव्स्क' त्यांच्या नौदलात दाखल केली आहे. 'पोसायडॉन' किंवा 'डूम्सडे क्षेपणास्त्र' म्हणून ओळखला जाणारा ड्रोन वाहून नेण्यासाठी ही पाणबुडी तयार केली आहे. आंतरखंडीय प्रवास करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम असून, ती प्रचंड विनाश करू शकते. रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बे...

November 2, 2025 5:08 PM November 2, 2025 5:08 PM

views 28

व्हिएतनाममध्ये पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू, ६० जण जखमी

व्हिएतनाममध्ये विक्रमी पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले. पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. १६ हजार ५०० पेक्षा जास्त घरं अजूनही पुराच्या पाण्याखाली आहेत, तर १ लाखापेक्षा जास्त घरं  पुरात बुडाली.  ४२ हजार पशुधन दगावलं असून, ५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरची पिकं नष्ट झा...

November 2, 2025 5:03 PM November 2, 2025 5:03 PM

views 26

मेक्सिकोत झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

मेक्सिकोत सोनोरा मध्ये हर्मोसिलो इथल्या वाल्डोज सुपरमार्केटमध्ये काल झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. ट्रान्सफाफॉर्मर चा स्फोट होऊन ही दुर्घटना झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेक जण अल्पवयीन असल्याच्या वृत्ताला सोनोराचे गव्हर्नर अल्...

November 1, 2025 8:10 PM November 1, 2025 8:10 PM

views 25

कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त

कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कॅर्नी यांनी टॅरिफ विरोधी राजकीय जाहिरातीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली असून ऑन्टेरियोचे प्रमुख ड्युग फोर्ड यांना जाहिरातीचे प्रक्षेपण न करण्याची सूचना केली आहे. आपण ट्रम्प यांच्याकडे खासगीत दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती कॅर्नी...

November 1, 2025 3:31 PM November 1, 2025 3:31 PM

views 33

एच-१बी व्हिसा शुल्क निर्णयावर पुनर्विचार करावा, ट्रम्प यांना आवाहन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा आणि त्यासाठी १ लाख अमेरिकी डॉलर्स शुल्क लागू करण्याच्या आपल्या घोषणेचा पुनर्विचार करावा अशी विनंती अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधीनी केली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या अमेरिकेच्या यशामागे भारतीय नागरिकांची मोठी भूमि...

November 1, 2025 3:25 PM November 1, 2025 3:25 PM

views 18

पाक-व्याप्त काश्मीरमधील दडपशाही थांबवावी, भारताचा पाकिस्तानला कडक इशारा

पाकिस्ताननं पाक-व्याप्त काश्मीरमधली दडपशाही ताबडतोब थांबवावी असा कडक इशारा भारतानं दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत, भारताच्या संयुक्त राष्ट्र मिशनच्या प्रथम सचिव भाविका मंगलनंदन बोलत होत्या. पाकिस्तानी लष्करानं गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्या ताब्यातल्या काश्मीरच्या काही भागात मूलभूत हक्कां...

November 1, 2025 3:10 PM November 1, 2025 3:10 PM

views 38

आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ४८ पदकांची कमाई

बहरीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४८ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये १३ सुवर्ण, १८ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.   या स्पर्धेत भारताच्या २२२ खेळाडूंनी भाग घेतला होता. भारताच्या महिला संघानं कबड्डीमध्ये सुवर्णपदक पटकावलं, प्र...

November 1, 2025 3:03 PM November 1, 2025 3:03 PM

views 52

‘लखनौ’ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश

समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘लखनौ’ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. उझबेकिस्तानमध्ये समरकंद इथं झालेल्या ४३ व्या सर्वसाधारण बैठकीत युनेस्कोनं लखनौ शहराला ‘गॅस्ट्रोनॉमीच्या श्रेणीत मान्यता दिली.   यामुळे लखनौला जगभरातल्या ७० गॅस...

November 1, 2025 12:32 PM November 1, 2025 12:32 PM

views 16

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच, -नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल वात्सायन

ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नसून भारतीय नौदल प्रभावीपणे तैनात असल्याचं नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल वात्सायन यांनी म्हटलं आहे. भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक चिनी जहाजावर आपण लक्ष ठेवून आहोत असं त्यानी सांगितलं. फेब्रुवारी 2026 मध्ये विशाखापट्टणम इथे होणाऱ्या आगामी आ...

November 1, 2025 12:28 PM November 1, 2025 12:28 PM

views 88

दहशतवाद आणि छुपे युद्ध, तसंच चुकीची माहिती पसरवणं ही आजच्या काळातील मोठं आव्हान- लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

पारंपारिक स्पर्धा, दहशतवाद आणि छुपे युद्ध, तसंच चुकीची माहिती पसरवणं ही आजच्या काळातील मोठं आव्हान असल्याचं लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेकरता युवकांना सक्षम करण्यासाठी आयोजित 'यंग लीडर्स फोरमला' संबोधित ते बोलत होते.   आव्हानांच्या या युगात, र...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.