आंतरराष्ट्रीय

October 17, 2024 11:05 AM October 17, 2024 11:05 AM

views 7

राष्ट्रपती आजपासून तीन दिवसांच्या मालावी दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 19 तारखेपर्यंत मालावीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती मालावीमध्ये द्विपक्षीय बैठका घेणार आहेत आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मॉरिटॅनियाचे अध्यक्ष मोहंमद औल्ड घझौनी यांच्याशी द्विपक्षी...

October 16, 2024 8:46 PM October 16, 2024 8:46 PM

views 15

लेबननच्या नाबतिह शहरावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू

लेबननच्या नाबतिह शहरावर इस्रायलने आज केलेल्या हवाई हल्ल्यात महापौरासह सहा नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायली लष्कराने झेबडीन आणि कफार तेबनीत या भागांवरही हल्ले केले. तर हिजबोल्लाहने उत्तर इस्रायलमधल्या कार्मिएलच्या दिशेने क्षेपणास्त्रं डागली. 

October 16, 2024 8:43 PM October 16, 2024 8:43 PM

views 8

नायजेरियात इंधनाच्या टँकरचा स्फोटात ९४ जणांचा मृत्यू, ५० ठार

नायजेरियात एक इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन ९४ जण मारले गेले तर ५० जण जखमी झाले. टँकरचालकाचं वाहनावरचं नियंत्रण गेल्यामुळे हा टँकर कलंडला होता. त्यातलं इंधन जमा करायला जमलेल्या जमावातल्या बहुसंख्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नायजेरियातले इंधनाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेचे आहेत त्यामुळे असे अपघात अ...

October 16, 2024 8:41 PM October 16, 2024 8:41 PM

views 12

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ८ मुद्द्यांवर सर्व देशांमध्ये सहमती

इस्लामाबादमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ८ मुद्द्यांवर सर्व देशांमध्ये सहमती झाली. ही बैठक अतिशय फलदायी ठरल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, डिजिटल सर्वसमावेशन, मिशन लाइफ आणि संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासाठी उद्दिष्ट साध्य ...

October 16, 2024 8:37 PM October 16, 2024 8:37 PM

views 10

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू मॉरिटानिया इथं पोहचल्या

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू तीन देशांच्या दौऱ्यावर असून आज त्या मॉरिटानिया मध्ये दाखल झाल्या आहेत. मॉरिटानियाचे राष्ट्रपती मोहम्मद औलद गजौनी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मॉरिटानिया दौऱ्यात राष्ट्रपती तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांची भेट घेणार आहे. तसंच द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत.

October 16, 2024 3:28 PM October 16, 2024 3:28 PM

views 10

कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही – परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद ही जगासमोरची मुख्यं आव्हानं असून, कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या भूमीवरून दिला आहे. ते आज इस्लामाबाद इथं तेवीसाव्या शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओच्या परिषदेला संबोध...

October 16, 2024 1:49 PM October 16, 2024 1:49 PM

views 8

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून आज दुसऱ्या टप्प्यात मॉरिटानियाला रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून आज दुसऱ्या टप्प्यात मॉरिटानियाला रवाना झाल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी अल्जेरियाचे उच्चपदस्थ आणि शिष्टमंडळांसोबत विविध द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि भारत-अल्जेरिया संबंधांना बळकटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय केला.   मॉरिटान...

October 16, 2024 8:32 PM October 16, 2024 8:32 PM

views 19

जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे ओमर अब्दुल्ला यांचा शपथविधी

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून  नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज शपथ घेतली. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अब्दुल्ला यांच्याबरोबर आ...

October 15, 2024 2:30 PM October 15, 2024 2:30 PM

views 8

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सचिव स्तरावरची नवी दिल्लीत चर्चा 

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सचिव स्तरावरची चर्चा नवी दिल्लीत झाली. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यात सहभागी झाले होते. यावेळी राजकीय, संरक्षण, सुरक्षा, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य राखणं तसंच भारत - ऑस्ट्रेलिया सर्...

October 15, 2024 9:53 AM October 15, 2024 9:53 AM

views 12

भारत आणि कोलंबिया यांच्यात आज नवी दिल्लीत दृक-श्राव्य कार्यक्रमांच्या सहनिर्मितीबाबत करार करण्यात येणार

भारत आणि कोलंबिया यांच्यात आज नवी दिल्लीत दृक-श्राव्य कार्यक्रमांच्या सहनिर्मितीबाबत करार करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि कोलंबियाच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री जॉर्ज एन्रिके-रोखास रॉड्रिगेझ यांच्यासह दोन्ही देशांचे अन्य प्रतिनिधी या करारावर स्वाक्षरी करतील