आंतरराष्ट्रीय

August 14, 2024 1:26 PM

views 15

जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांची पदावरून पायउतार होण्याची घोषणा

जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांनी सप्टेंबर महिन्यात पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाला नव्या सुरुवातीची गरज असल्याचं सांगून त्यांनी पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पक्षानं सप्टेंबर महिन्यात नव्या नेत्याची निवड केल्यानंतर...

August 14, 2024 1:15 PM

views 24

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध

भारत आणि ऑस्ट्रेलियानं सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत धोरण आखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज अधोरेखित केली आहे. नवी दिल्ली इथं काल पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया दहशतवादविरोधी संयुक्त कृती गटाच्या १४व्या ब...

August 13, 2024 1:48 PM

views 31

अमेरिकेतले भारतीय राजदूत म्हणून विनय मोहन क्वात्रा यांनी पदभार स्वीकारला

अमेरिकेतले भारतीय राजदूत म्हणून विनय मोहन क्वात्रा यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी मजबूत करण्यासाठी जोमाने काम करत राहू, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

August 13, 2024 1:41 PM

views 32

कॅनबेरा इथं सहाव्या भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवादाचं आयोजन

ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबेरा इथं आज भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवाद आयोजित करण्यात आला होता. सर्वसमावेशक विकास  आणि जागतिक कल्याणासाठी सागरी क्षेत्रात सुरक्षित वातावरण कायम ठेवण्याच्या विविध मार्गांवर यावेळी चर्चा झाली. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातली सुरक्षा, सागरी क्षेत्राबाबत जागरूकता, मानवतावा...

August 13, 2024 9:57 AM

views 24

इस्राईल हवाई दलातल्या अधिकाऱ्यांच्या परदेशातल्या प्रवासावर बंदी

इस्राईल संरक्षण दलानं आपल्या हवाई दलातल्या अधिकाऱ्यांच्या परदेशातल्या प्रवासावर बंदी घातली आहे आणि खबरदारीचा इशारा दिला आहे. इराण आणि हिज्बुल्लाकडून प्रत्युत्तरादाखल हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे इशारा देण्यात आला आहे. हवाई दलातल्या कर्मचाऱ्यांना सुट्टीसाठी परदेशात जाण्यावरची बंदी तातडीनं लागू करण्यात...

August 13, 2024 9:52 AM

views 27

२०२३ मध्ये युरोपात उष्णतेच्या लाटेमुळे ४७ हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू

युरोपात २०२३ मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे ४७ हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. बार्लिनो जागतिक आरोग्य संस्थेनं याबाबत अहवाल तयार केला आहे. दक्षिण युरोपातल्या देशांना जास्त फटका बसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेलं वर्ष सर्वाधिक उष्ण असल्याचं त्यात म्हटलं आहे....

August 13, 2024 9:47 AM

views 28

ग्रीसमध्ये वणवे अथेन्समधल्या उपनगरांपर्यंत पसरले

ग्रीसमध्ये वणवे अथेन्समधल्या उपनगरांपर्यंत पसरले आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांना घरं सोडावी लागली आहेत. अनेक घरं, मोटारींना आगी लागल्या आहेत आणि रस्ते राख आणि धुरानं भरून गेले आहेत. आग सलग दुसऱ्या दिवशी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे सरकारनं युरोपीय संघातील सदस्य देशांकडून मदत मागवली आहे. अनेक शाळा आणि व...

August 13, 2024 9:44 AM

views 30

इराणचे उपाध्यक्ष मोहंमद जावेद झरीफ यांचा नियुक्तीनंतर अकराच दिवसांनी पदाचा राजीनामा

इराणचे उपाध्यक्ष मोहंमद जावेद झरीफ यांनी नियुक्तीनंतर अकराच दिवसांनी पदाचा राजीनामा दिला आहे. समाजमाध्यमांवर झऱीफ यांनी निर्णय जाहीर केला आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या निवडीसाठीच्या समितीचे प्रमुख म्हणून आपण कामात समाधानी नसल्याचं कारण त्यांनी दिलं आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील 19 सदस्यांपैकी किमान सात आप...

August 11, 2024 1:27 PM

views 22

बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांचा राजीनामा

न्यायव्यवस्थेत सुधारणा करायच्या मागणीसाठी बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात विद्यार्थी, अधिवक्ता आणि इतरांनी केलेल्या निदर्शनानंतर बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी काल राजीनामा दिला. बांगलादेशचे कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज सल्लागार प्राध्यापक आसिफ नजरुल यांनी समाजमाध्यमावरून ही...

August 11, 2024 1:24 PM

views 19

बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनूस यांनी अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांचा निषेध केला

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेते, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी देशातल्या अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. सर्व हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्यांकांचं  संरक्षण करायला हवं, असं आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.   दरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाका आणि ईशान्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.