आंतरराष्ट्रीय

October 10, 2024 10:34 AM October 10, 2024 10:34 AM

views 13

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आणि इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा केली. सुमारे अर्ध्या तासाची ही चर्चा थेट आणि महत्त्वपूर्ण होती असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. लेबनानमधील विशेषतः बैरुतमधील सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी हानी पोचेल ...

October 10, 2024 10:23 AM October 10, 2024 10:23 AM

views 8

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून प्रधानमंत्र्यांचं कौतुक

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. मोदी उत्तम माणूस आहेत आणि आपले मित्र आहेत असं ट्रम्प यांनी फ्लॅग्रंट पॉडकास्ट या कार्यक्रमात म्हटलं आहे. मोदी यांनी 2019 मध्ये ह्युस्टनला दिलेल्या भेटीतील हाऊडी मोदी या कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो अशी आठवणही...

October 9, 2024 8:25 PM October 9, 2024 8:25 PM

views 3

अमेरिकेत मिल्टन चक्रिवादळ धडकण्याचा इशारा

अमेरिकेत फ्लोरिडाच्या पश्चिम किनारपट्टीवर मिल्टन चक्रिवादळ धडकण्याचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टीवरच्या रहिवाशांना तिथून दूर जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आपला जर्मनी आणि अंगोला या देशांचे नियोजित दौरे पुढे ढकलले आहेत. हे चक्रिवादळ पाच क्रमांच्या श्रे...

October 8, 2024 2:20 PM October 8, 2024 2:20 PM

views 12

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू आज आग्रा इथं ताजमहालला सपत्नीक भेट देणार

भारताच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू आज आग्रा इथं ताजमहालाला सपत्नीक भेट देणार आहेत. आग्रा इथल्या विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वतीने राज्यमंत्री योगेंद्र उपाध्याय त्यांचं स्वागत करतील. मुईज्जू यांच्या भेटीमुळे ताजमहाल सर्वसामान्यांसाठी दोन तास बंद ठेवला जाईल...

October 8, 2024 10:53 AM October 8, 2024 10:53 AM

views 16

भारताकडून मालदीवला ४०० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर

भारताने मालदीवला ४०० दशलक्ष डॉलर्सची मदत आणि पूर्वनिर्धारित अटी आणि शर्तींसह परस्परांचं 3 हजार कोटी रुपयांचं चलन अदलाबदल करण्याला काल मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आल...

October 7, 2024 1:56 PM October 7, 2024 1:56 PM

views 6

पाकिस्तानमधे विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटात २ जण ठार

पाकिस्तानात काल रात्री कराची विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटात दोन जण ठार तर अनेक जण जखमी झाले. बलुच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी चीनच्या गुंतवणुकदारांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जखमींना जिना वैद्यकीय महाविद्यालयात उप...

October 7, 2024 10:35 AM October 7, 2024 10:35 AM

views 9

इस्राइलच्या लष्करानं अतीदक्षतेचा इशारा

दरम्यान, हमास या दहशतवादी संघटनेनं इस्राइलवर हल्ला केल्याच्या घटनेला आज वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्राइलच्या लष्करानं अतीदक्षतेचा इशारा दिला आहे.   गाझामधून लांब पल्ल्याच्या रॉकेटस् द्वारे किंवा अन्य प्रकारे हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन इस्राइलनं गाझा सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैन...

October 7, 2024 10:30 AM October 7, 2024 10:30 AM

views 12

इस्रायल-लेबनॉन सीमेवरील तणावात वाढ

इस्रायल आणि हिजबोला या देशांमधला संघर्ष तीव्र होत असताना, इस्रायल-लेबनॉन सीमेवरील तणावही वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे जीवितहानी वाढत असून अनेक नागरिक विस्थापित होत आहेत. यामुळे वाढत्या हिंसाचाराच्या वाढत्या प्रभावाविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायलच्य...

October 6, 2024 7:49 PM October 6, 2024 7:49 PM

views 19

महिला टी- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय

दुबई इथं  सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून १०५ धावा केल्या. भारतानं ४ गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली.   स्मृती मंधना आज लवकर बाद झा...

October 5, 2024 2:56 PM October 5, 2024 2:56 PM

views 27

इस्लामाबाद राजधानीच्या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान लष्कराकडे सोपवण्याचा पाकिस्तान सरकारनं निर्णय

पाकिस्तान सरकारनं इस्लामाबाद या राजधानीच्या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्यानं होत असलेली हिंसक निदर्शनं, आंदोलनं, विस्कळीत मोबाईल आणि इंटरनेट सेवा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्लामाबाद आणि रावळपिंडी या शहरांमध्ये तेहरीक- ए-इन्साफ ...