July 20, 2024 2:45 PM July 20, 2024 2:45 PM
11
हैतीच्या उत्तर किनाऱ्याजवळ जहाजाला लागलेल्या आगीत ४० स्थलांतरितांचा मृत्यू
हैतीच्या उत्तर किनाऱ्याजवळ एका जहाजाला लागलेल्या आगीत किमान ४० स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रवासात किमान ८० जण प्रवास करत होते. हैतीहून दीडशे मैलावर असलेल्या टर्क्स अँड कॅकॉस बेटाच्या दिशेनं हे जहाज निघालं होतं. हैतीच्या तटरक्षक दलानं ४१ स्थलांतरितांची सुटका केली असून...