आंतरराष्ट्रीय

September 26, 2024 2:05 PM September 26, 2024 2:05 PM

views 15

युक्रेनला अण्वस्त्र पुरवणारा देश युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा

रशिया विरुद्धच्या युद्धात यूक्रेनला अण्वस्त्र पुरवल्यास संबंधित देशही त्या युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. मॉस्को इथं काल झालेल्या रशियाच्या सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. यूक्रेनने या युद्धात लांब पल्ल्याच्या पाश्चात्त्य क्षेपणास्त...

September 25, 2024 10:46 AM September 25, 2024 10:46 AM

views 15

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या अधिवेशनातील सर्वसाधारण चर्चेला न्यूयॉर्कमध्ये सुरूवात

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या अधिवेशनातील सर्वसाधारण चर्चेला काल न्यूयॉर्कमध्ये सुरूवात झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री, डॉ. एस. जयशंकर 28 सप्टेंबर रोजी भाषण करतील. कोणालाही मागं न टाकता सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी शांतता, शाश्वत विकास आणि मानवी प्रतिष्ठेच्या प्रगतीसाठी एकत्र काम करणं ही यंदा...

September 24, 2024 8:18 PM September 24, 2024 8:18 PM

views 9

इस्रायलने लेबनॉनमधल्या हिजबुल्लांच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यातल्या मृतांची संख्या ५५८ वर

इस्रायलने लेबनॉनमधल्या हिजबुल्लांच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यातल्या मृतांची संख्या ५५८ वर पोहचली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात कालपासून सुरु असलेल्या संघर्षात आतापर्यंत अठराशे ३५ लोक जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लेबनॉनमध्ये कारवाया वाढवणार असल्याचं इस्राय...

September 24, 2024 8:18 PM September 24, 2024 8:18 PM

views 14

श्रीलंकेच्या प्रधानमंत्रीपदी हरिणी अमरसुर्या यांचा शपथविधी

श्रीलंकेचे नवीन प्रधानमंत्री म्हणून हरिणी अमरसुर्या यांनी आज शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पॉवरच्या खासदार असलेल्या अमरसुर्या यांनी आज राष्ट्रपती सचिवालयात राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासमोर शपथ घेतली. दिसानायके यांनी कालच राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. एनपीपीचे खासदार विजित हेरथ आणि लक्ष्मण न...

September 24, 2024 1:42 PM September 24, 2024 1:42 PM

views 11

भारताच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी – मंत्री पियूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कालच्या पहिल्या दिवशी अनेक बैठका घेतल्या आणि भागधारकांशी संवाद साधला. बिझनेस कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेला गोयल उपस्थित होते. या बैठकीत भारताची मजबूत धोरणं आणि सुधारणांवर चर्चा झाली. भारतीय बाजारपेठेत...

September 24, 2024 1:29 PM September 24, 2024 1:29 PM

views 7

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याकडे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची जबाबदारी

भारतीय वंशाच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांनी ही घोषणा केली. सुनीता विल्मम्स बारा वर्षानंतर पुन्हा एकदा ही जबाबदारी सांभाळणार आहेत. सुनीता विल्यम्स आणि कोनोनेन्को यांनी...

September 24, 2024 1:08 PM September 24, 2024 1:08 PM

views 15

जपानला ५.९ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का

जपानला आज सकाळी सव्वा आठ वाजता ५ पूर्णांक ९ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला त्यानंतर टोकियोच्या दक्षिणेकडच्या बेटांवर ५० सेंटीमीटर ऊंचीच्या त्सुनामीच्या लाटा आदळल्या.या भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या इझू बेट साखळीतल्या तोरिशिमाजवळ होता. भूकंपाच्या के...

September 24, 2024 9:56 AM September 24, 2024 9:56 AM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलीनस्की यांच्याशी स्वतंत्र बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतल्या शिखर परिषदे नंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलीनस्की यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आर्मेनिया चे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि वॅटिकन होली सी चे परराष्ट्र मंत्री कार्डिनल पियेत्रो पेरोलीन यांच्या बरोबरही चर्चा केली....

September 23, 2024 8:34 PM September 23, 2024 8:34 PM

views 12

वर्ल्ड फ्री झोन्स ऑर्गनायझेशन काँग्रेसला आजपासून दुबईत मदिना जुमैरै इथं सुरुवात

दहावा वार्षिक  वर्ल्ड फ्री झोन्स ऑर्गनायझेशन काँग्रेसला आजपासून दुबईत मदिना जुमैरै इथं सुरुवात होत आहे.  आज सुरु झालेली ही परिषद 25 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.  मुक्त व्यापार क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिक संकल्पना आणि या क्षेत्रातल्या आव्हानांसंबधी विचारविमर्श करण्यासाठीचा हा मंच आहे. ...

September 23, 2024 8:24 PM September 23, 2024 8:24 PM

views 5

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या ३०० ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे.    दुसऱ्या बाजूला, हि...