आंतरराष्ट्रीय

December 18, 2024 11:05 AM December 18, 2024 11:05 AM

views 15

नेपाळमध्ये काठमांडू इथं भारत-नेपाळ स्टार्टअप परिषद २०२४

भारत-नेपाळ स्टार्टअप परिषद 2024 कालपासून नेपाळमध्ये काठमांडू इथं सुरू झाली. उभय राष्ट्रांमधील सहकार्य आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन देण्यासाठी या परिषदेत उद्योजक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत. स्टार्टअप जाळं निर्माण करण्यासाठी मंच तयार करणं, नवकल्पना मांडणं, विकास आणि गुंतवणुकीच्या संधी ...

December 18, 2024 10:53 AM December 18, 2024 10:53 AM

views 9

दक्षिण कोरियाचे लष्करप्रमुख पार्क एन सू यांना अटक

दक्षिण कोरियाचे लष्करप्रमुख पार्क एन सू यांना काल अटक करण्यात आली. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष योन सूक येओल यांच्या अल्पकालीन लष्करी राजवटीत पार्क यांनी त्यांचे मुख्य कमांडर म्हणून काम पाहिले होते. त्यांच्यावर बंडखोरी तसंच सत्तेचा गैरवापर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या आरोपाखाली न्यायालया...

December 18, 2024 10:44 AM December 18, 2024 10:44 AM

views 9

नेपाळमध्ये भक्तपूर महोत्सवाला लाखो नागरिकांची भेट

नेपाळमध्ये गेल्या १३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या भक्तपूर महोत्सवाला गेल्या पाच दिवसांत लाखो लोकांनी भेट दिली. त्यामुळे इथं प्रचंड गर्दी झाली होती. भक्तपूरच्या अद्वितीय आणि ऐतिहासिक कला, संस्कृती, उत्सव आणि जीवनशैलीची जगाला ओळख करून देणं हा महोत्सवाचा उद्देश होता. भक्तपूर हा काठमांडू खोऱ्यातील एक जिल्...

December 17, 2024 8:48 PM December 17, 2024 8:48 PM

views 7

सीरियामधे गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसाचारात ८ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लोक विस्थापित

सीरियामधे गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसाचारात ८ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाने ही माहिती दिली. सुमारे ४० हजार विस्थापितांनी सीरियाच्या ईशान्य भागातल्या अडीचशे शिबिरांमधे आश्रय घेतला आहे. लेबनॉन – सीरिया सरहद्दीवर मो...

December 17, 2024 8:45 PM December 17, 2024 8:45 PM

views 6

बांगलादेशात संसदीय निवडणूक घेण्याची परवानगी निष्पक्ष काळजीवाहू सरकारला देणारी तरतूद पुनर्स्थापित

बांगलादेशात संसदीय निवडणूक घेण्याची परवानगी निष्पक्ष काळजीवाहू सरकारला देणारी तरतूद तिथल्या उच्च न्यायालयाने पुनर्स्थापित केली आहे.  बांगला देशच्या संविधानातली ही तरतूद १५व्या घटनादुरुस्तीनुसार हटवण्यात आली होती. ही घटनादुरुस्ती संविधानाच्या मूलभूत तत्वांशी फारकत घेऊन लोकशाहीशी तडजोड करणारी होती असं...

December 17, 2024 6:55 PM December 17, 2024 6:55 PM

views 10

रशियाच्या अणुसंरक्षण दलाचे प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा स्फोटात मृत्यू

रशियाची राजधानी मॉस्को इथे आज एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लपवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने रशियाच्या अणुसंरक्षण दलाचे प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह त्यांच्या सहाय्यकाचाही यात मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना क्रेमलिनच्या आग्नेय दिशेला असलेल्या एका रस्त्यावर घडली. किरिलोव्ह या...

December 17, 2024 9:00 PM December 17, 2024 9:00 PM

views 16

फ्रान्समध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू

फ्रान्समध्ये मेयोत इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान २२ जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिंदी महासागरातल्या मादागास्कर आणि मोझांबिक बेटांच्या किनाऱ्या दरम्यान मायोत हा द्वीपसमूह आहे. या चक्रीवादळामुळे किती नुकसान झालं आहे, याचा निश्चित आकडा ...

December 17, 2024 6:42 PM December 17, 2024 6:42 PM

views 6

ट्रॅव्हल एजंटकडून फसवणुकीमुळे पाकिस्तानात अडकलेली भारतीय महिला मायदेशी परतली

ट्रॅव्हल एजंटकडून फसवणूक झाल्याने पाकिस्तानात अडकलेली एक भारतीय महिला २२ वर्षांनी मायदेशी परतली आहे. हमीदा बानो असं या महिलेचं नाव असून त्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अटारी सीमेवर परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर हमीदा यांना वैद्यकीय उपचारांसाठी अमृतसर इथल्या ग...

December 17, 2024 10:14 AM December 17, 2024 10:14 AM

views 12

फ्रान्सच्या बेटाला चिडो चक्रीवादळाचा तडाखा

चिडो चक्रीवादळानं मादागास्कर आणि मोझांबिक किनाऱ्यादरम्यान असलेल्या मायोट या फ्रान्सच्या बेटाला जबरदस्त तडाखा दिला असून, इथं हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वीस लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असली, तरी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते बळींची संख्या एक ...

December 16, 2024 7:51 PM December 16, 2024 7:51 PM

views 8

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुहेरी कर आकारणी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार झाले. तसंच, श्रीलंकेच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातले सामंजस्य करारही करण्यात आले. जाफना आणि ईस्टर्न युनिव्हर्सिटी या विद्यापाठांमधल्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण ह...