आंतरराष्ट्रीय

January 3, 2025 1:47 PM January 3, 2025 1:47 PM

views 13

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरु

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कालपासून सुरु झाला. या पाच देशांच्या जबाबदारीचं प्रतीक म्हणून त्यांचे ध्वज रोवण्याचा कार्यक्रम काल सुरक्षा परिषदेच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात झाला. इक्वाडोर, जप...

January 2, 2025 8:32 PM January 2, 2025 8:32 PM

views 10

जपानमध्ये सायबर हल्ल्यामुळे अनेक वेबसाईटची सेवा खंडित

जपानमध्ये आज सकाळी सायबर हल्ल्यामुळे अनेक वेबसाईटची सेवा खंडित झाली. वेबसाईटच्या प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे सेवा खंडित झाल्याची माहिती एनटीटी डोकोमो या जपानच्या सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीनं दिली. जपानमध्ये अलीकडेच झालेल्या अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यामुळे राष्ट्रीय बँका आणि विमानतळ ऑपरेटरसह, अनेक...

January 2, 2025 2:34 PM January 2, 2025 2:34 PM

views 12

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं घोषित केलं आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी ही सुविधा सुरु करण्यात आली होती. भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल अविर इथल्या केंद्रांच्या माध्यमातून, संयुक्त अरब अमिरातीतल्या १५ हजाराहून जास्त भारतीयांना व्हिसा नियमित कर...

January 2, 2025 2:32 PM January 2, 2025 2:32 PM

views 26

अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी

अमेरिकेत काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले. ट्रक घुसवणारा माथेफिरू तरुण ४२ वर्षाचा असून शमसुद्दींन बहार जब्बार अस त्याच नाव आहे आणि तो पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. ...

January 2, 2025 2:28 PM January 2, 2025 2:28 PM

views 4

दक्षिण प्रशांत महासागरातल्या वानुआतु इथल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी भारताकडून पाच लाख डॉलर्सचं अर्थसहाय्य

दक्षिण प्रशांत महासागरातल्या वानुआतु इथल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी भारतानं पाच लाख डॉलर्सचं अर्थसहाय्य दिलं आहे. गेल्या १७ डिसेंबरला वानुआतुच्या किनारपट्टीजवळ ७ पूर्णांक ४ दशांश रिक्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे मोठा विनाश आणि जीवितहानी झाली होती.  

January 1, 2025 8:19 PM January 1, 2025 8:19 PM

views 10

भारत आणि पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांच्या याद्या सादर

भारत आणि पाकिस्तानने आपापाल्या अणुप्रकल्पांच्या याद्या एकमेकांना सादर केल्या. उभय देशांमधे अणुप्रकल्पांवर संभाव्य हल्ला रोखण्याच्या दृष्टीनं झालेल्या कराराचा भाग म्हणून दरवर्षी जानेवारीत या याद्या सादर केल्या जातात.

January 1, 2025 2:27 PM January 1, 2025 2:27 PM

views 11

येमेनमध्ये हौथी संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले

येमेनची राजधानी साना इथं हौथी या लढाऊ गटाच्या लष्करी तळांवर अमेरिकन लष्कराने हवाई हल्ले केले आहेत. हौथीकडून चालवल्या जाणाऱ्या दूरचित्रवाहिनीने ही माहिती दिली. हौथीच्या संरक्षणदलाची इमारत तसंच दारुगोळा उत्पादनांचा कारखाना अशा ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांमुळे लक्षणीय नुकसान झाल्याचं या वृत्तवाहिनीनं म्...

January 1, 2025 2:26 PM January 1, 2025 2:26 PM

views 7

रशियामध्ये पर्यटन कर लागू

रशियामध्ये आजपासून पर्यटन कर लागू करण्यात आला आहे. अधिकृत रशियन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हॉटेल्स किंवा निवासस्थानांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर आजपासून पर्यटकांना एक टक्का पर्यटन कर द्यावा लागणार आहे. जुलै २०२४ मध्ये रशियन टॅक्स कोड मधल्या सुधारणांनुसार ही करआकारणी सुरु झाली आहे. या सुध...

December 31, 2024 8:33 PM December 31, 2024 8:33 PM

views 10

रशियाचा युक्रेनवर हवाई हल्ला

रशियानं आज क्षेपणास्त्रं आणि ड्रोन्सच्या साहाय्यानं युक्रेनवर हवाई हल्ला केला. यातली २१ पैकी ६ क्षेपणास्त्रं पडल्याचा दावा युक्रेननं केला आहे.या हल्ल्यात कीव भागातली एक महिला जखमी झाली असून इतर ठिकाणच्या १२ निवासी इमारती आणि शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. दरम्यान, युक्रेनमधल्या हवाई तळावर तसंच दारूगोळा...

December 31, 2024 1:12 PM December 31, 2024 1:12 PM

views 23

कौसर या बांग्लादेशी दहशतवाद्याला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

बंगळुरूच्या विशेष न्यायालयानं, जहिदुल इस्लाम उर्फ कौसर या बांग्लादेशी दहशतवाद्याला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याला कट रचणे, लुटणे आणि दारूगोळा खरेदी या गुन्ह्यांमध्ये 57 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. बांग्लादेशात साखळी स्फोट घडवून आणल्यानंतर या आरोपीनं भारतात घुसखोरी केल्या...