आंतरराष्ट्रीय

December 23, 2024 1:26 PM

views 11

अमेरिकेचे कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठीचे सल्लागार म्हणून भारतीय नागरिक श्रीराम कृष्णन यांची निवड

अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणारे डोनाल्ड ट्र्म्प यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठीचे सल्लागार म्हणून भारतीय नागरिक श्रीराम कृष्णन यांची निवड केली आहे. ते अमेरिकन सरकारच्या कृत्रिम बुद्धीमत्ता धोरणासाठीचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. श्रीराम कृष्णन यांच्यावर व्हाईट हाऊसच्या कृत...

December 23, 2024 1:21 PM

views 21

ब्राझीलमध्ये पर्यटनस्थळावर विमान कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये काल ग्रामाडो शहरातल्या एका पर्यटनस्थळावर एक विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात विमानाच्या पायलटसह सर्व १० जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिकजण जखमी झाले. ट्विन-इंजिन असलेलं पायपर पी.ए-४२ चेयेन हे विमान उड्डाणानंतर लगेचच एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोसळले आणि नंतर शेजारच्या फर्निचरच्या...

December 23, 2024 1:10 PM

views 20

दक्षिण आफ्रिकेत वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये १९ नागरीक ठार

दक्षिण आफ्रिकेत काल वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये १९ नागरीक ठार झालेत. लिम्पोपो भागात एन १ महामार्गावर सात गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर पाच जखमी झालेत. तर केप प्रांतात ट्रक आणि प्रवासी टॅक्सी यांच्यातच धडक होऊन झालेल्या  अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला.

December 23, 2024 10:01 AM

views 16

इस्त्रायलनं गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात ३२ नागरिक ठार, ५४ जखमी

इस्त्रायलनं गेल्या 24 तासांत गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात किमान 32 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आणि 54 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दोहा इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान शस्त्रसंधीसाठी प्रयत्न होत आहेत. कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्...

December 23, 2024 12:17 PM

views 14

सर्बियात बेलग्रेडमध्ये २९,०००हून अधिक नागरिकांचं सरकारविरोधात निदर्शन

सर्बियात बेलग्रेडमध्ये काल २९ हजारपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊन सरकारविरोधात निदर्शनं केली. गेल्या काही वर्षांमध्ये या देशात झालेलं हे सर्वांत मोठं आंदोलन ठरलं आहे. नोव्ही सॅड इथल्या रेल्वेस्थानकाचं छत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्या देशभरात निदर्शनं सुरू आहेत. या स्थानकाचं दोन वेळा नूतन...

December 22, 2024 8:23 PM

views 31

भारत आणि कुवेत या देशांमध्ये विविध करार

येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज  कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह, युवराज शेख सबाह अल खालेद अल हमाद अल मुबारक अल सबाह आणि कुवेतचे प्रधानमंत्री अहमद अल अब्दुल्ला अल सबाह यांच्याशी ...

December 22, 2024 7:32 PM

views 21

भारत आणि कुवेतमध्ये बहुआयामी संबंध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि कुवेतमध्ये इतिहास, संस्कृती आणि परस्परांबद्दलचा आदर असे बहुआयामी संबंध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कुवेतमधल्या एका खाजगी वृत्तसंस्थेला मुलाखतीत ते बोलत होते. ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध असल्याचं ते म्हणाले. व्यापार आणि वाण...

December 22, 2024 6:24 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुवेतच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान

येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज  कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्यासोबत  औषधनिर्माण, माहिती-तंत्रज्ञान, फिन टेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा अशा प्रमुख क्षेत्रातील द्विपक्षीय...

December 22, 2024 1:39 PM

views 23

जर्मनीत मॅग्डेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारताकडून निषेध

जर्मनीत मॅग्डेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात पाच लोक ठार तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींमध्ये सात भारतीयांचाही समावेश होता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात, नाताळच्या बाजारात झालेला हा हल्ला भीषण आणि माथ...

December 21, 2024 4:36 PM

views 11

स्पेनचे माजी उपप्रधानमंत्री रॉड्रिगो राटो यांना तुरुंगवासाची शिक्षा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि स्पेनचे माजी उपप्रधानमंत्री रॉड्रिगो राटो यांना स्पेनमधल्या न्यायालयाने ४ वर्ष ९ महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. ७५ वर्षांचे रॉड्रिगो कर फसवणूक, मनी लॉण्डरिंग आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरले आहेत. स्पेनच्या करविभागाला फसवून सुमारे ८ क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.