आंतरराष्ट्रीय

December 12, 2024 2:35 PM

views 10

पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पाउलो रांगेल आज त्यांच्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. उद्या नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत पाउलो रांगेल यांची बैठक होणार आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांचे बहुआयामी संबंध अधिक द...

December 12, 2024 1:43 PM

views 52

गाझा पट्टीत युद्धबंदी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा ठराव मंजूर

संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत आज गाझा पट्टीत सुरु असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करण्या संदर्भातला ठराव मंजूर झाला. यावेळी सर्व युद्धबंद्यांना तात्काळ सोडण्याचीही मागणी करण्यात आली. १९३ सदस्यांच्या राष्ट्रसंघातल्या १५८ सदस्यांनी युद्धबंदी करण्याच्या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं.  

December 12, 2024 10:35 AM

views 12

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब अमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत होणार सहभागी

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब आमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब आमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत. नाह्यान आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रा...

December 12, 2024 10:24 AM

views 18

अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खलिल रेहमान हक्कानी यांचा काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू

अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खालिल रेहमान हक्कानी यांचा काल आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला. काबूलमधील त्यांच्या कार्यालयात हा स्फोट झाला. हक्कानी कागदपत्रांवर सही करत असताना आत्मघातकी हल्लेखोरानं प्रवेश केला आणि त्यानं बॉब उडवून दिला. या हल्ल्यात आणखी सहा जणांचाही मृत्यू झाला. हा हल्ला आयस...

December 11, 2024 7:52 PM

views 14

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सिरीयाची राजधानी दमास्कस येथील जनजीवन पूर्ववत

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सिरीयाची राजधानी दमास्कस येथील जनजीवन पूर्ववत होत असून लोक त्यांच्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडत आहेत, असं सिरीयाचे हंगामी प्रधानमंत्री मोहम्मद अल बशीर यांनी सांगितलं. बाहेर देशात गेलेल्या सिरीयन नागरिकांना परत आणणं ही आपली प्राथमिकत आहे असं बशीर म्हणाले. देशात स्थैर्य ...

December 11, 2024 7:21 PM

views 13

२१ वे ऑटोमेकॅनिका दुबई हे प्रदर्शन दुबई जागतिक व्यापार केंद्रात सुरु

वाहन उद्योगाशी संबंधित २१ वे ऑटोमेकॅनिका दुबई हे प्रदर्शन दुबई जागतिक व्यापार केंद्रात सुरु झालं असून भारतीय वाहन उद्योगाचा त्यात वाढता  सहभाग आहे. १७ दालनं,२ हजार २०० हुन अधिक सहभागी यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीचं प्रदर्शन १८ टक्क्यांनी मोठं ठरलं आहे. गेल्या वर्षी १६१ देशातल्या तब्बल ५३ ह...

December 11, 2024 10:05 AM

views 12

सीरियामध्ये मोहम्मद अल-बशीर यांची काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती

सीरियामध्ये मोहम्मद अल-बशीर यांची काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी १ मार्चपर्यंत ते अंतरिम सरकारचे नेतृत्व करतील. असं बशीर यानी दुरचित्रवाणीवरील संबोधनात सांगितलं. सिरीयामध्ये बंडखोरांच्या आंदोलनानंतर बशर अल असाद यांनी देश सोडून पलायन केलं आहे. या बंडखोरी करणाऱ्या ...

December 10, 2024 7:22 PM

views 32

चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती

चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. चीनच्या किनारी भागातल्या समुद्रात गेल्या २४ तासांत ४७ विमानं आणि १२ युद्धनौका आढळून आल्या आहेत. यातल्या काही युद्धनौका ओकिनावा, तैवान आणि फिलिपीन्सना जोडणाऱ्या समुद्री भागात तैनात आहेत....

December 10, 2024 7:04 PM

views 22

फिलीपिन्समधे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे सुमारे ८७ हजार लोकांचं स्थलांतर

फिलीपिन्समधल्या  नेग्रोस बेटावरच्या  माउंट कानलाओन या ज्वालामुखीचा  उद्रेक झाल्या असून या भागातून  सुमारे ८७ हजार  लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.  या उद्रेकात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, संभाव्य उद्रेकांचा  धोका असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्वालामुखीची राख विस्तृत क्षेत्रावर पड...

December 10, 2024 9:54 AM

views 8

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँद्रे बेलुसोव्ह भारत-रशिया आंतर-सरकार लष्कर सहकार्य परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँद्रे बेलुसोव्ह आज मॉस्कोमध्ये भारत-रशिया आंतर-सरकार लष्कर सहकार्य परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत. लष्करी सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांचा दोन्ही मंत्री आढावा घेतील. विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांबाबतही चर्चा होणार आहे. राजनाथसिंह रवि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.