डीडी बातम्या

December 28, 2025 7:15 PM December 28, 2025 7:15 PM

views 4

  पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी

  मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून  उभारण्यात आलेल्या या  बंधाऱ्यामुळं पावसाचं पाणी अडवलं जाणार आहे.   त्यामुळं  भूजल पातळी वाढून स्थानिक शेतीसाठी  पुरेसा जलसाठा निर्माण हो...

December 14, 2025 8:06 PM December 14, 2025 8:06 PM

views 56

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नोबिन यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नोबिन यांची नेमणूक झाली आहे. भाजपाच्या संसदीय मंडळाने ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नितीन नोबिन सध्या बिहार मंत्रिमंडळात मंत्री असून ते जे पी नड्डा यांच्याकडून अध्यक्षप...

December 6, 2025 8:25 PM December 6, 2025 8:25 PM

views 50

विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे केंद्र सरकारचे इंडिगोला आदेश

इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याची प्रलंबित प्रक्रिया उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं इंडिगोला दिले आहेत.   (विमानाची वेळ बदलण्यासाठी प्रवाशांकडून कुठलेही शुल्क आकारु नका. त्याचप्रमाणे प्रवाशांचं साहित्य...

December 2, 2025 8:19 PM December 2, 2025 8:19 PM

views 16

मतदार याद्यांचं पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. या विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसातून दोन वेळा तहकूब झालं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिज...

November 30, 2025 7:01 PM November 30, 2025 7:01 PM

views 43

एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५० धावांचं आव्हान

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज झारखंडमध्ये रांची इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५० धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३४९ ...

November 30, 2025 3:09 PM November 30, 2025 3:09 PM

views 12

दितवा चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता

दितवा चक्रीवादळ आता उत्तर तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किनाऱ्यावर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. किनारी भागात मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टी, यानम आणि रायलसीमा या भागांमध्ये क...

November 27, 2025 1:16 PM November 27, 2025 1:16 PM

views 55

युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण

पॅरिस इथल्या युनेस्कोच्या मुख्यालयात काल संविधान दिनानिमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये अभिमान व्यक्त केला आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला ...

November 26, 2025 3:33 PM November 26, 2025 3:33 PM

views 28

दिल्ली स्फोट प्रकरणातल्या सातव्या आरोपीला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपी उमर उन नबी याला आश्रय देणाऱ्या फरीदाबादमधल्या एका रहिवाशाला राष्ट्रीय तपास संस्थेनं आज अटक केली. त्याचं नाव सोयब असून या प्रकरणात अटक झालेला तो सातवा आरोपी असल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेने सांगितलं. सोयब उमर उन नबी याला रसद पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणा...

November 22, 2025 4:04 PM November 22, 2025 4:04 PM

views 11

राज्याच्या काही भागात थंडीचा जोर कायम

राज्याच्या काही भागात थंडीचा जोर कायम आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

November 16, 2025 8:09 PM November 16, 2025 8:09 PM

views 15

दृष्टिहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव

दृष्टिहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव केला. स्पर्धेतला हा भारताचा सलग पाचवा विजय ठरला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं, मेहरिन अली हिच्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद १३५ धावा केल्या. भारतानं पाकिस्तान...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.