व्यवसाय

September 1, 2024 8:26 PM September 1, 2024 8:26 PM

views 2

ऑगस्ट महिन्यात भारतीय भांडवली बाजारात २५ हजार कोटी रुपयांहून अधिक परदेशी गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदारांनी सलग तिसऱ्या महिन्यात आपल्या गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवला असून ऑगस्ट महिन्यात भारतीय भांडवली बाजारात २५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. परकीय चलनसाठा विषयक आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग बाजारपेठेत ७ हजार ३२० कोटी रुपये तर ऋण बाजारपेठेत १७ हज...

August 30, 2024 8:07 PM August 30, 2024 8:07 PM

views 13

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा प्रत्यक्ष जीडीपी दर ६.६ टक्के

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, देशाचा प्रत्यक्ष जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अनुमानित दर ६ पूर्णांक ६ दशांश टक्के आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज जाहीर केलेल्या अहवालात हे अनुमान दिलं आहे. चलनफुगवटा विचारात न घेता, मोजलेला नॉमिनल जीडीपी वाढीचा दर या तिमाहीत ९ पूर्णांक...

August 29, 2024 6:49 PM August 29, 2024 6:49 PM

views 3

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टी सार्वकालिक उंचीवर

भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्स आणि निफ्टीने या सत्रातला सार्वकालिक उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ३४९ अंकाची वाढ झाली आणि तो ८२ हजार १३५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत आज १०० अंकांची वाढ झाली आणि तो २५ हजार १५२ अंकांवर बंद झाला.

August 16, 2024 7:41 PM August 16, 2024 7:41 PM

views 51

अमेरिकेतलं मंदीचं सावट दूर झाल्यानं देशातल्या शेअर बाजारात मोठी तेजी

गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या देशातल्या शेअर बाजारांनी आज मोठी तेजी नोंदवली. सेन्सेक्स १ हजार ३३१ अंकांची वाढ नोंदवून ८० हजार ४३७ अंकांवर बंद झाला. निफ्टीही ३९७ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ५४१ अंकांवर बंद झाला. अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या ताज्या आकडेवारीनुसार मंदीचं सावट दूर झाल्यानं ही तेजी दिस...

August 10, 2024 8:46 PM August 10, 2024 8:46 PM

views 5

किरकोळ क्षेत्रात भारताची लक्षणीय प्रगती

भारताने किरकोळ क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली आहे. आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड देशात विविध मोक्याच्या जागांवर पाय रोवत आहेत. परदेशी किरकोळ व्यापाऱ्यांना भारतातल्या संधी खुणावत आहेत. २०२४ या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ८ शहरात ३ पूर्णांक १ दशांश दशलक्ष चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर  देण्यात आला आहे.  गेल...

August 10, 2024 4:03 PM August 10, 2024 4:03 PM

views 14

सॅमसंगसाठी भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ

सॅमसंगसाठी भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ असल्याचं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे  मुख्य कार्यकारी अधिकारी जोंग- ही यांनी सांगितलं आहे. सॅमसंगच्या नोएडा इथल्या कारखान्याला जोंग - ही यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. भारतात गुंतवणूक करणारी सॅमसंग ही पहिली कंपनी असून नोएडा इथली आमची कंपनी जगा...

August 8, 2024 8:22 PM August 8, 2024 8:22 PM

views 29

ॲपल कंपनी भारतातलं उत्पादन दुप्पट करणार

आयफोन निर्मिती करणारी ॲपल ही कंपनी भारतातलं उत्पादन दुप्पट करणार आहे. भारतातली आयफोनची विक्री ८ बिलियन डॉलर इतकी झाल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी फोन संचाची निर्मिती करणारी फॉक्सकॉन कंपनी तामिळनाडूच्या श्रीपरंबदूर इथं आयपॅडचा निर्मिती प्रकल्प सुरू करणार आहे.

August 8, 2024 7:25 PM August 8, 2024 7:25 PM

views 19

भारतानं शेअर बाजारांमध्ये आपलं स्थान पक्कं केलं – गुंतवणूक तज्ज्ञ

गेल्या काही दशकांमध्ये भारतीय शेअर बाजारानं जगात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शेअर बाजारांमध्ये आपलं स्थान पक्कं केल्याची प्रतिक्रिया गुंतवणूक तज्ज्ञांनी नोंदवली आहे. शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतून अर्थार्जन करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा शेअर बाजारातल्या गुंतवणुकीकडे कल वाढल्याचं यात म्हटलं आहे.

August 5, 2024 7:30 PM August 5, 2024 7:30 PM

views 25

शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज २ हजार २२३ अंकांनी घसरून ७८ हजार ७५९ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६६२ अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ५६ अंकांवर बंद झाला. जपानचा शेअर बाजार निक्केई कोलमडल्यानं संपूर्ण जगभरातल्या शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळाल...

August 3, 2024 12:19 PM August 3, 2024 12:19 PM

views 18

३१ जुलैपर्यंत ७ कोटी २८ लाख आयकर विवरणपत्र दाखल

मूल्याकंन वर्ष २०२४- २५ साठी ३१ जुलैपर्यंत विक्रमी ७ कोटी २८ लाख जणांनी आयकर विवरणपत्र दाखल केल्याची माहिती वित्त मंत्रालयानं दिली आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या साडे सात टक्क्यांनी अधिक असल्याचं मंत्रालयानं जाहीर केलं आहे. यंदा विवरणपत्र दाखल करणाऱ्यांपैकी सुमारे ५ कोटी २७ लाख जणांन...