आंतरराष्ट्रीय

November 9, 2025 3:00 PM November 9, 2025 3:00 PM

views 16

कर्मचारी वेतन कायद्यात सुधारणा करण्याची जपानच्या प्रधानमंत्र्यांची योजना

जपानच्या नवनियुक्त प्रधानमंत्री सनाई ताकाइची यांनी स्वतःसह मंत्रिमंडळ सदस्यांचं वेतन कमी करण्यासाठी सरकारी कर्मचारी वेतन कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखली आहे. जपान मधल्या प्रशासकीय आणि वित्तीय सुधारणांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. या प्रस्तावावर संसदेमध्ये  संबंधित मंत्र्यांच्य...

November 9, 2025 1:08 PM November 9, 2025 1:08 PM

views 25

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग चक्रीवादळाचा जोर तीव्र

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग या चक्रीवादळानं तीव्र स्वरूप घेतलं असून, त्याच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस, विनाशकारी वारे आणि समुद्रात उंच लाटा उसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशाच्या मोठ्या भागात वादळाचा इशारा देण्यात आला आला असून, पूर्व आणि उत्तरेकडच्या भागातल्या १ लाखापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित...

November 9, 2025 1:35 PM November 9, 2025 1:35 PM

views 26

भारताचे राजदूत आणि इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॅालद्वारे चर्चा

केंद्रसरकारच्या ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ आणि ‘इंडिया ए-आय’ मिशनला अनुसरून,  भारतात सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परिचालनाचा विस्तार करण्याच्या ‘इंटेल’ या  कंपनीच्या  योजनांवर चर्चा करण्यासाठी, अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिप बु टॅन या...

November 8, 2025 8:18 PM November 8, 2025 8:18 PM

views 24

आशिया चषक स्पर्धेच्या चषकासंबंधीचा वाद संपवण्याची दोन्ही बाजूंची तयारी

नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या चषकासंबंधीचा वाद संपवण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दाखवली आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली आहे. दुबई इथं झालेल्या आयसीसी मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याशी याबाबत...

November 8, 2025 8:12 PM November 8, 2025 8:12 PM

views 22

Bangladesh: ढाकामध्ये हिंसाचारात १२० जण जखमी

बांग्लादेशाची राजधानी ढाकामध्ये आज आंदोलनकारी शिक्षक आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसाचारात १२० जण जखमी झाले. वेतन आणि पदोन्नती प्रक्रियेत मोठ्या बदलांची मागणी करत प्राथमिक शिक्षकांनी उद्यापासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्यानंतर शिक्षकांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवण्याच...

November 8, 2025 8:09 PM November 8, 2025 8:09 PM

views 18

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात १० ठार, २८ जखमी

रशियानं मध्यरात्री युक्रेनवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात १० जण ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या तीन प्रातांमध्ये महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांना फटका बसला आहे. रशियानं साडेचारशेपेक्षा जास्त ड्रोन्स आणि ४५ क्षेपणास्त्रं डागल्याची माहिती युक्रेनचे अध्यक...

November 8, 2025 7:58 PM November 8, 2025 7:58 PM

views 19

पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात ६ नागरिकांचा मृत्यू

अफगाणिस्तान मधल्या  कंधार प्रांतातल्या  बोल्दाक इथं पाकिस्ताननं आज केलेल्या हल्ल्यात सहा नागरिक मृत्युमुखी पडले,  तर पाच जण जखमी झाले. या भागात पाकिस्ताननं डागलेल्या तोफांमुळे काही घरांचं आणि व्यावसायिक आस्थापनांचं देखील नुकसान झालं. पाकिस्ताननं युद्धविरामाचं  उल्लंघन केल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केल...

November 8, 2025 7:55 PM November 8, 2025 7:55 PM

views 16

अमेरिकेत विमानसेवा विस्कळीत!

अमेरिकेत सरकारी कामकाज बंद पडल्याचा परिणाम म्हणून ५ हजारापेक्षा जास्त विमान उड्डाणं विलंबाने होत आहेत किंवा रद्द झाली आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी हवाई वाहतूक मंत्रालयाने न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, आणि वॉशिंग्टन डीसी इथून निघणाऱ्या विमान उड्डाणांमधे ४ टक्के कपात केली आहे. शटडाऊन सुरुच राहीला तर ...

November 8, 2025 1:55 PM November 8, 2025 1:55 PM

views 28

आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं केलं कौतुक

आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे. जागतिक दर्जाची डिजीटल सेवा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. तंत्रज्ञानातली क्षमता आणि उत्पादकतेत सुधारणा झाल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. यापुढेही आर्थिक विकास अधिक वेगानं होण्यासाठी आर्थिक व्यवस्...

November 8, 2025 12:33 PM November 8, 2025 12:33 PM

views 37

न्यायालयाची ट्रम्प यांना अमेरिकेतल्या राज्यांच्या विरोधात सैन्य तैनात करण्यास कायमची मनाई

अमेरिकेतल्या राज्यांमधे तिथल्या स्थानिक शासनाच्या मर्जीविरुद्ध सैन्य तैनात करायला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने कायमची मनाई केली आहे. स्थलांतर नियंत्रक अधिकाऱ्यांविरोधातली निदर्शनं रोखण्यासाठी ट्रम्प यांच्या सैन्य तैनातीच्या धोरणाला विरोध करणारा न्यायालयाचा हा पहिलाच निर्णय आहे. &n...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.