निवडणुका

July 13, 2024 8:59 PM July 13, 2024 8:59 PM

views 16

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत.  पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचा उमेदवार विजयी झाला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या देहरा आणि नलगढ मतदारसंघात काँग्रेसच्या, तर हमीरपूरमध्ये भाजपा उमेदवाराने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधल्या...

July 13, 2024 3:05 PM July 13, 2024 3:05 PM

views 18

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. १० जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघाचा निकाल घोषित झाला असून इथं आम आदमी पार्टीचे मोहिंदर भगत हे विजयी झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशमधल्या देहरा मतदारसंघात काँग्रेसचे...

July 12, 2024 8:29 PM July 12, 2024 8:29 PM

views 16

नेपाळमधे प्रधानमंत्री पुष्पकमल दहल यांनी बहुमत गमावलं

नेपाळमधे प्रधानमंत्री पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. १९४ संसद सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं तर ६३ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं. बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रचंड यांना १३८ मतांची आवश्यकता होती.

July 12, 2024 8:16 PM July 12, 2024 8:16 PM

views 24

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी

विधान परिषदेच्या आज झालेल्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या ३ पैकी २ उमेदवारांना विजय मिळवता आला.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे शेकापचे जयंत पाटील या निवडणुकीत पराभूत झाले. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १...

July 12, 2024 3:18 PM July 12, 2024 3:18 PM

views 19

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान सुरू

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत २४६ आमदारांनी मतदानं केलं आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर संध्याकाळी लगेच मतमोजणी होणार आहे. सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदान कशाप्रकारे करावं, पसंतीक्रम कसा ठेवा...

July 10, 2024 1:34 PM July 10, 2024 1:34 PM

views 18

देशातल्या सात राज्यांमधल्या १३ विधानसभा मतदारसंघांमधे आज पोटनिवडणुकीसाठी मतदान

देशातल्या सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघांमधे आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि मणिकतला, हिमाचल प्रदेशमधल्या देहरा, हमीरपूर आणि नालागढ तसंच उत्तराखंडमधल्या बद्रीनाथ आणि मंगलौर या मतदारसंघात मतदान होत आहे. तसंच मध्यमप्रदेशमध्ये अमरवाडा, ...

July 5, 2024 7:35 PM July 5, 2024 7:35 PM

views 20

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार हे आज स्पष्ट झालं. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आता १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.   भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खो...

July 2, 2024 3:20 PM July 2, 2024 3:20 PM

views 12

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी दोन जागा

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात दोन जागांवर महाविकास आघाडी तर दोन जागांवर महायुती विजयी झाली आहे. मुंबईतल्या दोन्ही म्हणजे मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधरमधून...

July 1, 2024 1:45 PM July 1, 2024 1:45 PM

views 11

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या तीन मतदार संघांची मतमोजणी नवीमुंबईत नेरुळ इथं होत असून मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. जळ...

June 30, 2024 7:48 PM June 30, 2024 7:48 PM

views 7

मविआ आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढतील – शरद पवार

महाविकास आघाडीतले घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवतील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात बदल होण्याची गरज आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी विरोधी आघाडीवर आहे, असं ते म्हणाले. जागावाटपाबाबतची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही, ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.