डीडी बातम्या

February 2, 2025 1:23 PM February 2, 2025 1:23 PM

views 10

अमेरिकेविरोधात प्रत्युत्तरात्मक शुल्क टॅरिफ लावण्याची कॅनडाची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करांना प्रतिसाद म्हणून, कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी देशात येणाऱ्या १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावायची घोषणा केली आहे. ओटावा इथं वार्ताहर परिषदेत बोलताना, ट्रूडो यांनी मंगळवारपासून ३० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर ...

February 2, 2025 10:38 AM February 2, 2025 10:38 AM

views 12

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समितीनं दिलेला अहवाल उद्या मांडणार

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समितीनं दिलेला अहवाल उद्या म्हणजे सोमवारी लोकसभेत मांडला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष जगंदबिका पाल आणि सदस्य संजय जयस्वाल हा अहवाल सादर करणार आहेत. समितीनं अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे हा अहवाल गुरुवारीच सुपूर्द केला आहे.

February 2, 2025 3:04 PM February 2, 2025 3:04 PM

views 7

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात सुरु

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या संध्याकाळी संपणार आहे. भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष रिंगणात असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोमाने प्रचार करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आरके पुरम इथं आज जाहीर सभा होणार आहे, तर भाजप ने...

January 30, 2025 8:06 PM January 30, 2025 8:06 PM

views 14

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईची सामन्यावर मजबूत पकड

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत सुरु झालेल्या मेघालयाविरुद्धच्या सामन्यावर मुंबईनं पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेतली आहे. मुंबईनं नाणेफेक जिंकून मेघालयाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि ८६ धावात त्यांचा पहिला डाव गुंडाळला. शार्दुल ठाकुरनं ४, मोहित अवस्थीनं ३, सिल्वेस्टर डिसुझानं २, तर शम्स मु...

January 27, 2025 7:11 PM January 27, 2025 7:11 PM

views 14

पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातल्या नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्यानं तपासणी, रिअल टाईम मॉनिटिरिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या १०० दिवस ...

January 26, 2025 8:40 PM January 26, 2025 8:40 PM

views 9

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर  सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन सरकारी कामकाज अधिक गतिमान करता येई...

January 25, 2025 3:09 PM January 25, 2025 3:09 PM

views 17

मुंबई दहशतवादी आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

मुंबई दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा आरोपी तहव्वूर राणा याचा भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणा यानं भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या हल्ल्यातला मुख्य आरोपी डेव्हिड हेडली याचा राणा हा जवळचा सहकारी ...

January 22, 2025 1:56 PM January 22, 2025 1:56 PM

views 16

श्रीलंका: युनायटेड नॅशनल पार्टी, समगी जना बालवेगया हे दोन्ही पक्ष स्थानिक सरकारच्या निवडणुकांसाठी एकत्र येण्यास सहमत

श्रीलंकेत आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युनायटेड नॅशनल पार्टी आणि समगी जना बालवेगया या दोन्ही पक्षांनी पहिल्या फेरीत संयुक्त आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हे दोन...

January 11, 2025 3:05 PM January 11, 2025 3:05 PM

views 12

आसाममधे कोळसा खाणींमधे आणखी एकाचा मृतदेह

आसाममधे दिमा हासो जिल्ह्यातल्या उम्रांग्सो कोळसा खाणींमधे पुराचं पाणी शिरल्यानं मृत्युमुखी पडलेल्या आणखी एका खाणकामगाराचा मृतदेह आज मदतपथकाने बाहेर काढला. केंद्रीय आणि राज्यसरकारी यंत्रणांची मदतपथकं गेले ६ दिवस कार्यरत आहेत.   गेल्या सोमवारी या रॅटहोल खाणींमधे पाणी शिरल्यानं ९ कामगार अडकले होते...

January 7, 2025 7:01 PM January 7, 2025 7:01 PM

views 13

बांबू  बायोमास खरेदी करण्यासाठी पन्नास वर्षांचे करार केले जातील-गुरदीप सिंग

बायोमासवर आधारित ऊर्जा प्रकल्प  ही पर्यावरण संवर्धनासाठी काळाची गरज असून शेतकरी उत्पादक संघटनांशी बांबू  बायोमास खरेदी करण्यासाठी पन्नास वर्षांचे करार केले जातील असं राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे अध्यक्ष गुरदीप सिंग यांनी म्हटलं आहे. धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी खरेदी ध...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.