व्यवसाय

October 8, 2024 7:16 PM October 8, 2024 7:16 PM

views 7

शेअर बाजारातली आठवडाभर सुरू असलेली घसरण थांबली

विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे सकारात्मक परिणाम आज देशातल्या शेअर बाजारांवर झाले. त्यामुळं आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण थांबली. दिवसअखेर सेन्सेक्स ५८५ अंकांनी वधारुन ८१ हजार ६३५ अंकांवर बंद झाला. निफ्टी २१७ अंकांची तेजी नोंदवून २५ हजार १३ अंकांवर स्थिरावला. सरकारी क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभाग...

October 5, 2024 11:14 AM October 5, 2024 11:14 AM

views 8

परदेशी गंगाजळीमध्ये ७०० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडून भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर

परदेशी गंगाजळीमध्ये 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडून भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर चीन, जपान आणि स्वित्झर्लंड नंतर परदेशी गंगाजळीमध्ये 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडणारी, भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर्स...

October 3, 2024 8:05 PM October 3, 2024 8:05 PM

views 13

मध्य पूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा देशातल्या शेअर बाजारांना मोठा फटका

मध्य पूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. सेन्सेक्स १ हजार ७६९ अंकांनी घसरुन ८२ हजार ४९७ अंकांवर बंद झाला निफ्टी ५४६ अंकांनी कोसळून २५ हजार २५० अंकांवर स्थिरावला. सकाळपासून सुरू झालेली घसरण व्यवहारसंपेपर्यंत वाढतच गेली. यामुळं मुंबई शेअर बाजारातल्या गुंतवणूक...

September 30, 2024 8:33 PM September 30, 2024 8:33 PM

views 19

सोनं तारण कर्ज देणाऱ्या संस्थांना तत्काळ त्रुटी दूर करण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश

सोनं तारण कर्ज देणाऱ्या संस्थांकडून विविध दिशानिर्देशांचं वारंवार उल्लंघन होतंय. या त्रुटी तत्काळ दूर करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं या संस्थांना दिले आहेत. या निर्देशांचा कार्यपालन अहवाल ३ महिन्यात सादर करण्याचे आदेशही रिझर्व्ह बँकेनं दिले. ग्राहकांच्या अनुपस्थितीत दागिन्यांचं मूल्यांकन, दागिन्यांच्...

September 30, 2024 7:31 PM September 30, 2024 7:31 PM

views 9

देशातल्या शेअर बाजारात जोरदार घसरण

गेल्या कित्येक दिवसांपासून उच्चांकी पातळी गाठत असलेल्या देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून आली. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सुरू झालेली ही घसरण सातत्याने वाढत गेली. सेन्सेक्स दिवसअखेर १ हजार २७२ अंकांनी घसरुन ८४ हजार ३०० अंकांवर आणि निफ्टी ३६८ अंकांनी घसरुन २५ हजार ८११ अंकांवर बंद झाला.  ...

September 28, 2024 1:38 PM September 28, 2024 1:38 PM

views 9

देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर

भारताच्या परकीय चलन गंगाजळीत २ अब्ज ८३ कोटी डॉलर्सने वाढ होऊन तो २० सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात यात २२ कोटी ३० लाख डॉलर्सची वाढ झाली होती.  भारताच्या सुवर्ण साठा मूल्यातही ७२ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो ६३ अब...

September 27, 2024 8:16 PM September 27, 2024 8:16 PM

views 12

चालू आर्थिक वर्षात भारत जीडीपी 6.5 टक्के ते ७ टक्के दर गाठू शकेल – अर्थ मंत्रालय

चालू आर्थिक वर्षात जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा साडेसहा ते सात टक्के दर भारत गाठू शकेल, असं अर्थ मंत्रालयानं ऑगस्टच्या मासिक वित्त आढाव्यात म्हटलं आहे. प्रमुख बिगर कृषी क्षेत्रांच्या वाढीचा दर पाच टक्के राहिल्यामुळे पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासाचा वेग कायम राहिला होता, असं मंत्रालयान...

September 26, 2024 7:25 PM September 26, 2024 7:25 PM

views 8

देशातले शेअर बाजार उच्चांकी पातळीवर बंद

देशातल्या शेअर बाजारांनी आजही विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स सत्रादरम्यान ८६ हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन आला. दिवसअखेर सेन्सेक्स ६६६ अंकांनी वधारून ८५ हजार ८३६ अंकांवर तर निफ्टी २१२ अंकांची वाढ नोंदवून २६ हजार २१६ अंकांवर बंद झाला. चीनने दिलेलं आर्थिक प्रोत्साहन पॅकेज, आशियाई निर्देशांकातली तेजी याचा...

September 25, 2024 7:02 PM September 25, 2024 7:02 PM

views 9

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं ८५ हजारांची पातळी ओलांडली

जागतिक बाजारातल्या तेजीमुळं देशातल्या दोन्ही शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स पहिल्यांदाच ८५ हजारांच्या वर आणि निफ्टी पहिल्यांदाच २६ हजारांच्या वर जाऊन बंद झाले. घसरणीसह सुरू झालेल्या शेअर बाजारात अखेरच्या अर्धा तासात जोरदार तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स २५६ अंकांची तेजी नोंदवून...

September 24, 2024 2:38 PM September 24, 2024 2:38 PM

views 7

भारतीय शेअर बाजरांमधे सलग चौथ्या सत्रात निर्देशांकांचा नवा उच्चांक

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात केलेल्या कर्जावरच्या व्याज दरकपातीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी आज सलग चौथ्या सत्रात नवा विक्रमी उच्चांक गाठला. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ८५ हजाराची प...