आंतरराष्ट्रीय

August 23, 2024 1:20 PM

views 25

सुधारित Messenger RNA प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला अमेरिकेची परवानगी

अमेरिकेने सुधारित Messenger RNA प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. सध्या आढळत असलेल्या कोविड उपप्रकाराच्या  प्रतिकारासाठी  ही लस अधिक सक्षम आहे. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत १२ वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्यासाठी या लशीच्या  तात्काळ वापरासाठी परवानगी दिली आहे...

August 23, 2024 12:59 PM

views 36

प्रधानमंत्र्यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया-युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल, अशी आशा संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं आहे. अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटींसह सर्वसाधारण सभेचे ठराव, आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रादेशिक एकात्म...

August 23, 2024 12:56 PM

views 33

अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाची निवणूक लढवण्याचा प्रस्ताव औपचारिकरीत्या स्वीकारला

अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाची निवणूक लढवण्याचा प्रस्ताव औपचारिकरीत्या स्वीकारला आहे. शिकागो इथं डेमोक्रॅटिक पक्षाच्या मेळाव्यात काल त्यांनी ही घोषणा केली.  अमेरिकनांना एकत्र आणणं आणि अमेरिकेच्या भविष्यासाठी लढणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे विद्यमान अध्यक...

August 24, 2024 10:18 AM

views 32

नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात २७ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील 24 जणांचा समावेश आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतदेह तातडीनं महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वर...

August 22, 2024 12:51 PM

views 26

गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेणार असल्याचं वृत्त इस्रायलने फेटाळलं

हमास संघटनेसोबतच्या संभाव्य युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेणार असल्याचं वृत्त इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं फेटाळलं आहे. इस्रायल फिलाडेल्फी कॉरिडोरमधून लष्कर माघारी घेण्यासाठी बेंजामीन नेत्यान्याहू तयार असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लि...

August 21, 2024 7:48 PM

views 24

थायलंडमधे एमपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला

थायलंडमधे आज एमपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण कांगोमधून थायलंडमधे आल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या आरोग्य चाचण्या करण्यात येत असून त्याला विलगीकरणात पाठवल्याचं थायलंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. आफ्रिकेबाहेर थायलंड आणि स्वीडन या देशांमधे मंकी पॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. २०२२ पासून ११६ दे...

August 20, 2024 11:12 AM

views 21

इस्रायलची ओलिस ठेवलेल्यांच्या सुटकेच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला मान्यता

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी जेरुसलेम इथं तीन तास चर्चा केल्यानंतर इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतान्याहू यांनी हमासनं ओलिस ठेवलेल्या इस्रायलींच्या सुटकेबाबत मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला. इस्रायलच्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन ओलिसांच्या सुटकेसाठी मध्यस...

August 18, 2024 12:44 PM

views 17

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आज इस्रायलमधील तेल अवीव इथं पोहोचले

गाझामध्ये युद्धविराम घोषित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आज इस्रायलची राजधानी तेल अवीव इथं पोहोचले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर आत्तापर्यंत ब्लिंकन यांनी नऊ वेळा पश्चिम आशियाचा दौरा केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात ...

August 18, 2024 1:15 PM

views 23

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला आज ७ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोवस्क- कामशाकी शहरात ४८ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून तीनशे किलोमीटरच्या भागात त्सुनामी येण्याचा इशारा अमेरिकेच्या हवामान खात्यानं दिला होता. मात्र नंतर विभागाने ही शक्यता नाकार...

August 17, 2024 8:07 PM

views 22

पुण्यातील पुरंदर कंपनीचा अंजिराचा रस पोलंडला निर्यात

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरच्या जीआय मानांकित अंजिरांपासून तयार करण्यात आलेला अंजिराचा रस नुकताच पोलंडला निर्यात करण्यात आला. देशातून निर्यात होणारं पहिलंच हे रेडी टू ड्रिंक पेय आहे. अपेडा अर्थात कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने ही निर्यात केली आहे. पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने ह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.