आंतरराष्ट्रीय

June 17, 2024 3:07 PM June 17, 2024 3:07 PM

views 45

रशियाच्या विशेष कृती दलानं दहशतवाद्यांच्या ताब्यातून २ कारागृह कर्मचाऱ्यांची केली सुटका

रशियाच्या विशेष कृती दलानं दहशतवाद्यांच्या ताब्यातून २ कारागृह कर्मचाऱ्यांची सुटका केली. यावेळी रोस्टोव्ह शहरात काल झालेल्या चकमकीत इस्लामिक दहशतवादी गटाच्या सहा जणांना गोळ्या घालण्यात आल्या. हे सहा जण या कारागृहात बंदी होते. त्यांनी दोन जेल कर्मचाऱ्यांना बंदी करत त्या बदल्यात आपल्या सुटकेची मागणी क...

June 17, 2024 11:04 AM June 17, 2024 11:04 AM

views 14

रशिया युक्रेन संघर्षावर चर्चा आणि राजकीय धोरणांद्वारे कायमस्वरुपी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भारताचा भर

रशिया युक्रेन संघर्षावर चर्चा आणि राजकीय धोरणांद्वारे कायमस्वरुपी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भारतानं भर दिला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या दोन दिवसांच्या युक्रेन शांतता परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे सचिव पवन कपूर सहभागी झाले होते. या परिषदेत त्यांनी भारताचा दृष्टीकोन स्प...

June 16, 2024 8:37 PM June 16, 2024 8:37 PM

views 34

चीनमधल्या ग्वांगशी झुआंग स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर

जोरदार पावसामुळे चीनमधल्या ग्वांगशी झुआंग या स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर आला आहे. पुराने धोक्याची पातळी ओलांडल्याचं ग्वांगशी झुआंगमधल्या ३० जलविज्ञान केंद्रांनी म्हटलं आहे. तर फुजिआन प्रांतात दरड कोसळल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. चीनमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर येण्याच...

June 15, 2024 8:35 PM June 15, 2024 8:35 PM

views 25

मणिपूरमधील बोरोबेकरा भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात

मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातल्या बोरोबेकरा उपविभागाअंतर्गतच्या भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात केले गेले आहेत. ६ मे पासून इथे पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचाराचा या क्षेत्रात मोठा प्रभाव दिसून आल्यानं अतिरिक्त जवान तैनात केल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. जिल्हा प्रश...

June 16, 2024 12:53 PM June 16, 2024 12:53 PM

views 35

जी सेव्हन देशांचा चीनच्या कथित अनुचित व्यापारप्रथांवर तोडगा काढण्याचा निश्चय

चीनच्या कथित अनुचित व्यापारप्रथांवर तोडगा काढण्याचा निश्चय जी सेव्हन देशांनी केला आहे. जी सेव्हन देशांच्या शिखरपरिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात हा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला आहे. युक्रेनविरुद्धच्या लष्करी कारवायांसाठी रशियाला शस्त्रास्त्र खरेदीसाठी मदत पुरवण...

June 15, 2024 8:21 PM June 15, 2024 8:21 PM

views 20

कोलकत्यात उद्या ‘गुन्हेगारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतीशील मार्ग’ या विषयावर परिषदेचं आयोजन

केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयातर्फे उद्या कोलकत्यात ‘गुन्हेगारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतीशील मार्ग’ या विषयावर परिषदेचं आयोजन केलं आहे. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३ या तीन नवीन कायद्यांची वैशिष्ट्य, त्यांची विस्तृत माहि...

June 15, 2024 10:31 AM June 15, 2024 10:31 AM

views 20

कुवैतमधून ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह भारतात पोहोचले

कुवैतमध्ये अग्निकांडात मरण पावलेल्या ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह काल भारतात पोहोचले. या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये केरळमधील २३, तामिळनाडू ७, आंध्रप्रदेश ३, उत्तर प्रदेश ३, ओडिशा २ आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, झारखंड, हरियाणा तसंच महाराष्ट्रातून प्रत्येकी एक अशा एकूण ४५ जणांचा समावेश आहे. म...

June 14, 2024 8:17 PM June 14, 2024 8:17 PM

views 22

युरो कप चॅम्पियनशीप १५ जून रोजी होणार सुरू

युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशीप अर्थात युरो कप १५ जून रोजी सुरू होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जर्मनी आणि स्कॉटलँड यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत २४ संघ सहभागी होणार आहेत. या संघांना सहा गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. यजमान संघ जर्मनी अ गटात तर गतविजेता इटली ब गटात आहे.

June 14, 2024 8:18 PM June 14, 2024 8:18 PM

views 33

पाच दिवसांच्या वार्षिक हज यात्रेला प्रारंभ

हजच्या ५ दिवसीय यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त सौदी अरेबियातल्या मीना शहरात आज जगभरातले सुमारे २० लाख भाविक जमा झाले आहेत. हे यात्रेकरू आज मीना शहरातच मुक्काम करणार असून उद्या पहाटे ते अराफतकडे मार्गक्रमण करणार आहेत. सौदी अरेबियात गोळा झालेल्या २० लाख भाविकांमध्ये पावणे २ लाख भारतीयांच...

June 14, 2024 11:56 AM June 14, 2024 11:56 AM

views 22

कुवेतमधून भारतीय नागरिकांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणले जाणार

कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणले जाणार आहेत. मृतांमध्ये केरळमधले २३ नागरिक असल्यामुळे हे विमान आधी कोचीमध्ये उतरेल आणि त्यानंतर दिल्लीला रवाना होईल अशी माहिती कुवेतमधल्या भारतीय वकीलातीनं दिली आहे. दरम्यान परराष्ट्र व्यवहार ...