व्यवसाय

December 13, 2025 9:01 PM

views 42

स्टेट बँकेची मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात

स्टेट बँकेनं मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. यामुळं बँकेचा रेपो दराशी संलग्न व्याजदर ७ पूर्णांक ९ दशांश टक्के होईल. सोमवारपासून हे नवे दर लागू होतील. यामुळं गृह, वाहन आणि इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसंच मुदत ठेवींवरचे व्याज दरही कमी होतील. इंडियन ओव्हरसीज बँकेनंही रेपो संलग्न व...

December 11, 2025 8:19 PM

views 49

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची सुधारित पद्धत जारी

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याबाबतचा सुधारित आराखडा अर्थमंत्रालयानं आज जारी केला. त्यानुसार आता सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील, त्यानंतर राष्ट्रीयीकृत  बँकांचे आणि सर्वात शेवटी प्रादेशिक ग्रामीण बँकांचे निकाल जाहीर होतील. त्याच...

December 10, 2025 8:28 PM

views 33

चांदीच्या दराचा नवा विक्रम

देशात चांदीच्या दरांनी आज नवी उच्चांकी पातळी गाठली. कालच्या तुलनेत साडे ६ हजार रुपयांनी चांदी महाग झाली आणि मुंबईच्या बाजारपेठेत एक किलो चांदीसाठी १ लाख ९१ हजार रुपये मोजावे लागत होते. काल १ किलो चांदी १ लाख ८४ हजार रुपये दराने मिळत होती.  सोन्याच्या दरात मात्र फारशी वाढ झाली नाही. एक तोळा २२ कॅरेट ...

December 8, 2025 7:13 PM

views 35

शेअर बाजारात जोरदार नफा वसुली

नफावसुली आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळं देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढाव्याच्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदार साशंक आहेत. दिवसअखेर सेन्सेक्स ६१० अंकांची घट नोंदवून ८५ हजार १०३ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २२६ अंकांनी घसरुन २५ हजार ९६१ अं...

December 5, 2025 8:16 PM

views 63

RBI कडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के झाला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला, त्यावेळी ही घोषणा केली.   महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर आज व्याजदर कपात...

December 5, 2025 9:44 AM

views 45

RBI आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहेत. आरबीआयच्या पतधोरण समितीची, बैठक बुधवारपासून मुंबईत सुरू आहे. या पतधोरण आढाव्यात व्याजदरात 25 टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

December 4, 2025 2:30 PM

views 34

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ७.४ टक्के राहण्याचा अंदाज

अर्थव्यवस्थेसंदर्भातली जागतिक स्तरावरची मानांकन संस्था फिचनं चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून तो पूर्वीच्या ६ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. अलीकडेच केलेल्या कर सुधारणेमुळे ही वाढ होईल असंही फ...

December 1, 2025 7:51 PM

views 36

GST संकलनात यंदा सात दशांश टक्क्यांची वाढ नोंदवत, १ लाख ७० हजार कोटी रुपयांवर

देशभरातलं वस्तू आणि सेवा कर संकलन गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या तुलनेने यंदा सात दशांश टक्क्यांनी वाढून १ लाख ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात जीएसटी महसूल १ कोटी ६९ लाख कोटी रुपये इतका होता. तर ऑक्टोबरमध्ये केंद्राचा जीएसटी महसूल ३४ हजार ८४३ कोटी आणि राज्याचा जीएसटी म...

December 1, 2025 1:42 PM

views 45

देशातल्या शेअर बाजारांचा विक्रमी पातळीला स्पर्श

देशातल्या शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळीला स्पर्श केला.  सकाळी व्यवहार सुरू झाल्यापासूनच बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्सनं ८६ हजार ८६ अंकांवर झेप घेतली, तर निफ्टी २६ हजार ३११ वर पोहोचला. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारी एकच्या सुमाराला सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांच...

November 27, 2025 1:15 PM

views 75

भारताची अर्थव्यवस्था ६.६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६ पूर्णांक ६ दशांश टक्क्यानी वाढण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. जीएसटी सुधारणांमुळे अमेरिकेने लादलेल्या आयात कराच्या प्रतिकूल परिणामापासून देशाची अर्थव्यवस्था वाचण्याची शक्यता आहे, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. चालू आर्थिक वर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.