आंतरराष्ट्रीय

November 1, 2024 10:41 AM November 1, 2024 10:41 AM

views 17

व्हॅलेन्सिया प्रदेशात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 140 लोक मृत्युमुखी

स्पेनमधील, व्हॅलेन्सिया प्रदेशात, अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात, आतापर्यंत 140 लोक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संरक्षण मंत्री मार्गारिटा रोबल्स यांनी अद्यापी अनेक लोक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगत, बेपत्ता लोकांचा कसून शोध घेण्यात येत असल्याचं म्हंटलं आहे. 

October 29, 2024 7:52 PM October 29, 2024 7:52 PM

views 11

हिजबुल्लाहचा नवा प्रमुख म्हणून नईम कासीमच्या नावाची घोषणा

हिजबुल्लाहचा नवा प्रमुख म्हणून या संघटनेच्या संस्थापक सदस्य असलेल्या नईम कासीम च्या नावाची घोषणा हिजबुल्लाहनं केली आहे. ७१ वर्षांचा कासीम या संघटनेत १०९१ पासून उपसरचिटणीस म्हणून काम करत आहे. महिन्याभरापूर्वी इस्रायलनं केलेल्या बॉम्बहल्ल्यात मारला गेलेल्या हसन नसरल्लाह ची जागा आता कासीम घेईल.  १९९७ म...

October 29, 2024 7:08 PM October 29, 2024 7:08 PM

views 8

भारत-स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर -स्पेन प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ

भारत – स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील असं स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी म्हटलं आहे. मुंबईत चौथ्या स्पेन- भारत मंचाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शाश्वत भविष्याच्या दृष्टीनं या दोन्ही देशांचं सहकार्य सकारात्मक पुढाकार ठरेल असा विश्वा...

October 29, 2024 1:43 PM October 29, 2024 1:43 PM

views 12

इस्रायलचा संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांसोबत ५३ कोटी ७० लाख डॉलर्सचा करार

इस्रायलने राफेल प्रगत संरक्षण प्रणाली आणि एल्बिट सिस्टीम नावाच्या दोन इस्रायली संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांसोबत ५३ कोटी ७० लाख डॉलर्सचा करार केला आहे. इस्रायलची लेझर संरक्षण प्रणाली आणखी मजबूत करणं हा या करारामागचा उद्देश आहे. या करारांतर्गत आयर्न बीम लेझर इंटरसेप्शन नावाच्या प्रणालीचं उत्पादन वाढवण्...

October 29, 2024 10:22 AM October 29, 2024 10:22 AM

views 5

बडोद्यामध्ये भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रातील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

गुजरातमधील बडोदा इथं काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेझ यांच्यातील शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या बैठकीवेळी भारत आणि स्पेन यांच्यात रेल्वे वाहतूक, सीमाशुल्क, आणि गुंतवणुकीशी संबंधित सामंजस्य करार करण्यात आले. तसंच २०२६ हे वर्ष भारत-स्पेन यांच्यातलं सांस्कृतिक, पर्यटन ...

October 28, 2024 8:03 PM October 28, 2024 8:03 PM

views 11

इजिप्त अध्यक्षांनी गाझापट्टीवर दोन दिवसांच्या युद्धबंदीचा ठेवलेला प्रस्ताव इस्त्रायल प्रधानमंत्र्यांनी फेटाळला

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल सिसी यांनी  गाझापट्टीवर दोन दिवसांच्या युद्धबंदीचा  ठेवलेला प्रस्ताव इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी आज फेटाळला. अनेक  पॅलिस्टिनी कैद्यांच्या बदल्यात चार इस्त्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी या युद्धबंदीची मागणी सिसी यांनी अल्जेरियाचे अध्यक्ष अब्द...

October 28, 2024 8:03 PM October 28, 2024 8:03 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांची प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा

स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली. महितीतंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण, सुरक्षा, पुर्ननवीकरणीय ऊर्जा आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्यांवरही उभय नेत्यांनी चर्चा केली. परराष्ट्रव्यवहार म...

October 28, 2024 2:37 PM October 28, 2024 2:37 PM

views 9

जपानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत सत्तापालट

जपानमध्ये काल झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीच्या मतमोजणीत जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमॉक्रॅटीक युतीला बहुमत गमवावं लागलं. मतमोजणी नुसार विरोधी पक्षांनी कनिष्ठ सभागृहात अर्ध्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या. डेमॉक्रॅटीक पार्टी आघाडीला  जागा मिळाल्या, तर विरोधी पक्षाला २३५ जागा मिळाल्या. त्यात मुख्य विरोधी ...

October 27, 2024 8:14 PM October 27, 2024 8:14 PM

views 7

जपानमध्ये कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

जपानमध्ये कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या ५० व्या निवडणुकीत ४६५ जागांपैकी २८९ जागांवर थेट निवडणुकीच्या माध्यमातून खासदार निवडले जातील, तर आणखी १७६ खासदार हे देशातल्या ११ मतदारसंघांमधून मतदारसंघाच्या आकारानुसार असलेल्या प्रमाणात प्रातिनिधिक स्वरुपात निवडले जातील. LDP अर्थात, लिबरल ...

October 26, 2024 6:50 PM October 26, 2024 6:50 PM

views 6

UNSC चर्चासत्रात काश्मिरबाबत चुकीची भूमिका मांडल्यानं भारताची पाकिस्तानवर टीका

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या चर्चासत्रात काश्मिरबाबत चुकीची भूमिका मांडल्यानं भारतानं पाकिस्तानवर कठोर टीका केली आहे. पाकिस्तानचं हे कृत्य चुकीच्या माहितीचा प्रसार करण्याच्या नेहमीच्या सवयीनुसार निंदनीय आणि खोडसाळ असल्याचं भारताचे सुरक्षा परिषदेतले कायम प्रतिनिधी पी हरीश यांनी म्हटलं आहे...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.