निवडणुका

November 18, 2024 7:59 PM

views 36

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. ५६ हजारांहून अधिक शस्र जमा केली असून ६११ शस्र परवाने रद्द झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ६६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त झाली आहे. त्यात १५३ कोटी ...

November 18, 2024 7:42 PM

views 55

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा रमेश चेन्नीथला यांचा आरोप

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर होत असून निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. माजी पोलीस महासंचालक रश्...

November 18, 2024 7:39 PM

views 34

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल-विनोद तावडे

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल, असं भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगितलं. धारावीतल्या लोकांना विस्थापित करण्यात येणार आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. धारावीची जमीन अदानी समूहाला दिली जाणा...

November 18, 2024 7:38 PM

views 32

महायुती सरकार असंविधानिक, भ्रष्टाचारी असून महायुतीला सत्तेवरुन खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट-बाळासाहेब थोरात

राज्यातलं महायुती सरकार असंविधानिक आणि भ्रष्टाचारी असून महायुतीला सत्तेवरुन खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते आज संगमनेर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात सर्वत्र महायुती सरकार बद्दल प्रचंड राग असून, या निवडणुकीत १८० जागा जिंकून ...

November 18, 2024 7:34 PM

views 34

महायुुतीला जनतेचा कौल असल्यानं युतीच्या १६५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील-चंद्रशेखर बावनकुळे

महायुुतीला जनतेचा कौल असल्यानं युतीच्या १६५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि सरकार आपलंच येईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूरात ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसने लोकसभेत खोटा प्रचार केला असून त्यावर जनतेचा विश्वास उरला नाही, त्यामुळे हरियाणात झालं ...

November 18, 2024 7:32 PM

views 23

महायुती सरकारच्या काळात महागाई आणि बेरोजगारीत प्रचंड वाढ-मल्लिकार्जुन खर्गे

महायुती सरकारच्या काळात शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचं जगणं कठीण झालं आहे, महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, अशी टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. ते वसई इथं प्रचारसभेत बोलत होते. भाजपा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असून काँग्रे...

November 18, 2024 7:29 PM

views 33

जगात भारत पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला – जे. पी. नड्डा

जगात भारत पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन इतकी बनवायची असेल तर महायुतीला मतदान करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी मुंबईत केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

November 18, 2024 7:24 PM

views 33

महाविकास आघाडीनं अनेक विकासकामांमध्ये अडथळे आणल्यामुळे लाखो रोजगारांवर गदा- मुख्यमंत्री

महाविकास आघाडीनं अनेक विकासकामांमध्ये अडथळे आणल्यामुळे लाखो रोजगारांवर गदा आली असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. वाढवण बंदर, जैतापूर, बारसू रिफायनरी अशा अनेक प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. कोविड काळातही महाविकास आघाडीने भ्रष्टाचार केल्याचा ...

November 18, 2024 7:23 PM

views 35

सबका साथ, सबका विकास हेच आपलं ध्येय – नितीन गडकरी

आपल्या सरकारने नागपूरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी केला असून सबका साथ, सबका विकास हेच आपलं ध्येय आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नागपूर इथं आयोजित सांगता सभेत ते बोलत होते.  काँग्रेसकडे साठ वर्षे सत्ता असूनही नागपूरचा विकास झाल...

November 18, 2024 7:05 PM

views 19

महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मुंबई शहरात मेट्रोचं काम अद्याप अपूर्ण आहे. मेट्रोमार्गासाठी बसवलेल्या खांबांवर अनेक ठिकाणी अद्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.