आंतरराष्ट्रीय

September 7, 2024 7:41 PM September 7, 2024 7:41 PM

views 11

दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांची वॉशिंग्टन इथं युद्ध प्रात्यक्षिकं

उत्तर कोरियाच्या संभाव्य धोक्याचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीनं दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांनी गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन इथं युद्ध प्रात्यक्षिक केलं. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र आणि आण्विक चाचण्या वाढवल्याच्या पा...

September 7, 2024 7:29 PM September 7, 2024 7:29 PM

views 44

पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या होकातो होतोझे सेमा याला कांस्यपदक

पॅरालिम्पिक मध्ये पुरुषांच्या गोळाफेकीत होकातो होतोझे सेमा याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रपतींनी सेमा याच्या कामगिरीचं समाजमाध्यमाद्वारे कौतुक केलं. एका भुसुरुंग स्फोटातून बचावलेल्या सेमा यानं आपल्या पॅरालिम...

September 7, 2024 1:48 PM September 7, 2024 1:48 PM

views 11

मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या उद्योन्मुख बाजार गुंतवणूक निर्देशांकातल्या मूल्यांकनात भारताची चीनवर आघाडी

MSCI अर्थात मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या EMIM अर्थात उद्योन्मुख बाजार गुंतवणूक निर्देशांकातल्या मूल्यांकनात भारतानं चीनला मागे टाकलं आहे. या निर्देशांकात भारताला २२ पूर्णांक २७ शतांश टक्के मूल्य मिळाले आहे, तर चीनची हिस्सेदारी २१ पूर्णांक ५८ शतांश टक्के आहे. गेल्या काही काळात भारतातल्या विविध...

September 7, 2024 12:48 PM September 7, 2024 12:48 PM

views 23

मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीमध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात १० पॅलेस्टिनी नागरिक ठार

मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात जवळपास दहा पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याची माहिती पॅलेस्टाईनमधल्या सूत्रांनी दिली आहे. मध्य खान यूनिस शहरातल्या कंदील कुटुंबाच्या घरावर इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाले तर काही जण जखमी झाले. तसंच मध्य गाझातल्या नुसेरत ...

September 5, 2024 1:32 PM September 5, 2024 1:32 PM

views 12

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची बैठक

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची सहावी बैठक काल रियाध इथं झाली. भारतीय सशस्त्र दलाचे संयुक्त सचिव, अमिताभ प्रसाद आणि सौदी अरेबियाचे सामरिक बाबींचे संरक्षण उपमंत्री, मेजर जनरल सलमान बिन अवध अल-हरबी यांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांन...

September 4, 2024 8:05 PM September 4, 2024 8:05 PM

views 5

ब्रुनेईचा दौरा आटोपून प्रधानमंत्री सिंगापूरमधे दाखल

दोन देशांच्या दौऱ्यातल्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरमधे पोहोचले. सिंगापूरचे गृह आणि कायदा मंत्री के षण्मुगम यांनी त्यांचं स्वागत केलं. सिंगापूरमधल्या भारतीय समुदायानं लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री या दौऱ्यात सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्...

September 4, 2024 9:36 AM September 4, 2024 9:36 AM

views 8

नागालँडमधल्या वोखा जिल्हा प्रशासनाला ई गव्हर्नन्ससाठीचा सुवर्ण पुरस्कार

नागालँडमधल्या वोखा जिल्हा प्रशासनानं सुरू केलेल्या वोखा साथी या व्हॉटसऍप उपक्रमाला राष्ट्रीय इ गव्हर्नन्स योजना पुरस्कारांमधला सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. ई गव्हर्नन्ससाठी नागालँड सरकारला पहिल्यांदाच सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. वोखा साथी हा कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपक्रम असून नागरिकांना वेळेत म...

September 2, 2024 1:29 PM September 2, 2024 1:29 PM

views 11

मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार

मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांनी इम्फाळ वेस्ट जिल्ह्यातल्या कौत्रुक या गावावर काल केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. मृतांमधे एका महिलेचा समावेश असून तिची आठ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.   दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. निःशस्त्र गावकऱ्यांवर कुकी अतिरेक्यांनी केलेला हा ...

September 2, 2024 1:22 PM September 2, 2024 1:22 PM

views 17

इस्राएलमधे युद्धविरामाच्या मागणीसाठी विविध संघटनांची निदर्शनं

इस्रायलमधे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासशी युद्धविरामाबाबत चर्चा करावी आणि गाझामध्ये ठेवलेल्या ओलीसांची सुटका करावी, ही मागणी जोर धरत आहे.   हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलांनी जाहीर केल्यानंतर काल या मागणीसाठी देशभरात निदर्शनं सुरू झ...

September 2, 2024 10:36 AM September 2, 2024 10:36 AM

views 16

दक्षिण कोरिया राबवणार सायबर सुरक्षा अभियान

दक्षिण कोरिया आपल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांचं, सायबर हल्ल्यापासून संरक्षण आणि अफवांचा मुकाबला करणं यासाठी आक्रमक सायबर सुरक्षा अभियान राबवणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सायबर सुरक्षा धोरणाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषद ने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय संरक्षण आणि विज्ञान त...