व्यवसाय

January 3, 2025 7:04 PM January 3, 2025 7:04 PM

views 6

देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजारांनी कालच्या सत्रात कमावलेल्या पैकी जवळपास निम्मी तेजी आज घालवली. दिवसअखेर सेन्सेक्स ७२१ अंकांनी घसरुन ७९ हजार २२३ अंकांवर स्थिरावला. निफ्टी १८४ अंकांची घसरण नोंदवून २४ हजार ५ अंकांवर बंद झाला. व्यवहारांच्या दरम्यान निफ्टी २४ हजारांच्याही खाली गेला होता. माहिती तंत्रज्ञान, वित्ती...

January 3, 2025 8:36 PM January 3, 2025 8:36 PM

views 5

२०२४ या वर्षात जगभरातला सर्वाधिक भांडवली निधी उभारण्यात NSE आघाडीवर

२०२४ या वर्षात जगभरातला सर्वाधिक भांडवली निधी NSE अर्थात राष्ट्रीय शेअर बाजारातून उभारला गेला. आशियातल्या सर्वाधिक IPO- प्राथमिक समभाग विक्रींची नोंदही या शेअर बाजारात झाल्याचं NSE नं पत्रकात म्हटलं आहे.   गेल्यावर्षी भारतीय बाजारातून कंपन्यांनी साडे १९ अब्ज डॉलरचा निधी गोळा केला. अमेरिकेच्या न...

January 2, 2025 8:24 PM January 2, 2025 8:24 PM

views 2

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी कार्यगटाची स्थापना 

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०११ -१२ च्या ऐवजी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी एका कार्यगटाची स्थापना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने केली आहे. नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद या गटाचे अध्यक्ष असून इतर १८ सदस्य समितीवर आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. सुरजित भल्ला, प्रधानमंत्र्या...

January 2, 2025 7:23 PM January 2, 2025 7:23 PM

views 2

देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज दमदार तेजी झाली. सकाळी किरकोळ तेजीने सुरू झालेले बाजार नंतर सातत्यानं वाढत गेले. व्यवहारांच्या दरम्यान सेन्सेक्सनं ८० हजारांची पातळीही ओलांडली होती. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ४३६ अंकांची वाढ नोंदवून ७९ हजार ९४४ अंकांवर बंद झाला. सत्रादरम्यान २४...

January 1, 2025 6:56 PM January 1, 2025 6:56 PM

views 61

डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलन १ लाख ७६ हजार कोटी रुपयांवर

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन, डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वृद्धी नोंदवून १ लाख  ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर २०२३  मध्ये एकूण जीएसटी संकलन १ लाख ६४ हजार कोटी इतकं होतं.  डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३२ हजार ...

December 31, 2024 7:41 PM December 31, 2024 7:41 PM

views 9

मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे

रिझर्व्ह बँकेनं मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे घेतले आहेत. जुलै २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध लादले होते. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानं हे निर्बंध हटवल्याचं रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

December 31, 2024 1:26 PM December 31, 2024 1:26 PM

views 10

बँक ग्राहकांना प्राप्तकर्त्याचं नाव आणि खात्याच्या तपशीलांची पडताळणी करता येणार

चुकीच्या  बँक खात्यात निधी हस्तांतरण होऊ नये यासाठी लाभार्थीच्या खात्याचं नाव पडताळण्याची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. आर टी जी एस आणि एन ई एफ टी प्रणाली तर्फे पैसे हस्तांतर करण्यापूर्वी या सुविधेचा वापर करता येईल.   इंटरनेट बँकिंग तसंच  मोबाइल ब...

December 30, 2024 1:46 PM December 30, 2024 1:46 PM

views 8

डिसेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक

विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीजच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १६ हजार ६७५ कोटी रुपये आणि पत पुरवठा बाजारामध्ये ५ हजार ३५२ कोटी रुपये गुंतवले, त्यामुळं भारतीय भा...

December 19, 2024 8:28 PM December 19, 2024 8:28 PM

views 9

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरकपातीमुळे शेअर बाजारात घसरण

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या दरकपातीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ९६४ अंकांची घसरण झाली आणि तो ७९ हजार २१८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४७ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ९५१ अंकांवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हने व्याजद...

December 17, 2024 6:58 PM December 17, 2024 6:58 PM

views 20

शेअर बाजारात आज मोठी घसरण

आंतरराष्ट्रीय व्यापारातली मंदी आणि वाढती व्यापारी तूट यांच्या परिणामामुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर अंकांची १ हजार ६४  अंकांची घसरण झाली, आणि तो ८० हजार ६८४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३३२ अंकांची घसरण नोंद...