निवडणुका

November 7, 2024 6:51 PM

views 18

आचारसंहितेच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाची राज्यात छापेमारी

निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाची राज्याच्या विविध भागात छापेमारी सुरु आहे.   उत्पादनशुल्क विभागानं धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत अवैध मद्यविक्री, वाहतूक प्रकरणी आतापर्यंत ७६ गुन्हे दाखल केले असून, ९३ लाख २ हजार ९७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या...

November 7, 2024 6:46 PM

views 30

लाडक्या बहिणींची रक्कम वाढणार असून घरोघरी लखपती कुटुंब होतील – ज्योतिरादित्य शिंदे

महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणीसाठी  पंधराशे रुपये दिले. ही रक्कम पुढे वाढवणार असून घरोघरी लखपती कुटुंबं होतील असं आश्वासन भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज अहिल्यानगर इथं दिलं.  कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधल्या राशीन इथं आयोजित जाहीर सभेत तो बोलत होते. सिंदिया यांनी महायुतीचे उमेद...

November 7, 2024 6:44 PM

views 28

कुणबी समाजाविषयी वापरलेले शब्द चुकीचे – नाना पटोले

भाजपा शेतकरी विरोधी असून काल भाजपा नेत्याने वणीमध्ये ज्या पद्धतीनं कुणबी समाजाविषयी अपशब्द वापरले ते चुकीचं आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपाला आम्हाला दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे जे आश्वासन दिले होते त्याची आठवण क...

November 7, 2024 6:38 PM

views 30

‘अमरावतीत तयार होणाऱ्या टेक्सटाईल पार्कमुळे १० लाख नागरिकांना रोजगार मिळणार’

अमरावतीमध्ये उभारण्यात आलेल्या टेक्सटाईल पार्कमुळे ५० हजार लोकांना रोजगार मिळाला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरावतीत आणखी एक पार्क तयार करण्याची घोषणा केली असून त्यामुळे दहा लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पांढरकवडा इथं भाजपा उमेदवार रा...

November 7, 2024 6:21 PM

views 21

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज ते नागपूर इथे पूर्व नागपूर मतदारसंघाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले. राज्यातल्या जनतेला परिवर्तन हवं आहे, याची आम्हाला जाणीव असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वच...

November 7, 2024 3:44 PM

views 51

मतदार जागृतीसाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहिम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो आणि भारत निवडणूक आयोगाच्यावतीनं एक फिरतं प्रदर्शन उद्यापासून सुरु होणार आहे. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमधे मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. उद्या मुं...

November 7, 2024 6:13 PM

views 26

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १३ ते १८ नोव्हेंबर या काळात काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली  काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक आज झाली, त्यावेळी चेन्नीथला यांनी ही माहिती द...

November 6, 2024 7:54 PM

views 45

माहीम आणि मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत माहीम आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन मतदारसंघांमधल्या महायुतीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. माहीम मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मानखुर्द-शिवाजीन...

November 6, 2024 7:32 PM

views 31

आचारसंहिता लागू झाल्यापासून रत्नागिरीत ६६ गुन्हे दाखल, ५१ आरोपी अटक

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागानं रत्नागिरी जिल्ह्यात ६६ गुन्हे दाखल केले असून ५१ आरोपींना अटक केली आहे. यात १४०० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा आणि २७ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या मालाचं एक...

November 6, 2024 8:31 PM

views 32

काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध

महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा आज मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलात होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मविआचे इतर नेते सभेला उपस्थित आहेत. विधा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.