आंतरराष्ट्रीय

September 28, 2024 2:18 PM September 28, 2024 2:18 PM

views 13

दिग्गज ब्रिटीश अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचं निधन

दिग्गज ब्रिटीश अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी लंडन इथं निधन झालं. हॅरी पॉटर या गाजलेल्या सिनेमातली प्रोफेसर मिनर्व्हा मॅक्गोनागल ही त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. स्मिथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे ५० हून अधिक चित्रपटांत विविध प्रकारच्या भूमिका केल्या. १९६९ मधील ‘दि प्रा...

September 28, 2024 1:38 PM September 28, 2024 1:38 PM

views 9

देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर

भारताच्या परकीय चलन गंगाजळीत २ अब्ज ८३ कोटी डॉलर्सने वाढ होऊन तो २० सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात यात २२ कोटी ३० लाख डॉलर्सची वाढ झाली होती.  भारताच्या सुवर्ण साठा मूल्यातही ७२ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो ६३ अब...

September 28, 2024 1:02 PM September 28, 2024 1:02 PM

views 3

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथं बिमस्टेक परिषदेच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्क इथं बिमस्टेक परिषदेच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. भौतिक, सागरी आणि डिजिटल संपर्क सुधारण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली, तसंच क्षमता विकास, कौशल्य विकास यावरही भर देण्याबाबत चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी वार्ताहरांना सांगि...

September 28, 2024 12:49 PM September 28, 2024 12:49 PM

views 11

भारताची जागतिक पोलाद निर्मिती क्षमता अडीच अब्ज टनांवर – मंत्री भुपतीराजु श्रीनिवास वर्मा

भारताची जागतिक पोलाद निर्मिती क्षमता अडीच अब्ज टनांवर पोहोचल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद राज्यमंत्री भुपतीराजु श्रीनिवास वर्मा यांनी दिली आहे. खनिज, धातू, धातूशास्त्र परिषदेच्या उद्घाटनावेळी ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते. पोलाद उद्योगातली कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानातल्या नवोन्मेषाचं...

September 28, 2024 11:29 AM September 28, 2024 11:29 AM

views 10

अफ्रिकेत मंकीपॉक्स आजाराचे ३२ हजार ४०० रुग्ण

अफ्रिकेत यावर्षीच्या सुरुवातीपासून मंकीपॉक्स या आजाराचे 32 हजार 400 रुग्ण आढळून आल्याची माहिती अफ्रिकेतील रोगनियंत्रण आणि प्रतिबंध विभागाच्या अफ्रिका केंद्रानं काल दिली. यामध्ये 6 हजार चारशेपेक्षा अधिक रुग्णांना लागण झाल्याची खात्री झाली असून 840 नागरिकांचा मंकापॉक्सनं मृत्यू झाला आहे अशी माहिती या ...

September 27, 2024 8:12 PM September 27, 2024 8:12 PM

views 5

भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात द्विपक्षीय गुंतवणूक करार

भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात आज ताश्कंद इथं द्विपक्षीय गुंतवणूक करार करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि उझबेकिस्तानचे उपप्रधानमंत्री  खोडजायेव जमशीद अब्दुखाकिमोविच यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारतातल्या  उझबेकिस्तानी  गुंतवणूकदारांना आणि उझबेकिस्तानमधल्या  भारतीय गुंतवणूकदारांना ...

September 27, 2024 2:27 PM September 27, 2024 2:27 PM

views 3

हिजबुल्लाहचा कमांडर मोहम्मद हुसेन स्रुर इस्राइलच्या हवाई हल्ल्यात ठार

हिजबुल्लाह चा कमांडर मोहम्मद हुसेन स्रुर काल इस्राइलच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. लेबननची राजधानी बैरुतमध्ये इस्राइलनं काल अनेक हवाई हल्ले केला. त्यात तो ठार झाल्याची माहिती इस्राइलच्या लष्करानं दिली आहे. इस्राइलवर हवाई हल्ले करणं, ड्रोन आणि क्रुझ क्षेपणास्र टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. लेबन...

September 27, 2024 1:29 PM September 27, 2024 1:29 PM

views 22

जपानचे नवे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा

जपानचे नवे प्रधानमंत्री म्हणून शिगेरू इशिबा हे निवडून आले आहेत. इशिबा यांनी २१५ मतं मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार साने ताकाईची यांचा पराभव केला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात जपानच्या संसदेची बैठक झाल्यानंतर इशिबा हे जपानचे प्रधानमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील.

September 26, 2024 8:44 PM September 26, 2024 8:44 PM

views 12

इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ६०० पेक्षा जास्त जण ठार

इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सहाशे पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत. हिजबुल्लाहने इस्रालवर क्षेपणास्त्राचा मारा करत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिका, फ्रान्स आणि मित्र राष्ट्रांनी इस्रायल-लेबनन सीमेवर २१ दिवसांचा युद्धविराम घ्यावा, अशी मागणी केली आहे. अमेरिका, फ्रान्ससह युरोपिय...

September 26, 2024 2:37 PM September 26, 2024 2:37 PM

views 19

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं बैरुतमधल्या भारतीय दुतावासाचं आवाहन

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरुतमधल्या भारतीय दुतावासाने केलं आहे. पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. ज्यांना तिथं राहणं आवश्यक आहे त्यांनी आवश्यकता नसेल तर बाहेर पडू नये ...