आंतरराष्ट्रीय

August 13, 2024 1:41 PM August 13, 2024 1:41 PM

views 20

कॅनबेरा इथं सहाव्या भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवादाचं आयोजन

ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबेरा इथं आज भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवाद आयोजित करण्यात आला होता. सर्वसमावेशक विकास  आणि जागतिक कल्याणासाठी सागरी क्षेत्रात सुरक्षित वातावरण कायम ठेवण्याच्या विविध मार्गांवर यावेळी चर्चा झाली. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातली सुरक्षा, सागरी क्षेत्राबाबत जागरूकता, मानवतावा...

August 13, 2024 9:57 AM August 13, 2024 9:57 AM

views 14

इस्राईल हवाई दलातल्या अधिकाऱ्यांच्या परदेशातल्या प्रवासावर बंदी

इस्राईल संरक्षण दलानं आपल्या हवाई दलातल्या अधिकाऱ्यांच्या परदेशातल्या प्रवासावर बंदी घातली आहे आणि खबरदारीचा इशारा दिला आहे. इराण आणि हिज्बुल्लाकडून प्रत्युत्तरादाखल हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे इशारा देण्यात आला आहे. हवाई दलातल्या कर्मचाऱ्यांना सुट्टीसाठी परदेशात जाण्यावरची बंदी तातडीनं लागू करण्यात...

August 13, 2024 9:52 AM August 13, 2024 9:52 AM

views 19

२०२३ मध्ये युरोपात उष्णतेच्या लाटेमुळे ४७ हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू

युरोपात २०२३ मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे ४७ हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. बार्लिनो जागतिक आरोग्य संस्थेनं याबाबत अहवाल तयार केला आहे. दक्षिण युरोपातल्या देशांना जास्त फटका बसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेलं वर्ष सर्वाधिक उष्ण असल्याचं त्यात म्हटलं आहे....

August 13, 2024 9:47 AM August 13, 2024 9:47 AM

views 11

ग्रीसमध्ये वणवे अथेन्समधल्या उपनगरांपर्यंत पसरले

ग्रीसमध्ये वणवे अथेन्समधल्या उपनगरांपर्यंत पसरले आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांना घरं सोडावी लागली आहेत. अनेक घरं, मोटारींना आगी लागल्या आहेत आणि रस्ते राख आणि धुरानं भरून गेले आहेत. आग सलग दुसऱ्या दिवशी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे सरकारनं युरोपीय संघातील सदस्य देशांकडून मदत मागवली आहे. अनेक शाळा आणि व...

August 13, 2024 9:44 AM August 13, 2024 9:44 AM

views 14

इराणचे उपाध्यक्ष मोहंमद जावेद झरीफ यांचा नियुक्तीनंतर अकराच दिवसांनी पदाचा राजीनामा

इराणचे उपाध्यक्ष मोहंमद जावेद झरीफ यांनी नियुक्तीनंतर अकराच दिवसांनी पदाचा राजीनामा दिला आहे. समाजमाध्यमांवर झऱीफ यांनी निर्णय जाहीर केला आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या निवडीसाठीच्या समितीचे प्रमुख म्हणून आपण कामात समाधानी नसल्याचं कारण त्यांनी दिलं आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील 19 सदस्यांपैकी किमान सात आप...

August 11, 2024 1:27 PM August 11, 2024 1:27 PM

views 11

बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांचा राजीनामा

न्यायव्यवस्थेत सुधारणा करायच्या मागणीसाठी बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात विद्यार्थी, अधिवक्ता आणि इतरांनी केलेल्या निदर्शनानंतर बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी काल राजीनामा दिला. बांगलादेशचे कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज सल्लागार प्राध्यापक आसिफ नजरुल यांनी समाजमाध्यमावरून ही...

August 11, 2024 1:24 PM August 11, 2024 1:24 PM

views 11

बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनूस यांनी अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांचा निषेध केला

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेते, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी देशातल्या अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. सर्व हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्यांकांचं  संरक्षण करायला हवं, असं आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.   दरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाका आणि ईशान्...

August 10, 2024 8:25 PM August 10, 2024 8:25 PM

views 13

इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात ९३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात ९३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ला झालेला भाग गाझाच्या पूर्वेला आहे. या भागात विस्थापितांनी आश्रय घेतला असून पहाटेच्या प्रार्थनेच्या वेळी हा हल्ला झाल्याची माहिती गाझाच्या स्थानिक सुरक्षा संस्थेनं दिली आहे. हमासच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी ह...

August 10, 2024 2:01 PM August 10, 2024 2:01 PM

views 11

ब्राझीलमधल्या प्रवासी विमान कोसळून ६१ जणांचा मृत्यू

ब्राझीलमधल्या साओ पाऊलो शहराजवळ आज एक प्रवासी विमान कोसळून ६१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्राझीलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विमानात ५७ प्रवासी आणि चार कर्मचारी प्रवास करत होते. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांविषयी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनसीयो लुला डीसिल्वा यांनी सहवेदना व्...

August 10, 2024 2:28 PM August 10, 2024 2:28 PM

views 9

व्हेनेझुएला मधे एक्स समाजमाध्यमावर १० दिवस बंदी

व्हेनेझुएला मधे एक्स समाजमाध्यमावर १० दिवस बंदी घालण्यात आली आहे. गेल्या २८ जुलैला व्हेनेझुएलामधे झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत द्वेषभावना पसरवल्याचा आरोप तिथले अध्यक्ष मादुरो यांनी एक्स चे मालक एलॉन मस्क यांच्यावर केला आहे. आपल्या विरोधकांनी राजकीय अराजक माजवण्यासाठी एक्स माध्यमाचा वापर केल्याचा आरो...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.