आंतरराष्ट्रीय

July 26, 2024 1:15 PM

views 28

गाझा पट्टीत हमाससोबत लवकरात लवकर शस्त्रसंधी करण्याचं अमेरिकेचं इस्राइलला आवाहन

गाझा पट्टीत हमाससोबत लवकरात लवकर शस्त्रसंधी करण्याचं आवाहन अमेरिकेनं इस्राइलला केलं आहे. इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्यू यांनी आज वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्यावेळी हॅरिस यांनी ही विनंती नेत्यानू यांना केली. शस्त्रसंधीमधल...

July 26, 2024 10:48 AM

views 15

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, यावर्षी भारतात होणाऱ्या क्वाड देशांच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, यावर्षी भारतात होणाऱ्या क्वाड देशांच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी वॉशिंग्टनमधे पत्रकारांशी बोलताना दिली.   अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन यांनी माघार घेतली असल्यानं ते आता अशा ...

July 25, 2024 8:41 PM

views 26

बांगलादेशातून आतापर्यंत ६,७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

बांगलादेशातून आतापर्यंत ६ हजार ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी भारतात परतले असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली. ढाकामधल्या भारतीय उच्चायुक्तांनी भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित प्रवासाची व्यवस्थ...

July 24, 2024 2:57 PM

views 27

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या संचालकपदी रोनाल्ड एल. रोवे यांची नियुक्ती

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या संचालकपदी रोनाल्ड एल. रोवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या उपसंचालकपदावर कार्यरत होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्यानंतर अमेर...

July 24, 2024 8:28 PM

views 27

काठमांडूमध्ये खासगी विमानाला झालेल्या अपघातात १८ ठार

नेपाळमधल्या काठमांडू इथल्या विमानतळावर आज सकाळी एका खासगी विमान कंपनीच्या विमानाचा अपघात झाला. यात १८ जणांचा मृत्यू झाला असून वैमानिकासह तीन प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती काठमांडूच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच नेपाळचे गृहमंत्री रमेश लेहकाक यांनी घटनास्थळावर ...

July 23, 2024 8:45 PM

views 28

इथियोपिया : भूस्खलानात १५५ जणांचा मृत्यू

इथियोपिया इथं भूस्खलानामुळे झालेल्या मृतांची संख्या १५५ झाली आहे. इथिओपियामधल्या गेझे गोफा जिल्ह्यात काल सकाळी हे भूस्खलन झालं होतं. आतापर्यंत महिला आणि बालकांचे मिळून ५५ मृतदेह सापडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. इथियोपियामध्ये सध्या पावसाळा सुरू असून...

July 23, 2024 1:33 PM

views 31

सिरीयाच्या सोशल नॅशनालिस्ट पार्टीचा एक सदस्य ठार

दक्षिण लेबनॉनमधल्या चिहिन नगरपालिकेत काल इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात सिरीयाच्या सोशल नॅशनालिस्ट पार्टीचा एक सदस्य ठार झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानानं चिहिनमधल्या एका घरावर दोन क्षेपणास्त्र डागली असल्याची माहिती लेबनॉनच्या सैन्यानं एका निवेदनात दिली आहे.

July 22, 2024 1:41 PM

views 21

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून जो बायडेन यांची माघार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बायडेन यांनी काल समाजमाध्यमावर ही घोषणा केली. तसंच त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम क...

July 21, 2024 8:18 PM

views 28

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये दोन तृतियांश मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सदनात हजर असलेल्या २६३ सदस्यांपैकी १८८ सदस्यांनी या ठरावाच्या बाज...

July 20, 2024 8:03 PM

views 26

चीन : मुसळधार पावसामुळे पूल नदीत कोसळून ११ जणांचा मृत्यू

चीनच्या उत्तरेकडे मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पूल नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. शान्क्सी प्रांतात काल रात्री हा अपघात घडला. बचावकार्य सुरू आहे. महामार्गावरची सुमारे २० वाहनं आणि ३० जण या दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.