आंतरराष्ट्रीय

December 30, 2024 8:15 PM December 30, 2024 8:15 PM

views 14

इथिओपियामध्ये प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्यानं ७१ जणांचा मृत्यू

इथिओपियामध्ये प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्यानं किमान ७१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६८ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबापासून सुमारे ३०० किलोमीटरवर असलेल्या सिदामा मध्ये काल हा अपघात झाला.

December 30, 2024 1:31 PM December 30, 2024 1:31 PM

views 10

दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती

दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी विमानाला पक्ष्याची धडक बसू शकते, असा इशारा विमान नियंत्रकांनी दिला होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातातून वाचलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकानेही पक्ष्याची धडक बसल्याचा उल्लेख केला होता. मात्र,...

December 30, 2024 8:07 PM December 30, 2024 8:07 PM

views 2

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं काल रात्री जॉर्जियातल्या प्लेन्स इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते १०० वर्षांचे होते. कार्टर हे १९७७ ते १९८१ या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना २००२ मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. ते आतापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपती...

December 29, 2024 8:06 PM December 29, 2024 8:06 PM

views 9

अमेरिका आणि नाटोच्या क्षेपणास्त्र संबंधी धमक्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल – परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह

अमेरिका आणि नाटोच्या क्षेपणास्त्र संबंधी धमक्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी दिला आहे. रशिया कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे. आम्ही समन्यायी चर्चेसाठी योग्य परिस्थिती निर्माण व्हावी याकरताही पावलं उचलू, मात्र आपल्या शत्रूंनी धमकी दिली तर त्यांन...

December 29, 2024 8:03 PM December 29, 2024 8:03 PM

views 2

ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानिज यांनी घेतला ग्रँपियन्स राष्ट्रीय पार्कमध्ये लागलेल्या वणव्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

ऑस्ट्रेलियात ग्रँपियन्स राष्ट्रीय पार्कमध्ये लागलेल्या वणव्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानिज यांनी आज घेतला. या आगीमुळे नुकसान सोसावं लागलेले कामगार आणि दुकानदारांना नुकसानभरपाई दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. सहा डिसेंबरला वीज पडल्यामुळे सत्तर हजार हेक्टरवरच...

December 29, 2024 7:48 PM December 29, 2024 7:48 PM

views 11

दक्षिण कोरियामधे विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू दक्षिण कोरियात आज सकाळी प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू झाला. त्यात १७५ प्रवासी आणि ४ विमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फक्त दोन कर्मचारी वाचले आहेत. बँकॉकहून निघालेलं हे विमान मुआन इथल्या विमानतळावर उतरताना लँडिंग ...

December 29, 2024 6:44 PM December 29, 2024 6:44 PM

views 17

एचवन बी व्हिसा हा उत्तम उपक्रम असून त्याने उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक  मिळवून दिले – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत अमेरिकेच्या एच-वन बी व्हिसा कार्यक्रमाची पाठराखण केली आहे. एचवन बी व्हिसा हा उत्तम उपक्रम असून त्याने  अमेरिकेतल्या खास नोकऱ्यांसाठी उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक  मिळवून दिले असं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. आपल्या पहिल्या क...

December 29, 2024 3:08 PM December 29, 2024 3:08 PM

views 13

भारत ऑस्ट्रेेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षं पूर्ण

भारत ऑस्ट्रेेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षं पूर्ण होत असताना, या दोन्ही देशांमध्ये परस्परसंबधातून व्यापारवृद्धी आणि आर्थिक विकास यांची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून, द्विपक्षीय व्यावसायिक व्यापारात दुप्पटीने...

December 28, 2024 7:39 PM December 28, 2024 7:39 PM

views 4

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमादलांमध्ये चकमक, एकंदर २२ जण ठार

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमा दलात सीमेवरील चौक्यांवर झालेल्या चकमकीत १९ पाकिस्तानी सैनिक तर तीन अफगाणी नागरिक ठार झाले. पाकिस्तानच्या सीमेनजिक पूर्व अफगाणिस्तानातल्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात या चकमक सुरू आहेत. अफगाणिस्तानच्या सीमा दलांनी पाकिस्तानच्या अनेक चौक्यांना आग लावली आहे. पक्तिका प्रांत...

December 27, 2024 7:46 PM December 27, 2024 7:46 PM

views 3

राष्ट्रपती फ्रँक-वॉल्टर स्टेनमिअर यांनी केलं संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित

जर्मनीमधे मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राष्ट्रपती फ्रँक-वॉल्टर स्टेनमिअर यांनी आज संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित केलं. प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्झ यांचं सरकार कोसळ्यामुळे येत्या २३ फेब्रुवारीला ही निवडणुक होणार आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत ओलाफ स्कोल्झ काळजीवाहू सरकारचे प्रमुख म्हणून...