आंतरराष्ट्रीय

November 11, 2024 8:29 PM November 11, 2024 8:29 PM

views 10

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचं वृत्त रशियानं फेटाळलं

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचं वृत्त रशियानं फेटाळलं आहे. ट्रम्प निवडणुुकीत विजयी झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्याचं वृत्त खोटं आणि काल्पनिक असल्याचं रशियाच्या अध्यक्षांचे प्रवक्ते...

November 11, 2024 2:17 PM November 11, 2024 2:17 PM

views 1

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲरिझोना जिंकले

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲरिझोना राज्य जिंकलं आहे. ११ इलेक्टोरल मतं असलेलं ॲरिझोना हे निकाल जाहीर करण्यासाठीचं शेवटचं राज्य होतं. ५ नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी जिंकलेली पेनसिल्व्हिनिया, विस्कॉन्सिन, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, नेवाडा आणि जॉर्जिया ...

November 11, 2024 2:05 PM November 11, 2024 2:05 PM

views 11

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात करणार श्रीलंकेचा दौरा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात आर्थिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या आढाव्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख पीटर ब्रेअर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ श्रीलंकेची आर्थिक धोरणं, सुरू असलेल्या सुधारणांवरील प्रगती आणि मागील करारांच्या अंमलबजावणीचा आढावा घेईल. ...

November 11, 2024 2:03 PM November 11, 2024 2:03 PM

views 12

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच दूरध्वनीवरुन चर्चा केली. युक्रेन विरुद्धच्या युद्धात आणखी आक्रमकता नको, असा सल्ला ट्रम्प यांनी पुतीन यांना दिला. या मुद्द्यावर रशियासोबत आणखी चर्चा करण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखवली. बुधवारी ट्रम्प ...

November 11, 2024 1:56 PM November 11, 2024 1:56 PM

views 3

भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याचं प्रतिपादन

भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केली. मुंबईत भारत - रशिया व्यावसायिक परिषदेला ते संबोधित करत होते. रशियाचे प्रथम उप प्रधानमंत्री डेनिस मान्टुरोव्ह यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. दोन्ही देशांमधला व्यापार सध्या ६६ अब्ज अमे...

November 11, 2024 10:51 AM November 11, 2024 10:51 AM

views 3

रशिया आणि युक्रेनचे परस्परांवर विक्रमी संख्येने ड्रोन हल्ले

रशिया आणि युक्रेननं काल एका रात्रीत परस्परांवर विक्रमी संख्येने ड्रोन हल्ले केले. रशियानं काल रात्री एकंदर 145 ड्रोन हल्ले केले, तर युक्रेननं देखील मॉस्कोच्या दिशेनं 34 ड्रोन हल्ले केले. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाच्या राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे, यामुळे शहरातील तीन प...

November 10, 2024 8:02 PM November 10, 2024 8:02 PM

views 27

रशिया आणि युक्रेनकडून परस्परांवर ड्रोनचा बेछूट मारा

रशिया आणि युक्रेन यांनी काल रात्रभर परस्परांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. काल रात्री रशियानं एकूण १४५ ड्रोन्स सोडले. एकाच रात्रीतला हा सर्वात मोठा ड्रोनचा मारा होता. आज सकाळी युक्रेननं मॉस्कोवर ३४ ड्रोन्सचा मारा केला. २०२२ मधे हा संघर्ष सुरु झाल्यापासून रशियावर राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा...

November 10, 2024 7:56 PM November 10, 2024 7:56 PM

views 14

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये पहिल्यांदा एका मुलाला बर्डफ्ल्युची लागण

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये एका कुमारवयीन मुलाला बर्डफ्ल्युची लागण झाली असून एच-५ या विषाणूमुळे कोंबड्या आणि पक्षांना होणाऱ्या या आजाराची लागण माणसांना व्हायची त्या देशातली ही पहिलीच वेळ आहे. लहान मुलांसाठीच्या विशेष रुग्णालयात या मुलावर उपचार सुरु असून अशी लागण होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला...

November 10, 2024 7:53 PM November 10, 2024 7:53 PM

views 3

‘दुबई’ शहर पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये सर्वोच्च स्थानावर, जागतिक पातळीवर पाचव्या स्थानी

ग्लोबल सिटी इंडेक्स २०२४ या अहवालाच्या आकडेवारीनुसार दुबई हे शहर पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमधून प्रथम क्रमांकावर असलेलं शहर म्हणून उदयाला आलं असून सलग दोन वर्षं ते सर्वोच्च स्थानावर आहे. सिंगापूर, लॉस एंजेलिस, सिडनी, सॅन फ्रान्सिस्को, ॲमस्टरडॅम अशा शहरांना मागे टाकून दुबईने जागतिक पातळीवर प...

November 10, 2024 10:25 AM November 10, 2024 10:25 AM

views 8

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज आशिया 2025 मध्ये सात भारतीय संस्थांना सर्वोच्च शंभरमध्ये स्थान

भारतातल्या सात संस्थांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज आशिया 2025 मध्ये सर्वोच्च शंभरात स्थान मिळवलं आहे. दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटीसह भारतातली दोन विद्यापीठे पहिल्या पन्नासमध्ये तर सात विद्यापीठे सर्वोच्च शंभरात आली आहेत. संपूर्ण खंडामध्ये उच्चशिक्षणात भारताच्या उत्त...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.