आंतरराष्ट्रीय

September 30, 2024 1:42 PM September 30, 2024 1:42 PM

views 18

श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा, येत्या १४ नोव्हेंबर रोजी होणार मतदान

श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या १४ नोव्हेंबर रोजी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. श्रीलंकेचे मुख्य निवडणूक आयुक्त सामन श्री रत्नायके यांनी प्रसारमाध्यमांना या निवडणुकीविषयी माहिती दिली. या निवडणुकीसाठी राष्ट्रपती...

September 30, 2024 12:49 PM September 30, 2024 12:49 PM

views 26

इस्रायलीच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबोलाचा अधिकारी नबिल कौक ठार

हिजबोलाचा अधिकारी नबिल कौक हा इस्रायलनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायलच्या सुरक्षा दलानं दिली आहे. कौक हा हिजबोलाच्या प्रतिबंधात्मक सुरक्षा पथकाचा कमांडर होता.  तो १९८० मध्ये या संघटनेत सामील झाला होता. त्यानंतर त्याला दक्षिणेकडच्या भागातला डेप्युटी कमांडर बनवण्यात आलं हो...

September 30, 2024 9:01 AM September 30, 2024 9:01 AM

views 11

जमैकाचे प्रधानमंत्री डॉ. अँड्रयू होलनेस चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

जमैकाचे प्रधानमंत्री डॉक्टर अँड्रयू होलनेस आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. जमैकाच्या प्रधानमंत्र्यांचा द्विपक्षीय स्तरावरील हा पहिलाच भारत दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे समपदस्थ यांच्या विविध मुद्यांवरील बैठकीच्या निमित्ताने यापुर्वी अनेकदा भेटी झाल्या आहेत. जमैकाचे प्रधा...

September 29, 2024 2:52 PM September 29, 2024 2:52 PM

views 6

पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही – मंत्री डॉ. एस जयशंकर

पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि या कृतींचे परिणाम त्या देशाला नक्कीच भोगावे लागतील, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत  बोलत  होते.  पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या भारतीय भूभागाची सुटका करणं  आणि दहशत...

September 29, 2024 2:49 PM September 29, 2024 2:49 PM

views 10

हिजबोलाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाच्या हत्येचा रशियाकडून निषेध

हिजबोलाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाच्या हत्येचा रशियाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. इस्राएलने काल लेबनॉनची राजधानी बैरुट इथं केलेल्या हवाई हल्ल्यात नसरल्ला मारला गेला. इस्राएलने ही आणखी एक राजकीय हत्या केली असून लेबनॉनवरचे हल्ले ताबडतोब थांबवावे अशी मागणी रशियाने केली आहे. दरम्यान नसरल्ला मारला गेला...

September 29, 2024 2:00 PM September 29, 2024 2:00 PM

views 9

अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासाचं क्रू नाईन मिशन रवाना

नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं आणि स्पेस एक्स या अंतराळयान निर्मिती करणाऱ्या कंपनीने काल क्रू ९ मिशन अंतर्गत अमेरिकेच्या फ्लोरिडा इथल्या केप कॅनवरल स्पेस फोर्स स्थानकावरून एक यान अंतराळात सोडलं. यात दोन अंतराळ प्रवासी तसंच दोन रिकाम्या खुर्च्या आहेत. मागच्या एक महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्था...

September 28, 2024 8:43 PM September 28, 2024 8:43 PM

views 9

इस्रायलने बैरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्हाचा प्रमुख नेता हसन नसरल्लाह ठार

इस्रायलने काल बैरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्हाचा प्रमुख नेता हसन नसरल्लाह ठार झाला आहे. इस्रायलचे चे लष्करी प्रवक्ता नादाव शोशानी यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. लेबननच्या सशस्त्र दलानही याची पुष्टी केली आहे. नसराल्लाह हा गेल्या ३२ वर्षांपासून इराणच्या समर्थक हिजबुल्लाह गटाचा प्रमुख होता...

September 28, 2024 8:30 PM September 28, 2024 8:30 PM

views 9

तांझानिया मध्ये ट्रकला झालेल्या अपघातात ११ जण ठार

तांझानिया मध्ये ट्रकला झालेल्या अपघातात ११ जण ठार झाले असून इतर २१ जण जखमी झाले. तांझानियाच्या दक्षिणेकडच्या मेब्या या डोंगराळ भागात आज सकाळी हा अपघात झाला. भरधाव वेगानं जाणारा ट्रक घाटात उलटून हा अपघात झाला. यातील ५ जणांचा जागीच तर ६ जणांचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला.

September 28, 2024 8:24 PM September 28, 2024 8:24 PM

views 10

ओसीआय कार्डधारकांसाठी कोणतेही नवे बदल केलेले नाही – भारतीय वाणिज्य दूतावास

ओसीआय कार्डधारकांसाठी कोणतेही नवे बदल केले नसल्याचं न्यूयॉर्कमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं अमेरिकेतल्या भारतीय समुदायाला कळवलं आहे. ओसीआय कार्डधारकांवर बंधनं आणल्याचा दावा करणारं वृत्त दूतावासानं समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे फेटाळलं आहे. ओसीआय कार्डधारकांना ४ मार्च २०२१ च्या अधिसूचनेद्वारे दिलेले...

September 28, 2024 2:33 PM September 28, 2024 2:33 PM

views 11

लेबननची राजधानी बैरुतमधील अनेक नागरी वसाहतींवर हवाई हल्ले

इस्रायलच्या फौजांनी काल लेबननची राजधानी बैरुतमधील अनेक नागरी वसाहतींवर हवाई हल्ले केले. इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबोल्हा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह यांच्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं इस्रायली आणि अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. इस्रायली प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहू यांच...