आंतरराष्ट्रीय

November 26, 2024 7:51 PM November 26, 2024 7:51 PM

views 5

बांग्लादेशात पोलिसांनी इस्कॉन पुंडरीक धामच्या चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनुयायांवर लाठीचार्ज

बांग्लादेशात पोलिसांनी इस्कॉन पुंडरीक धामच्या चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनुयायांवर लाठीचार्ज केला आणि आवाजी बॉम्ब फोडले. आपल्या नेत्याच्या सुटकेची मागणी करण्यासाठी त्यांचे अनुयायी चितगाव न्यायालयाच्या आवारात जमले होते. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली. अ...

November 26, 2024 7:22 PM November 26, 2024 7:22 PM

views 31

पाकिस्तान इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात करण्याची गृहमंत्रालयाची घोषणा

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं तेहरीक ए इन्साफ पक्षाचे समर्थक आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत सहा जवानांचा मृत्यू झाल्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात करण्याची घोषणा आज गृहमंत्रालयाने केली. आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे तसंच आवश्यकत...

November 25, 2024 7:59 PM November 25, 2024 7:59 PM

views 5

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांची भेट

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज रोम इथं फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये भारत आणि फ्रान्स देशांतील भागीदारी,युक्रेन आणि जागतिक समस्यांवर चर्चा झाली. डॉक्टर जयशंकर यांनी भूमध्य संवाद परिषदेवेळी लेबनॉनचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बोहबीब आणि क्...

November 25, 2024 7:26 PM November 25, 2024 7:26 PM

views 14

भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि अफ्रिका उपक्रमाचं दुबईत उद्घाटन

भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि अफ्रिका या उपक्रमाचं उद्घाटन आज दुबईत झालं. अमर्याद क्षितिजे ही यावर्षीच्या या उपक्रमाची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मंचाचे उद्दिष्ट तंत्रज्ञान, वित्त, शाश्वतता आणि नवोन्मेष यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये भागीदारी मजबूत करणे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री...

November 22, 2024 3:10 PM November 22, 2024 3:10 PM

views 10

श्रीलंकेत सत्ताधारी पक्षातल्या २९ जणांची उपमंत्री म्हणून नियुक्ती

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी सत्ताधारी पक्षातल्या २९ जणांची आज उपमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या सोमवारी राष्ट्रपतींनी २१ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली होती. श्रीलंकेचं आताचं मंत्रिमंडळ गेल्या काही दशकातलं सर्वात लहान आकाराचं मंत्रिमंडळ आहे. आतापर्यंत शपथ घेतलेल्या मंत्र...

November 22, 2024 2:48 PM November 22, 2024 2:48 PM

views 8

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने काढलेल्या वॉरंटचा जो बायडन यांच्याकडून निषेध

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक इस्रायली नेत्यांच्या अटकेसाठी काढलेल्या वॉरंटचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निषेध केला आहे. आयसीसीची ही कृती इस्रायलच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजिबात न्याय्य नाही. इस्रायलला असलेल्य...

November 22, 2024 1:28 PM November 22, 2024 1:28 PM

views 12

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची घेतली भेट

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लाओसमध्ये व्हिएन्तियान इथे जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची भेट घेतली. निकातानी यांच्यासोबत या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये इंडो-पॅसिफिक प्रदेशातल्या मुक्त भागिदारीविषयी चर्चा झाल्याचं सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. त्यानंतर सिंग यांनी फिलि...

November 22, 2024 1:23 PM November 22, 2024 1:23 PM

views 11

तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतण्यासाठी रवाना

तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परत यायला निघाले आहेत. गेल्या दशकभरात झालेला भारताचा प्रवास हा प्रमाण, गती आणि शाश्वततेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल गयानामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना केलं. गयानात जॉर्जटाऊन इथल्या नॅशनल कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्...

November 21, 2024 8:01 PM November 21, 2024 8:01 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गयानाकडून ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आला. मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत-गयाना देश...

November 21, 2024 3:55 PM November 21, 2024 3:55 PM

views 5

वॉशिंग्टनमध्ये बॉम्ब चक्रीवादळामुळे कोसळलेल्या झाडाखाली दबून दोघांचा मृत्यू

बॉम्ब चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या इशान्येकडील भागात आणि कॅनडाच्या पश्चिमेकडील भागात मोठं नुकसान झालं आहे. वॉशिंग्टनमध्ये चक्रीवादळाने कोसळलेल्या झाडाखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. वॉशिंग्टनमध्ये ५ लाख लोकांना वीजेशिवाय राहावं लागलं असून अनेक ठिकाणी वृक्ष आणि वीजेच्या तारा पडल्या. या चक्रीवादळाचा प्रभ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.